खूप जणांसाठी साबुदाणा खिचडी जीव की प्राण असते. साबुदाणा खिचडी काही जणांना इतकी आवडते की, त्यांचा प्रत्येक दिवस हा उपवास असतो फक्त साबुदाणा खिचडी खाण्यासाठीच. अशा #sabudanakhichdi खाणाऱ्या प्रत्येकांसाठी आजचा विषय हा खूप महत्वाचा आहे. कारण आज आपण परफेक्ट साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. साबुदाणा खिचडी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येते? अशी मस्त मोकळी आणि लुसलुशीत अशी खिचडी. पण काही जणांची खिचडी ही गिचकी, साबुदाणे पांचट आणि तेलकट अशी खिचडी होते. पण तुम्हाला मस्त पांढरी शुभ्र आणि छान अशी खिचडी बनवायची असेल तर तुम्ही या काही टिप्सचा अवलंब नक्कीच करु शकता.
मिरचीची साबुदाणा खिचडी
खूप जणांकडे मिरचीचा उपयोग करुनच साबुदाणा खिचडी बनवली जाते. साबुदाणा खिचडी बनवणे हे सगळ्यात सोपे आहे.
सगळ्यात साधी भिजलेला साबुदाणा घेऊन तुम्हाला त्यामध्ये दाण्याचा कूट आणि बटाटे घालायचे आहेत.
कढईत तूप किंवा तेल गरम करुन त्यामध्ये जीरं, मिरचीची फोडणी देऊन त्यामध्ये थेट तुम्हाला तयार खिचडीचे मिक्स घालायचे असते. चांगली ढवळून पाण्याचा थोडासा हबका मारुन बंद करुन ठेवायचे आहे. पण जर तुम्हाला लुसलुशीत अशी खिचडी हवी असेल तर त्यामध्ये साधारण एक चमचा दूध घालून मग झाकण बंद करुन थोडी शिजू द्यायची आहे. असे केल्यामुळे खिचडी ही छान मऊ होते. जी खायला देखील छान लागते.
मसाल्याची साबुदाणा खिचडी
मिरचीच्या साबुदाणा खिचडीप्रमाणे तुम्हाला मसाल्याची देखील साबुदाणा खिचडी करता येते. त्यामध्ये मिरची ऐवजी तुम्ही घरी असलेला लाल मसाला किंवा लाल तिखट वापरु शकता.
आता भिजलेला साबुदाणा, मसाला, शेंगदाणा कूट आणि बटाटे असे सगळे तुम्हाला एकत्र करायचे आहे.
कढईत दोन चमचे तूप गरम करुन तुम्ही त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. त्यामध्ये खिचडी घालून तुम्हाला परतून घ्यायची आहे. पाण्याचा हबका किंवा चांगल्या चवीसाठी तुम्ही त्यामध्ये दूध घालायचे आहे. ही खिचडीसुद्धा तशीच छान फुगलेली दिसते.
Chaitra Navratri Wishes in Hindi
या टिप्सही ठेवा लक्षात
- साबुदाणा चांगला भिजणे यामध्ये गरजेचे असते. साबुदाण्यामध्ये तो बुडण्याइतकेच पाणी घालायला हवे. त्यामध्ये जास्त पाणी घातले तर त्यांचा रंग खूपच जास्त पारदर्शक होतो. इतकेच नाही
- साबुदाण्याची खिचडी गिचकी व्हावी असे वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्ये खूप जास्त पाणी घालू नका.
- साबुदाणे हे कमी भिजता कामा नये. कारण असे केले तर ते टणक आणि कडक लागतात.
- साबुदाण्यामध्ये पाण्याऐवजी जर तुमही दूध घालतले तर ते अधिक चांगले लागते. ही टीप लक्षात ठेवा. ज्यांना दूध आवडत नाही. त्यांना यामध्ये दूध घातले आहे की नाही हे देखील कळणार नाही. या शिवाय तुम्हाला भेसळयुक्त साबुदाणा देखील ओळखता यायला हवा
आता साबुदाणा खिचडी बनवताना ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमची खिचडी मस्त लुसलुशीत होईल.