ADVERTISEMENT
home / Budget Trips
कमी खर्चात वेकेशन प्लॅन करण्यासाठी सोप्या टिप्स

कमी खर्चात वेकेशन प्लॅन करण्यासाठी सोप्या टिप्स

वेकेशन प्लॅन करताना अनेकांना जास्त पैसे खर्च होण्याची चिंता सतावत असते. त्यामुळे कमी पैसे असतील तर अनेकजण फिरण्याचा प्लॅन रद्द करतात. मात्र जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर कमी पैशातही तुम्ही तुमची आवड जपू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या वेकेशनचं योग्य प्लॅनिंग करण्याची गरज आहे. ज्यामुळे तुमचं बजेटमध्ये तुमचं वेकेशन करू शकता. योग्य नियोजन आणि विचारपूर्वक केलेलं प्लॅनिंगमुळे तुम्ही कमी पैशातही तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरून येऊ शकता. 

100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi

सर्वात आधी योग्य नियोजन करा 

जर तुमचं फिरण्याचं बजेट कमी असेल तर तुम्हाला विचारपूर्वक आणि नियोजन करूनच प्रवास करायला हवा. कारण अचानक बिना नियोजन तुम्ही प्रवासाचा बेत आखला तर तुमचे गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतात. यासाठी तुमचं बजेट किती, तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे आणि त्यासाठी लागणारा प्रवास आणि राहण्याचा, जेवणाचा खर्च याचे प्लॅनिंग करा. तुम्ही कुठून कुठे आणि किती दिवस फिरणार हे एकदा ठरलं की बजेट ठरवणं सोपं होतं.

पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं (Places To Visit In Pune In Marathi)

ADVERTISEMENT

ऑफ सीझन ट्रॅव्हल करा 

वेकेशन पिरिएडमध्ये जर तुम्ही प्रवासाचा बेत केला तर सहाजिकच तुमचा खर्च वाढू शकतो. उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, ख्रिसमस सुट्टी या काळात अनेक लोक वेकेशनवर असतात. अशा काळात मागणी जास्त असल्यामुळे प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च जास्त होतो. मात्र जर तुम्ही ऑफ सीझन प्रवास केला तर तुम्हाला नेहमीपेक्षा कमी पैसे लागू शकतात. शिवाय या काळात गर्दी कमी असल्यामुळे तुम्हाला फिरण्याचा खरा आनंद घेता येतो.

Tips For Traveling On A Budget in Marathi

नाशिक पर्यटन स्थळे (Nashik Tourist Places In Marathi)

होम स्टे अथवा होस्टलमध्ये राहा

महागड्या हॉटेलमध्ये राहण्याचं तुमचं बजेट नसेल तर तुम्ही होस्टेल अथवा होम स्टेचा पर्याय राहण्यासाठी निवडू शकता. होस्टेलमध्ये तु्म्हाला इतरांसोबत रूम शेअर करावी लागते. सोलो ट्रिपसाठी हा उत्तम पर्याय आहे. पण जर तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करत असाल तर तु्म्हाला होम स्टेचा पर्याय योग्य ठरू शकतो. आजकाल अनेक ठिकाणी होम स्टे करण्याची व्यवस्था असते. ज्यामुळे तुमच्या राहण्याच्या बजेटमध्ये नक्कीच फरक पडतो. 

सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घ्या

कमी खर्चात फिरायचं आहे तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते. एखाद्या दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी जर तुम्ही विमानापेक्षा रेल्वे अथवा बसचा पर्याय निवडला तर तुम्हाला कमी खर्च लागू शकतो. त्याचप्रमाणे गाडी अथवा टॅक्सीपेक्षा तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर तुमचे बजेट खूपच कमी होऊ शकते.

ADVERTISEMENT

लोकल हॉटेलमध्ये जेवण करा

पर्यटन स्थळी गेल्यावर तुम्ही एखाद्या महागड्या रेस्टॉरंट अथवा हॉटेलची जेवणासाठी निवड केली तर तुमचा खर्च नक्कीच वाढेल. पण त्याऐवजी जर तुम्ही लोकल न्याहारी गृह, खानावळ अथवा हॉलेटमध्ये जेवला तर तुमचा खर्च कमी होतो. शिवाय बऱ्याचदा अशा लोकल ठिकाणी खाल्लेले खाद्यपदार्थांची चवीला उत्तम असतात. कारण ते पारंपरिक पद्धतीने बनवलेले असतात. 

05 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT