एखाद्या कार्यक्रमासाठी अथवा घरात भरपूर माणसं येणार असतील तर आपण पिण्यासाठी मिनरल वॉटरची सोय करतो. यासाठी घरात सर्वांना सहज देता येतील अशा छोट्या आकारातील मिनरल वॉटरच्या बॉटल आणल्या जातात. आजकाल बाजारात विविध ब्रॅंडच्या मिनरल वॉटर बॉटल सहज मिळतात. तुम्ही जर या पाण्याच्या बाटल्यांचे नीट निरिक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की, खाण्या-पिण्याच्या वस्तूंप्रमाणे या बाटल्यांवरही एक्सपायरी डेट लिहिलेली असते. मग तुमच्या मनात नक्कीच प्रश्न निर्माण होतो की पिण्याच्या पाण्याचीदेखील असते का एक्सपायरी डेट, म्हणजेच पिण्याचं पाणी हवाबंद अवस्थेत असेल तरी खराब होतं का ? जाणून घ्या… तसंच वाचा पाण्याची बचत करण्यासाठी सोप्या टिप्स (How To Save Water In Marathi), पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे (Benefits Of Drinking Water In Marathi) आणि दररोज गरम पाणी पिण्याचे फायदे (Warm Water Benefits In Marathi)
पाण्याला एक्सपायरी डेट असते का ?
नैसर्गिक पाणी वास्तविक कधीच खराब होत नाही जोपर्यंत त्यामध्ये इतर दूषित घटक मिसळले जात नाहीत. नळाचं पाणी सहा महिने न ढवळता हवाबंद करून तसंच ठेवलं तर ते खराब होत नाही. कालांतराने फक्त त्याची चव बदलते पण तरिही ते व्यवस्थित स्टोअर केलं तर ते पिण्यायोग्य म्हणजे सुरक्षित असतं. मग असं असूनही बाजारात विकत मिळणाऱ्या मिनरल वॉटरच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते ? यासोबतच वाचा डिटॉक्स वॉटरचे फायदे आणि बनवण्याची पद्धत (Benefits of Making Detox Water In Marathi), नारळपाणी पिण्याचे फायदे (Coconut Water Benefits In Marathi) आणि फ्रिजचं थंड पाणी प्यायल्याने होणारे साईड ईफेक्ट्स – Side Effects of Drinking Cold Water in Marathi
या कारणासाठी मिनरल वॉटरवर असते एक्सपायरी डेट
मिनरल वॉटरच्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट असते कारण Food And Drugs Administration (FDA) म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन अशा विकत पाणी मिळणाऱ्या कंपन्यांवर लक्ष ठेवून असतं. कायद्यानुसार हवाबंद बाटलीत असलेल्या पाण्याचं शेल्फ लाईफ नोंदवण्याची गरज नसते. मात्र जर पाणी प्लास्टिकच्या बाटलीत बंद असेल तर कालांतराने त्या पाण्यात प्लास्टिक विरघळण्यास सुरूवात होते. ज्यामुळे पाणी दुषित होण्याची शक्यता वाढते. प्लास्टिक बनवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल्स कालांतराने या पाण्यात मिसळले जातात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते.अशा पाण्याची चव आणि गंध बदलतो. म्हणूनच सुरक्षेच्या कारणासाठी मिनरल वॉटरच्या बाटल्यांवर पॅकिंगनंतर दोन वर्षांनंतरची एक्सपायरी डेट देण्यात येते. कारण व्यवसायाच्या दृष्टीने पाण्याच्या बाटल्यांचे पॅकिंग करण्यासाठी प्लास्टिक बॉटल हे सोयीचं आणि स्वस्त मिळणारं साधन असते. म्हणूनच जर उद्योजकांनी सुरक्षित पद्धतीने पाणी बाटल्यांमध्ये स्टोअर केलं आणि एक्सपायरी डेटनुसार ते विकलं तर ग्राहकांना याचा धोका कमी जाणवतो. यासाठीच ग्राहकांनी हवाबंद मिनरल्स वॉटर विकत घेताना बाटलीवर नोंदवलेली एक्सपायरी डेट जरूर पाहावी.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक