ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
tips-for-attractive-natural-lips-in-marathi

तुमच्या ओठांचा रंग नैसर्गिक दिसावा असं वाटतंय…मग वापरा सोप्या टिप्स

अत्यंत फ्रेश आणि मऊ ओठ दिसण्यासाठी खरंतर सर्वप्रथम लिप बाम वापरण्यासाठी सांगण्यात येतो. आपण ओठ चांगले राहण्यासाठी अनेक गोष्टी करून पाहतो. याबाबत आम्ही अधिक चर्चा केली आहे ती म्हणजे अजॉय सेनगुप्ता, प्रमुख-रिटेल ट्रेनिंग, एनरिच यांच्याशी.  तुमच्या ओठांचा रंग नैसर्गिक दिसावा आणि ओठ कायम आकर्षक राहावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या नियमित आयुष्यात काही गोष्टी काळजीपूर्वक करत राहणे आवश्यक आहे आणि त्या नेमक्या गोष्टी कोणत्या आहेत ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. 

ओठांचा रंग नैसर्गिक राहण्यासाठी काय करावे 

  • ग्लॉसी फिनिश असो किंवा मॅट लिपस्टिक शेड वापरण्याअगोदर नेहमी लिप बामने सुरुवात करा. बहुतेक भारतीय स्त्रिया मॅट लिपस्टिकला प्राधान्य देतात, काही नवीन लिपस्टिक इंक हलक्या असतात तर, काही दिवसभर टिकून राहणाऱ्या. त्यापैकी बहुतेक एकदाच वापरल्या जातात – परंतु वारंवार व योग्यरित्या न वापरल्यास अनेक स्तर होऊ शकतात ज्यामुळे ओठ कोरडे होतात. म्हणूनच लिपस्टिक वापरण्या अगोदर लिप बाम वापरा
  • तुम्ही तुमच्या स्किनकेअर उत्पादनांचा वापर करता तसेच नियमितपणे लिप बाम वापरा आणि लिपस्टिक, लिपलाइनर, लिप क्रेयॉन, लिप इंक यासारखे तुमच्या आवडीचे लिप कलर लावण्यापूर्वी लिप बामचा हलका कोट लावा (तुम्ही तुमच्या मेकअप रूटीनच्या सुरुवातीला तुमचे ओठ ओले करू शकता, तुमचा सर्व मेकअप लावा आणि नंतर ओठांचे करा – जर तुम्ही जास्त बाम लावला असेल, तर ते टिश्यूने हलकेच दाबा, पुसून टाकू नका परंतु जास्तीचे बाम काढून टाका आणि तुमच्या ओठांच्या रंगात मिसळा) ओठांचा पोत गुळगुळीत करण्यासाठी लिप बाम लिपस्टिकला खराब करत नाही.
  • लक्षात ठेवण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे लिप लाइनर आणि पेन्सिल. पसंतीच्या लिपस्टिकशी लिप पेन्सिल जुळवा किंवा तुमच्या ओठांच्या नैसर्गिक रंगाला शोभणारी योग्य न्यूड शेड शोधा. जर तुमचे ओठ गडद किंवा रंगद्रव्य असतील तर तुमचे ओठ उठावदार दिसण्यासाठी न्यूड रंगाची निवड करा. लिप पेन्सिल केवळ ओठांवर मूळ आवरण म्हणून काम करत नाही तर, ती तुम्हाला दीर्घकाळ टिकणाऱ्या ओठांचा रंग देईल, रंग उठून दिसण्यास मदत करेल आणि निस्तेज दिसणार नाही. ओठांची संरचना सुबक करण्यास मदत करेल आणि तुमच्या लिपस्टिकला वितळण्यास आणि पसरण्यास प्रतिबंधित करेल. 
  • लक्षात ठेवा की, तुमचे ओठ देखील त्वचाच आहे, म्हणून तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावरील त्वचेप्रमाणेच ओठांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुमचे ओठांची एक्सफोलिएशन (पापुद्रे स्वच्छ करा), तुम्ही लिप स्क्रब विकत घेऊ शकता किंवा DIY बनवू शकता, जुना टूथब्रश किंवा थोडासा ओला टॉवेल वापरून ओठ स्क्रब करू शकता आणि झोपण्यापूर्वी लिप बाम वापरा.
  •  एक्सफोलिएशन तुमच्या ओठांच्या पृष्ठभागावरील कोरडी मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते, तसेच तुम्हाला चांगले परिणाम देण्यासाठी तुमच्या लिप बामला खोलवर जाण्यास मदत करते. एक प्रो टीप: आठवड्यातून एकदा तुमचे ओठ एक्सफोलिएट करणे सुरू करा आणि लिप बामचा वापर करा.

तुमच्याकडे पिवळा अंडरटोन असल्यास, उबदार (वोर्म) रंग निवडा. सामान्य अंडरटोन्स असलेले लोक जवळजवळ सर्व शेड्स वापरू शकतात. जेव्हा तुम्हाला लिपस्टिक रंग निवडी बाबत शंका असेल तेव्हा, तुमच्या ओठांचा त्वचेच्या टोनच्या आधारावर रंग निवडा. गोरी त्वचा असल्यास, लाल, गुलाबी रंगाचे विविध शेड्स  किंवा सॉफ्ट कोरल यासारख्या शेड्स तुमच्या ओठांच्या वरच्या भागासाठी योग्य असू शकतात. गडद प्लम्स, लाल आणि बेरीचे फिके गडद रंग त्वचेच्या टोनवर विलक्षण दिसतात. उत्कृष्ट आणि आकर्षक दिसण्यासाठी गडद जांभळा, गडद बेरी आणि रॉयल लाल यांसारख्या छटा वापरून पहा. 

तुम्हाला एक्सपर्ट्सकडून आम्ही काही महत्त्वाच्या बाबी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीही याचा वापर करून आपले ओठ अधिक सुंदर आणि आकर्षक करण्याचा नक्की प्रयत्न करू शकता. आपल्या त्वचेची काळजी घ्यायलाच हवी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
24 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT