नितळ त्वचा हवी असेल तर वापरा हे 'बेस्ट पील ऑफ मास्क' (Best Peel Off Mask In Marathi)

नितळ त्वचा हवी असेल तर वापरा हे 'बेस्ट पील ऑफ मास्क' (Best Peel Off Mask In Marathi)

चेहरा हा आपल्या शरीराचा जणू आरसाच आहे. चेहऱ्यावरून आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख जगाला होत असते. यासाठी चेहरा सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी सर्वजण अनेक उपाय करत असतात. आजकाल वाढतं प्रदूषण, कामाचा ताणतणाव, धुळ आणि वातावरणात होणारे बदल यामुळे तुमच्या चेहऱ्यावर परिणाम होत असतो. यासाठी महिन्यातून किमान एकदा अथवा दोनदा त्वचा मुळापासून स्वच्छ करणे गरजेचे  आहे. कारण त्वचेवर जमा होणारी धुळ आणि माती तुमच्या त्वचेच्या आतील छिद्रांना ब्लॉक करते. शिवाय चेहऱ्यावर डेड स्किन देखील वेळेवर काढून टाकणं गरजेचं असतं. त्वचेच्या छिद्रांना बंद करण्याऱ्या या धुळ, माती आणि डेड स्किनला मुळापासून काढून टाकण्यासाठी पील ऑफ मास्क अगदी बेस्ट पर्याय आहे. कारण पील मास्कमुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ करते. यासाठी आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम पील ऑफ मास्क सूचवत आहोत ज्यांचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

Table of Contents

  बेस्ट पील ऑफ मास्क आणि त्यांचे फायदे, तोटे (Best Peef Off Mask)

  पील ऑफ मास्क लावणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे हे पील ऑफ मास्क तुम्ही घरीच वापरू शकता. एखाद्या चांगल्या ब्युटी सेंटर अथवा मेडिकलमधून तुमच्या आवडीचं आणि तुमच्या त्वचेला सूट होणारं पील ऑफ मास्क तुम्ही विकत घेऊ शकता. पील ऑफ मास्क लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.  त्यानंतर पील ऑफ मास्कमधील अगदी थोडंस जेल तुमच्या तळहातावर घ्या. तुमच्या बोटांच्या मदतीने ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. पील ऑफ मास्क लावताना ते डोळे, नाकपुड्या, ओठांवर पील ऑफ मास्क लागणार नाही याची काळजी घ्या. दहा ते पंधरा मिनीटे पील ऑफ मास्क सुकू द्या. चेहऱ्यावरील पील ऑफ मास्क सुकल्यावर तो बोटांच्या मदतीने हळूहळू काढा. मास्क काढण्यासाठी गालाच्या कडेपासून सुरूवात करा. ज्यामुळे तुमचा मास्क सहज निघेल. 

  Also Read About कोळशाचा चेहरा मुखवटा

  1. Himalaya Almond And Cucumber Peel Of Mask

  Skin Care

  Himalaya cucumber peel of mask

  INR 94 AT Himalaya

  हिमालया हा सौंदर्य आणि आयुर्वेदिक उत्पादनांमधील एक लोकप्रिय ब्रॅंड आहे. या पील ऑफ मास्कमधील काकडीच्या घटकांचा  तुमच्या सौंदर्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊ या काय आहे या पील ऑफ मास्कमध्ये

  कंपनी काय दावा करते -

  चेहऱ्यावरील मार्क्स आणि डाग कमी होतात

  त्वचा मऊ होते

  फायदा -

  दाह कमी होतो

  बदामाच्या घटकांमुळे तुमची त्वचा मऊ होते

  काकडीच्या घटकांमुळे तुमच्या त्वचेवरील डाग कमी होते

  तोटे -

  काकडीचा वास उग्र असतो

  काकडीची अॅलर्जी असेल तर त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ  शकतो.

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर- 

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी हे पील ऑफ मास्क उत्तम  आहे.

  2. Everyuth Naturals Orange Peel Off Mask

  Skin Care

  Everyuth naturals orange peel off mask

  INR 81 AT Everyuth

  एव्हरयुथ कंपनीचे हे ऑरेंज पील मास्क एक छान पील ऑफ मास्क आहे. विशेष म्हणजे यामुळे तुमच्या त्वचेच्या आतील धुळ माती, प्रदूषण , डेड स्किन कमी होते. त्वचा फ्रेश  आणि नितळ दिसू लागते.

  कंपनी काय दावा करते-

  या पील ऑफ मास्कमध्ये युनीक ट्रिपल फॉर्म्युला आहे

  नैसर्गिक घटक वापरल्यामुळे त्वचेसाठी उत्तम आहे.

  त्वचा अधिक तरूण आणि फ्रेश दिसते

  नियमित वापर केल्यास त्वचेचे टॅनिंग कमी होते

  फायदे-

  त्वचा मुळापासून स्वच्छ होते

  रक्ताभिसरण सुधारते

  त्वचा मऊ आणि चमकदार होते

  सहज उपलब्ध होऊ शकते

  वापरण्यासाठी सोपे आहे

  तोटे -

  याचा परिणाम फक्त दोन ते चार तासच दिसतो.

  या मास्कला एक प्रकारचा उग्र गंध आहे

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर - 

  सर्व प्रकारच्या त्वचा प्रकारासाठी हा पील ऑफ मास्क उपयुक्त आहे.

  3. Everyuth Golden Glow Peel Off Mask

  Skin Care

  Everyuth golden glow peel off mask

  INR 103 AT Everyuth

  एव्हरयुथ कंपनीच्या या पील ऑफ मास्क मुळे तुमची त्वचेची छिद्रे मुळापासून स्वच्छ होतात. शिवाय त्वचेवर सोनेरी झळाळी दिसू लागते.

  कंपनी काय दावा करते-

  त्वचेवर इन्संट ग्लो येतो

  त्वचेचे योग्य पोषण होते

  चेहऱ्यावर सोनेरी ग्लो येतो

  फायदा -

  त्वचा मुळापासून स्वच्छ होते

  हे फार खर्चिक उत्पादन नाही

  त्वचा मॉश्चराईझ होते

  त्वचेवरील डेड स्किन कमी होते

  पील ऑफ मास्क चेहऱ्यावर लवकर सुकतो

  तोटे -

  रंग सोनेरी असल्याने चेहऱ्यावर लावण्यापूर्वी विचित्र वाटते

  पील ऑफ मास्कचा वास उग्र आहे

  या मास्कमधील सोनेरी कणांमुळे तुम्हाला ते आवडत नाही

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर-

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त आहे

  4. Ponds White Beauty Peel Off Mask

  Skin Care

  Ponds white beauty peel off mask

  INR 97 AT Ponds

  पॉंड्स हा ब्रॅंड एक जुना सौंदर्य ब्रॅंड असल्यामुळे लोकांमध्ये याबद्दल एक विश्वासार्हता आहे. शिवाय या ब्रॅंडची इतर उत्पादनं जर तुम्ही वापरली असतील तर हा पील ऑफ मास्क तुम्ही नक्कीच वापरू शकता. 

  कंपनी काय दावा करते-

  चेहऱ्यावर उजळपणा येतो

  चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येतो

  फायदा -

  चेहऱ्यावरील डेड स्किन आणि प्रदूषण निघून जाते

  चेहऱ्यावर त्वरीत एक प्रकारचा उजळपणा आणि ग्लो येतो

  उत्पादन फार महागडे नाही

  सहज उपलब्ध होऊ शकते

  वापरण्यासाठी कठीण नाही

  पुरूष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त

  तोटे -

  त्वचेच्या समस्येसाठी हा उपयुक्त नाही

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त्

  Nutriglow Peel Of Mask

  Skin Care

  Nutriglow peel of mask

  INR 99 AT Nutriglow

  न्युट्री ग्लोचं हे  पील ऑफ मास्क तुम्ही चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येण्यासाठी वापरू शकता. 

  कंपनी काय दावा करते-

  चेहऱ्यावरचा निस्तेजपणा कमी होतो

  फ्री रेडीकल्सपासून त्वचेचे रक्षण होते

  तुम्ही तरूण दिसू लागता

  तेलग्रंथीवर नियंत्रण होते

  फायदा -

  चेहरा फ्रेश दिसतो

  त्वचा नितळ दिसू लागते

  पुरूष आणि महिला दोघांसाठी उपयुक्त

  त्वचेतील आर्द्रता टिकून राहते

  त्वचा मऊ आणि मुलायम होते

  तोटे -

  त्वचेवरील ब्लॅकहेड्स  आणि व्हाईट हेड्स मुळापासून निघत नाहीत

  त्यामधील घटकांची तुम्हाला अॅलर्जी असू शकते

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त

  Khadi Gold Peel Off Mask

  Skin Care

  Khadi gold peel of mask

  INR 139 AT Khadi

  कंपनी काय दावा करते-

  त्वचा मुळापासून स्वच्छ होते

  नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले आहे

  फायदा -

  नैसर्गिक घटकांचा वापर 

  चेहऱ्यावरील डाग कमी होतात

  त्वचा मऊ  आणि मुलायम होते

  त्वचेचे पोषण उत्तम होते

  तोटे-

  यातील नैसर्गिक घटकांची तुम्हाला अॅलर्जी असू शकते

  सहज उपलब्ध होत नाही

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  सर्व प्रकारच्या त्वचा प्रकारासाठी उपयुक्त आहे.

  Jovees Apricot And Honey Peel Off Mask

  Skin Care

  Jovees apricot and honey peel of mask

  INR 265 AT Jovees

  चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि डाग कमी होतात. या मास्कमुळे तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या अनावश्यक केसांची वाढ कमी होते. शिवाय मध आणि जर्दाळूच्या घटकांमुळे तुमची त्वचा मऊ आणि सुंदर दिसू लागते.

  कंपनी काय दावा करते-

  सुरकुत्या कमी होतात

  चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ कमी होते

  चेहऱ्यावरील धुळ-माती स्वच्छ होते

  त्वचा ओढली जाते

  फायदा -

  याचा गंध सुंदर आहे

  त्वचेचं उत्तम पोषण होतं

  चेहऱ्यावरील अनावश्यक केस नियंत्रित राहतात

  त्वचेवर हलके वाटते

  तोटे- 

  पुरुषांसाठी हे पील ऑफ मास्क योग्य नाही

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम 

  8. Nyah Gold Dust Peel Off Mask

  Skin Care

  Nyah gold dust peel off mask

  INR 146 AT Nyah

  हा तुमच्या त्वचेसाठा अगदी उत्तम असा पील ऑफ मास्क आहे. कारण यामुळे तुमच्या त्वचेवरील धुळ  आणि प्रदूषण कमी होते आणि त्वचा फ्रेश दिसू लागते.

  कंपनी काय दावा करते-

  त्वचा मऊ आणि नितळ होते

  त्वचेवरील अनावश्यक तेल निघून जाते ज्यामुळे चेहरा तेलकट दिसत नाही

  निस्तेज त्वचा सुंदर दिसू लागते

  फायदा -

  त्वचा मुळापासून स्वच्छ होते

  त्वचेवरील तेलकटपणा कमी होतो

  त्वचेचं योग्य पोषण होतं

  चेहरा फ्रेश दिसू लागतो

  यामधील घटक नैसर्गिक आणि चांगल्या गुणवत्तेचे आहेत

  यामुळे त्वचेची बंद छिद्रे मोकळी होतात

  त्वचेला पुरेशा ऑक्सिजनचा पूरवठा होतो

  तोटे -

  सहज उपलब्ध नाही 

  खर्चिक असल्याने सर्वसामान्यांना परवडणारे नाही 

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  हे उत्पादन तेलकट त्वचेसाठी उत्तम आहे

  9. Vlcc Glod Peel Off Mask

  Skin Care

  Vlcc glod peel off mask

  INR 175 AT Vlcc

  या पील ऑफ मास्कमुळे तुमच्या त्चचेचं पी एच संतुलन कायम राहण्यास मदत होते. शिवाय त्वचा स्वच्छ आणि मोकळी झाल्यामुळे तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू लागते. 

  कंपनी काय दावा करते-

  चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते

  त्वचेचं पी एच संतुलन टिकून राहतं

  त्वचेचं पोषण उत्तम होतं

  चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो

  फायदा -

  या पील ऑफ मास्कचा सुगंध चांगला आहे

  या मास्कमुळे तुमच्या त्वचेवरील अशुद्ध घटक निघून जातात

  त्वचेला ऑक्सिजनचा पुरेसा पूरवठा होतो

  सहज उपलब्ध होते

  चेहरा नितळ दिसू लागतो

  तोटे -

  वापरण्यासाठी आणि त्वचेवरून काढण्यासाठी थोडं त्रासदायक आहे

  परिणामांच्या मानाने ते थोडं महागडं आहे

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम आहे

  10. Vlcc Stawbery And Waterlilly Peel Off Mask

  Skin Care

  Vlcc stawbery and waterlilly peel off mask

  INR 280 AT Vlcc

  स्टॉबेरी आणि वॉटरलीलीने तयार केलेलं हे वीएलसीसीचं पील ऑफ मास्क तुम्हाला एक नितळ आणि सुंदर लुक देण्यासाठी उपयुक्त आहे. 

  कंपनी काय दावा करते-

  सुरकुत्या कमी होतात

  त्वचा खेचली जाते

  चेहऱ्यावरील डाग कमी होतात

  फायदा -

  चेहऱ्यावरील आर्द्रता टिकून राहते

  त्वचेचं योग्य पोषण होतं

  चेहऱ्यावरील तेलकटपणा आणि डाग कमी होतात

  चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते

  तोटे -

  महागडे आहे त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारे नाही

  स्टॉबेरी आणि वॉटरलीलीची अॅलर्जी असणाऱ्यांसाठी ते उपयुक्त नाही

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  कोरड्या आणि नॉर्मल त्वचेसाठी उत्तम आहे

  11. Biotique Bio Peach Clarifying & Refining Peel-Off Mask

  Skin Care

  Biotique Bio Peach Clarifying & Refining Peel-Off Mask

  INR 155 AT Biotique

  बायोटीकचं हे पील ऑफ मास्क तुमच्या त्वचेतील छिद्रांना मोकळं करते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला पुरेसं ऑस्किजन मिळतं. तुमची त्वचा फ्रेश आणि नितळ दिसू लागतं. तुम्हाला हा फेस पील ऑफ मास्क नक्कीच आवडेल.

  कंपनी काय दावा करते -

  त्वचा मुळापासून स्वच्छ होते

  त्वचेचं पोषण होतं

  चेहऱ्यावर चमक येते

  चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, चट्टे, काळसरपणा कमी होतो

  फायदा -

  त्वचेची छिद्रे मोकळी होतात

  चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो

  त्वचा मुळापासून स्वच्छ होते

  चेहऱ्यावर फ्रेशनेस दिसू लागतो

  त्वचा मऊ  आणि मुलायम होते

  पिंपल्स कमी होऊ शकतात

  तोटे -

  सहज उपलब्ध नाही

  सर्व त्वचा प्रकारासाठी उपयुक्त नाही

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  तेलकट आणि पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी परफेक्ट  आहे

  Wow Skin Science Activated Charcoal Peel Off Face Mask

  Skin Care

  Wow Skin Science Activated Charcoal Peel Off Face Mask

  INR 292 AT Wow

  चारकोलचा वापर केलेल्या पील ऑफ मास्कमुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होते. त्वचा मुळापासून स्वच्छ झाल्याने त्वचा नितळ आणि सुंदर दिसते.

  कंपनी काय दावा करते-

  त्वचेमधील ओलावा टिकून राहतो.

  त्वचा मऊ आणि मुलायम होते

  त्वचेवरील ब्लॅकहेड्स कमी होतात

  पॅराबीन फ्री आहे

  यात मिनरल ऑईलचा वापर केलेला नाही

  तुम्ही तरूण दिसता

  फायदा - 

  चारकोलमुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होते

  ब्लॅकहेड्स कमी होतात

  चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा कमी होतात

  कोरफडामुळे त्वचा मऊ आणि मुलायम दिसते

  तोटे -

  सगळीकडे अपलब्ध नाही

  महागडे आहे

  कोणत्या त्वचा प्रकारासाठी फायदेशीर -

  सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम आहे

  पील ऑफ मास्कबाबत असलेले महत्त्वाचे प्रश्न FAQs

  पील ऑफ मास्क वापरणं का गरजेचं आहे ?

  वातावरणात वाढलेलं धुळ आणि प्रदूषणामुळे तुमची त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसू लागते. त्वचेच्या छिद्रांमध्ये या गोष्टी अडकतात आणि त्यांना ब्लॉक करतात. मात्र पील ऑफ मास्कमुळे त्वचेवरील आणि त्वचेच्या मुळातील  धुळ, प्रदूषण निघून जाते. तुमच्या त्वचेची छिद्रं मोकळी होतात आणि तुमची त्वचा फ्रेश आणि मुलायम दिसू लागते.

  तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार पील मास्क निवडणं गरजेचं आहे का ?

  प्रत्येक त्वचेच्या प्रकाराला निरनिराळ्या प्रकारच्या काळजी आणि पोषणाची गरज असते. त्यामुळे या त्वचा प्रकारानुसार उत्पादने तयार करण्यात येतात. शिवाय त्यात वापरण्यात येणारे घटकांचा त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे तुमच्या त्वचा प्रकारानुसार पील ऑफ मास्क वापरणं गरजेचं आहे.

  पील ऑफ मास्क काढताना काय काळजी घ्यावी ?

  पील ऑफ मास्कमध्ये निरनिराळे घटक वापरण्यात आलेले असतात. त्यामुळे ते लावताना योग्य प्रमाणात लावणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते दिलेल्या प्रमाणात लावले तर ते सुकल्यावर सहज निघतात. शिवाय ते काढताना अलगद काढावेत. फार जोरात खेचून पील ऑफ मास्क काढू नये. 

  आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला या पील ऑफ मास्कचा कसा फायदा झाला हे आम्हाला जरूर कळवा.

  अधिक वाचा

  घरीच फ्रेंच मेनिक्युअर करण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

  तुमचेही केस कोरडे आहेत का? मग हे शॅम्पू तुमच्यासाठी आहेत बेस्ट

  उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी निवडा 'हे' बेस्ट सनस्क्रिन लोशन (Best Sunscreen for Oily Skin in Marathi)

  फोटोसौजन्य - शटरस्टॉक