ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
हायट्रेडिंग मास्कबद्दल तुम्हाला माहीत हव्यात या गोष्टी

हायट्रेडिंग मास्कबद्दल तुम्हाला माहीत हव्यात या गोष्टी

फेशियल करायचे म्हणजे साधारण 1 तास तरी तुम्हाला काढावा लागतो. सुट्टीच्या दिवशी फेशियल करायचा घाट घातला की, इतर कोणतीही काम आपल्याला करता येत नाहीत. त्यामुळेच की काय तुमच्या त्वचेची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय बाजारात येत असतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘हायड्रेटिंग मास्क’ (Hydrating sheet mask) हा शब्द आता तुम्ही अनेक ठिकाणी ऐकला असेल. पण या हायड्रेडिंट शीट मास्क बद्दल तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. त्याचा वापर, त्याचे फायदे आणि तोटे लक्षात घेऊन तुम्ही त्याचा अवलंब तुमच्या त्वचेसाठी करायला हवा. म्हणूनच आज जाणून घेऊया ‘हायड्रेटिंग मास्क’बद्दल अत्यंत महत्वाची माहिती

Face Sheet Mask : चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो येण्यासाठी वापरा ‘हे’ फेस शीट मास्क

हायड्रेटिंग मास्क म्हणजे काय?

शीट मास्कचा प्रातिनिधिक फोटो

Instagram

ADVERTISEMENT

फेशियलमध्ये क्लिझिंग आणि मसाज या स्टेप्स फारच महत्वाच्या असतात. कारण त्यावरच तुमचा ग्लो अवलंबून असतो.  पण हल्ली इतका वेळ कोणालाही नसतो. अशांसाठी हाडड्रेटिंग मास्क म्हणजे वरदानच आहे. कारण एकाच पॅकेटमध्ये तुम्हाला हे सगळे फायदे मिळतात. तुमच्या चेहऱ्याच्या आकाराला बसेल असा हा मास्क असतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या  गुणधर्माचे इसेन्शिअल ऑईल असते. तुमच्या चेहऱ्याला साजेसा मास्क शोधण्यासाठीही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही तर त्याच्या पाकिटावर सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या असतात. ते पाकिट आणून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हा मास्क लावायचा असतो. चमकणार्‍या त्वचेसाठी फेस शीट मास्क वापरुन पहा.

केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी उत्तम आहे अंड्याचा हेअर मास्क (Egg Hair Mask In Marathi)

हायड्रेटिंग मास्क लावताना

हायड्रेटिंग मास्क लावताना

Instagram

ADVERTISEMENT
  • तुमच्या पसंतीचा हायड्रेटिंग मास्क आणल्यानंतर तो लगेचच लावण्याची घाई करु नका. सगळ्यात आधी तुमचा चेहरा स्वच्छ करुन घ्या. 
  • जर तुम्ही फेशियलच्या ऐवजी हे करण्याचा विचार करत असाल तर मास्क लावण्याआधी थोडे स्क्रब करुन घ्या. घरी असलेला कोणताही स्क्रब तुम्हाला चालेल. 
  • चेहरा स्क्रब केल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करुन कोरडा पुसून घ्या. 
  • आता वेळ आहे तो म्हणजे मास्क लावण्याची. पाकिटातून मास्क काढताना अत्यंत हळुवारपणे तो काढायला हवा. कारण फेस सीरममध्ये हे हायड्रेटिंग मास्क बुडवलेले असतात. त्यामुळे ते सीरम फारच महत्वाचे असते. 
  • काही शीट मास्क हे डबल लेयरचे असतात. त्यातील एक लेअर तुम्हाला काढायचा असतो आणि पातळ लेअर चेहऱ्यावर ठेवून द्यायचा असतो. 
  • शीट मास्क व्यवस्थित लावल्यानंतर  पाकिट लगेच फेकून देऊ नका. कारण त्यामध्येही सीरम असते. ते सीरम व्यवस्थित काढून तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला लावा कारण ते फारच महत्वाचे असते. 
  • साधारण 15 ते 20 मिनिटं तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मास्क ठेवायचा असतो. हा मास्क अजिबात वाळत नाही. त्यामुळे तो वाळेल याची वाट पाहात राहू नका. 
  • 15 मिनिटांनी मास्क काढून चेहऱ्यावर असलेले सीरम छान चेहऱ्यामध्ये मुरुन घ्या. 
  • अशावेळी तुम्ही एखाद्या फेस मसाजरचा उपयोग केला तरी चालू शकेल.
  • फेशियलप्रमाणेच मास्क काढल्यानंतर तुम्ही अजिबात चेहरा त्या दिवशी धुवू  नका. 

हायड्रेटिंग शीट मास्क तुम्हाला कमालीची चकाकी देतात पण याचा सतत प्रयोग करु नका. महिन्यातून 2 वेळा हा मास्क वापरणे ठिक आहे. हे कायम लक्षात ठेवा. 

नितळ त्वचा हवी असेल तर वापरा हे ‘बेस्ट पील ऑफ मास्क’ (Best Peel Off Mask In Marathi)

11 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT