साडी हे जगभरातील भारतीय महिलांचे पारंपरिक परिधान आहे. कोणत्याही महिलेकडे साडी नाही असं होत नाही. आता साडीच्या फॅशनमध्येही अनेक बदल झाले आहेत. साडी केवळ पारंपरिकच राहिली नाही. तर आता साडी म्हणजे एक स्टाईल स्टेटमेंट झाले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. आजही अनेक महिला आहेत ज्यांना साडी नेसण्याचा आत्मविश्वास तितकासा येत नाही. विशेषतः प्लस साईज (Plus Size Women) महिलांना काही कारणामुळे साडी नेसणे थोडे आरामदायी वाटत नाही. त्यांना साडीमध्ये आपण अधिक जाड तर दिसणार नाही ना? असा प्रश्न पडतो. पण कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा लग्न, साखरपुडा आणि अन्य अशा काही समारंभासाठी आपण साडीशिवाय इतर पर्याय सहसा पाहत नाही. तुम्ही तुमच्या शरीरयष्टीप्रमाणे साडी नेसण्याचा आणि साडी प्रिंटची निवड केली असेल तर तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. प्लस साईज महिलांनी नक्की साडी कशी नेसावी यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा करून घेता येईल.
स्टेप – 1
साडीचा लुक तेव्हाच चांगला येतो, जेव्हा ती व्यवस्थित नेसलेली असते आणि त्याच्या जास्त निऱ्या काढलेल्या असतात. साधारणतः साडी ही साडेपाच मीटरपर्यंत असते. त्यामुळे प्लस साईज महिलांना अधिक मोठी साडी विकत घेणे गरजेचे आहे. बाजारामध्ये तुम्हाला कदाचित यापेक्षा अधिक मोठी साडी मिळणार नाही. पण तुम्ही मॅचिंग कापड घेऊन त्याची लेंथ तुम्ही वाढवू शकता.
स्टेप – 2
यानंतर तुम्ही साडी पेटीकोटमध्ये टकइन करा. साडी नेसताना तुम्ही साडीची उंची जमिनीपर्यंत ठेवा. जेव्हा तुमची साडी व्यवस्थित टक इन होईल, तेव्हा तुम्ही त्याच्या व्यवस्थित निऱ्या काढणे सुरू करा. सहसा साडी नेसताना तुम्ही हिल्स घालून साडी नेसा. जेणेकरून तुमच्या साडीची उंची व्यवस्थित राहील.
स्टेप – 3
तसं तर साडीची निवड करताना तुम्ही दोन गोष्टीची काळजी घ्यायला हवी. एक तर तुम्ही डबल शेडची अर्थात दोन रंग असणारी साडी अजिबात नेसू नका. तसंच तुम्ही होरिझोंटल अर्थात आडव्या रेषांची साडी अजिबात निवडू नका. त्यापेक्षा तुम्ही त्याऐवजी उभ्या रेषांची साडी अथवा प्रिंटची साडी निवडल्यास तुम्ही अधिक बारीक दिसू शकता आणि त्याशिवाय तुम्ही उंच दिसू शकता.
स्टेप – 4
तुम्ही जर तुमच्या पद्धतीने साडीच्या निऱ्या काढणार असाल तर प्लेट्स तुम्ही अगदी सरळ ठेवा आणि वरच्या बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्ही निऱ्या काढल्यानंतर त्या व्यवस्थित टकइन करा आणि बेंबीच्या सरळ रेषेत प्लेट्स तुम्ही टकइन करा. प्लेट्स पेटीकोटमध्ये घातल्यानंतर तुम्ही व्यवस्थित पिन अप करा. सगळ्या निऱ्या एकत्र करून तुम्ही त्या पेटीकोटमध्ये घुसडू नका.
स्टेप – 5
आता आपण पदराच्या बाबतीतील गोष्ट पाहू. तुम्ही जर शोल्डर प्लेट्स अर्थात पदर काढत असाल आणि तुमचा खांदा रुंद असेल तर तुम्ही प्लेट्स व्यवस्थित रुंद ठेवा. पातळ निऱ्या काढल्यास, शरीरातील फॅट्स कव्हर होत नाहीत. तसंच त्यामुळे तुम्ही अधिक जाड दिसता आणि साडी नेसल्याचा फायदा होत नाही.
तुम्हीदेखील प्लस साईज असाल आणि तुम्हाला साडी नेसायला आवडत असेल पण ते जमत नसेल तर तुम्ही या सोप्या टिप्स नक्की वापरा आणि या टिप्स वापरून तुम्ही अधिक स्लीम दिसण्याचा करा प्रयत्न.