home / DIY फॅशन
कांजिवरम आणि बनारसी साड्यांमधील फरक ओळखणं होतंय कठीण तर ओळखा असे

कांजिवरम आणि बनारसी साड्यांमधील फरक ओळखणं होतंय कठीण तर ओळखा असे

फॅशनच्या जगामध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात, बदल होत असतात पण काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. फॅशनमध्ये साडी ही सर्वांचीच आवडती आहे. साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. साडी नेसण्याच्या पद्धती आणि फॅशन कितीही वेगळ्या केल्या तरीही कांजिवरम (Kanjivaram) आणि बनारसी (Banarasi) साडीचं वेड हे कधीच कमी होणार नाही. प्रत्येक स्त्री ला आपल्या वॉर्डरोबमध्ये कांजिवरम आणि बनारसी साड्या हव्याच असतात. पण बऱ्याचदा खऱ्या आणि खोट्या कांजिवरम आणि बनारसी या साड्यांमधील फरक कळत नाही. खरं तर बनारसी ही साडी उत्तर प्रदेशच्या वाराणसी शहरात तयार होते आणि कांजिवरम ही साडी दक्षिणेतील कांचीपुरममध्ये तयार होते. पण या दोन्ही साड्यांमधील फरक बऱ्याच जणांना कळत नाही. 

दोन्ही साड्यांमधील फरक

दोन्ही साड्यांचा इतिहास आणि त्यावर करण्यात येणारी कलाकुसर ही वेगळी आहे. पण फक्त या दोन्ही साड्यांमध्ये एकच धागा समान आहे आणि  तो म्हणजे या दोन्ही साड्या सिल्कपासून तयार होतात आणि दोन्ही साड्यांच्या किमती जास्त असतात. बनारसी साडी ही मुघल साम्राज्यादरम्यान अस्तित्वात आली आणि त्यामुळे या साडीचं डिझाईन हे मुघलांपासून प्रेरित आहे. कलगा, बेल आणि पत्ते यासारखे डिझाईन्स तर बनारसी साडीची ओळख आहेत. तर कांजिवरम साडीमध्ये दक्षिण भारतातील डिझाईन्स दिसतात आणि या साडीची बॉर्डर थोडी जाड असते. त्यामुळे ही साडी त्याच्या पदरावरून ओळखली जाते.  पण दोन्ही साड्यांना भरजरी काठ असल्याने बऱ्याच जणांना या साड्यांमध्ये गोंधळ होतो. पण ज्यांना साड्यांची चांगली जाण आणि आवड आहे त्या व्यक्ती कधीही या साड्यांमध्ये गोंधळ घालत नाहीत. 

सणाला साडी नेसून दिसायचं असेल स्टायलिश तर फॉलो करा Draped Saree

साडीच्या धाग्यातील फरक

या दोन्ही साडींमधील दुसरा जाणून घेण्याचा फरक म्हणजे कांजिवरम साडीचे धागे विणण्यासाठी सोन्याच्या धाग्यांचा वापर करण्यात येतो. तर बनारसी साडी तयार करण्यासाठी जरीचा वापर करण्यात येतो. यामध्ये चांदी आणि सोन्याच्या दोन्ही धाग्यांचा वापर करण्यात येतो. लग्नासाठी बनारसी साडी आणि लेहंगा या दोन्हीला खूपच मागणी असते. बनारसी साडीचे रंग नवरीच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालतात. तर कांजिवरमचा साजही कमी नाही. लग्नामध्ये वधूला खास कांजिवरम साडी आणि त्याला साजेशा दागिन्यांने नटवून अधिक सुंदरता वाढवली जाते. या दोन्ही साड्या कोणत्याही महिलेचं सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी अप्रतिम आहेत. 

साडीचे नव्या ट्रेंडमधील 5 प्रकार – कशी नेसावी साडी

खऱ्या कांजिवरम आणि बनारसी साड्या कशा ओळखाल

बाजारात वेगवेगळ्या पद्धतीच्या बनारसी आणि कांजिवरम साड्या मिळतात. आपण कमी किमतील भुलून अथवा खऱ्या कांजिवरम आणि बनारसी साड्या न ओळखता आल्यामुळे चुकीच्या साड्या घरी घेऊन येऊ शकतो. पण त्यासाठी तुम्ही आधीच काळजी घ्या.  आता या साड्या नक्की ओळखायच्या कशा ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

साडी नेसताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, मिळवा परफेक्ट लुक

  • सर्वात पहिले बनारसी साडी असेल तर त्याचे डिझाईन हे नेहमी पारंपारिक असते हे लक्षात ठेवा. त्याशिवाय याच्या पदराच्या खाली 6 – 8 इंच लांब अगदी प्लेन सिल्कचे फॅब्रिक असते
  • याशिवाय बनारसी साडीवर मुघल पॅटर्नचे अमरू, अंबी आणि दोमक अशा स्वरूपाचे डिझाईन्स असतात ज्यामुळे ही खरी बनारसी आहे हे ओळखता येते
  • बनारसी आणि कांजिवरम साड्यांचे सिल्क हे खरे कसे ओळखावे तर त्याच्या चमकदारपणावरून. सिल्कच्या साड्या या अत्यंत चमकदार असतात आणि जर कोणत्याही साडीची चमक फिकट असेल तर त्या साड्या बनारसी अथवा कांजिवरम नाहीत
  • कांजिवरम साडी विकत घेताना त्यावर थोडंसं खरडून पाहा. खरवडल्यावर तुम्हाला त्याखाली लाल सिल्क आहे असं जाणवलं तर ही साडी खरी आहे आणि जर तसं नाही झालं तर ही साडी नकली आहे असं समजावं
  • बनारसी आणि कांजिवरम साडीचे सिल्क हे वेगवेगळ्या रंगाच्या धाग्यांनी विणलेले असते त्यामुळे त्याची चमक वेगळी असते. लाईट बदलल्यानंतर जर सिल्कचा रंग बदललेला दिसता तर ती खरी साडी समजावे
  • ओरिजनल सिल्क ओळखण्यासाठी तुम्ही तुमच्या अंगठीचाही वापर करू शकता. अंगठी खरवडून पाहा. त्याचा लाल सिल्क रंग दिसायला हवा
  • त्याशिवाय ओरिजनल सिल्क हे अतिशय हल्के असते. त्यावरूनही तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

15 Feb 2020

Read More

read more articles like this
good points logo

good points text