ADVERTISEMENT
home / Festive
पूजा सावंतचे हे एथनिक लुक लग्नसमारंभासाठी आहेत परफेक्ट

पूजा सावंतचे हे एथनिक लुक लग्नसमारंभासाठी आहेत परफेक्ट

लग्नसोहळा म्हटलं की विविध प्रकारचे विधी आणि पद्धती या ओघाने आल्याच. त्यामुळे लग्नात अशा विविध विधींसाठी पारंपरिक आणि एथनिक लुक करणं मस्टच आहे. त्यात जर तुमच्या बहिणीचं अथवा एखाद्या जवळच्या मैत्रिणीचं लग्न असेल तर तुम्हाला या लग्नात अगदी खास दिसायचं असतं. मार्केटमध्ये यासाठी विविध प्रकारचे लेंहगे, साड्या अथवा सूट तुम्हाला मिळू शकतात. मात्र सर्वात हटके आणि सुंदर दिसायचं असेल तर यंदा तुम्ही पूजा सावंतचे हे एथनिक लुक नक्कीच ट्राय करू शकता. 

वेलवेट साडी –

पारंपरिक काठाच्या आणि प्युअर सिल्कच्या साड्या हा प्रत्येकीचा जीव की प्राण असतो. मात्र थोडं हटके आणि सर्वात बेस्ट दिसायचं असेल तर पूजा सावंतने कॅरी केलेली अशी ग्रीन साडी नेसण्यास काहीच हरकत नाही. फ्लोरल प्रिंट आणि ग्रीन वेलवेटच्या कॉंबिनेशनमुळे या साडीला एक वेगळाच लुक मिळाला आहे. बहिणीच्या मेंदी, संगीत अशा कार्यक्रमात तुम्ही हा लुक केला तर नक्कीच उठून दिसाल. या साडीसोबत पूजाने स्टाईल केल्यामुळे पूर्ण बाह्यांचे वेलवेट ब्लाऊज आणि गळ्यात एखादे चोकर अथवा नेकपीस घालुन तुम्ही सर्वात हटके दिसाल.

Instagram

ADVERTISEMENT

रॉ-सिल्क साडी-

लग्नसमारंभासाठी रॉ सिल्कच्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. एकतर प्युअर सिल्क असल्यामुळे या साड्या वजनाला खूप हलक्या असतात. शिवाय लग्नसमारंभात वावरताना त्यामुळे तुम्हाला आरामदायक आणि सुटसुटीत वाटतं. पूजाने कॅरी केल्याप्रमाणे हॉल्टरनेकचं ब्लाऊज जर तुम्ही या साडीवर घातलं तर तुमच्या नेहमीच्या साडीतही तुम्ही अगदी वेगळ्या दिसू शकाल. हातात भरपूर बांगड्या आणि मोठे कानातले घाला आणि केस मोकळे सोडा अथवा एखादा बन आणि त्यावर मोगऱ्याचा गजरा घालुन तुमचा एथनिक लुक कम्पीट होईल. 

Instagram

खण वनपीस –

लग्नसमारंभातील प्रत्येक विधीसाठी साडी अथवा लेंगाच हवा असं मुळीच नाही. तुम्ही तुमच्या बहिण, मैत्रीणीच्या लग्नातील मेंदी, हळद, संगीत या विधींसाठी खणाच्या साडीचा असा मस्त वनपीसदेखील कॅरी करू शकता. पूजाने घातलेला या वनपीसचा पॅटर्न इतका मस्त आहे  की त्यावर तुम्हाला ज्वैलरीपण घालण्याची गरज नाही. अगदी साधा पॅर्टन असूनही तुम्ही यात सर्वांपेक्षा वेगळ्या नक्कीच दिसू शकता. शिवाय वनपीस असल्यामुळे तुम्हाला या ड्रेसमध्ये खूपच सुटसुटीत वाटेल. 

ADVERTISEMENT

Instagram

सिल्क आणि खण कॉम्बिनेशन वनपीस –

बहिणीच्या अथवा मैत्रिणीच्या हळदी समारंभात उठून दिसायचं असेल तर हा एथनिक लुक अगदी बेस्ट आहे. कारण यात पिवळ्या आणि लाल रंगाच्या सिल्क आणि खण कापडाचा योग्य वापर करण्यात आला आहे. रंगामुळे तो हळदीच्या कार्यक्रमात रंगत आणेल. शिवाीय यात लेंग्यासारखा लुक असल्यामुळे तुमचा एथनिक लुकही पूर्ण होईल. नेहमीपेक्षा वेगळं पॅर्टन असल्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या दिसाल. 

ADVERTISEMENT

Instagram

प्युअर सिल्क साडी –

लग्नसमारंभ साडीशिवाय पूर्णच होणार नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे लग्नातील एखाद्या विधीसाठी अशी कांजिवरम अथवा बनारसी साडी  नेसणं मस्टच आहे. पूजाने नेसलेल्या निळ्या आणि गुलाबी रंगाच्या कांजिवरममुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून आलं आहे. अशा मोठ्या काठाच्या आणि पूर्ण साडीभर बुट्या असलेल्या कांजिवरममुळे तुम्हाला एक साजेसा लुक लग्नासाठी नक्कीच मिळू शकतो. 

Instagram

ADVERTISEMENT

लाईटवेट लेंगा –

लेंग्यासाठी विविध डिझाईन आणि पॅर्टन तुम्हाला मार्केटमध्ये मिळू शकतात. मात्र तुम्ही वजनाला हलका असलेला अथवा एखाद्या संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी लेंगा शोधत असाल तर हे पॅटर्न छान आहे. काळ्या रंगाच्या प्लेअर्स लेंग्यावर डिझायनर ब्लाऊजमुळे उठावदार पणा आलं आहे. त्यामुळे संगीत अथवा रिसेप्शनसाठी हा लुक तुम्ही नक्कीच करू शकता. 

Instagram

नऊवारी साडी –

लग्नातील महत्त्वाच्या विधींना बऱ्याचदा काठापदराच्या आणि नऊवारी साडीचा ड्रेस कोड दिला जातो. अशावेळी तुम्ही पूजासारखी ही काठापदराची खणाची साडी नक्कीच नेसू शकता. इतर सिल्कच्या साड्यांपेक्षा गर्भरेशमी इरकल अथवा खण वजनाला हलके आणि नऊवारीसाठी सुटसुटीत असतात. त्यामुळे जरी त्यावर तुम्ही भरपूर दागदागिने घातले तरी तुम्हाला जड अथवा कंटाळवाणं वाटत नाही. 

ADVERTISEMENT

Instagram

आम्ही सूचवलेले हे पूजा सावंतचे एथनिक लुक तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला जरूर कळवा आणि याप्रमाणे लग्नसमारंभात लुक केल्यावर तुमचा लुक कम्पीट करण्यासाठी मायग्लॅमचे मेकअप प्रॉडक्ट वापरण्यास मुळीच विसरू नका. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

लग्नासाठी बनारसी साडी खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

सणासुदीला ट्राय करा खणापासून तयार केलेले हे हटके आऊटफिट

जरी वर्कपेक्षाही शोभून दिसते गोटापत्ती वर्क, जाणून घ्या हा ट्रेंड

01 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT