प्रत्येक घरात आल्याचा वापर केला जातो. मुळात ज्यांना चहाची आवड आहे त्यांच्याकडे तर आल्याचा भरणाच असतो. आलं हे केवळ स्वादासाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही याचा फायदा असतो. पण बऱ्याचदा आपण आलं जास्त विकत आणतो. पण आलं जर फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवलं नाही तर ते कुसतं अथवा त्याला पाणी सुटतं आणि ते खराब होतं. बराच काळ आलं टिकून राहावं यासाठी नक्की काय करायला हवं ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आल्याचा वापर तसा तर स्वयंपाकघरात खूपच होत असतो आणि मसाल्यात, चहात अथवा काही वेळा आरोग्यासाठीही आपल्याला आल्याचा वापर करता येतो. अशावेळी आलं आपण कसं टिकवून ठेवायचं हादेखील प्रश्न पडतो. कारण आलं सतत लागत असल्याने आपण किती वेळा आणायला जाणार म्हणून भारंभार आणतो. पण मग ते खराब होतं म्हणून टाकून द्यावं लागतं. आलं टिकवून ठेवण्यासाठी जाणून घेऊया काही सोप्या टिप्स.
वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स
आलं टिकविण्याच्या काही सोप्या टिप्स
Shutterstock
1. आलं टिकवून ठेवायचा जर तुमचा विचार असेल तर आल्याची खरेदी करताना आलं ओले आणि मॉईस्चर असणारे नाही ना हे तपासून घ्या. सुके आणि स्वच्छ आले हे जास्त काळ सुरक्षित राहते.
2. जास्त काळ आलं टिकविण्यासाठी तुम्ही आले झिपलॉक असणाऱ्या बॅगेत साठवून ठेऊ शकता. फक्त झिपलॉक करताना त्यात हवा राहणार नाही याची काळजी घ्या आणि त्यानंतरच ही बॅग फ्रिजमध्ये ठेवा. आलं झिपलॉकमध्ये ठेवल्यानंतर किमान सात ते आठ दिवस टिकते. पण त्यानंतर मात्र खराब होते.
3. तुम्हाला आलं किमान आठवडाभर टिकवायचं असेल तर तुम्ही आलं न सोलता पेपर बॅग अथवा पेपर, टॉवेल यामध्ये न धुता तसंच लपेटून फ्रिजमध्ये ठेवा. आलं खराब होत नाही.
4. आलं धुऊन आणि सोलून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट एका आईस ट्रे मध्ये भरा आणि फ्रिजरमध्ये जमू द्या. क्यूब्स तयार झाले की, एअर टाईट कंटेनरमध्ये हे भरा आणि फ्रिजरमध्ये पुन्हा स्टोअर करा. अशा तऱ्हेने आलं साधारण एक महिना टिकते. तसंच त्याचा स्वादही तसाच राहतो.
5. आलं नीट धुऊन घ्या. त्यानंतर ते सोलून जारमध्ये ठेवा आणि त्यामध्ये लिंबाचा रस मिसळून तो जार फ्रिजमध्ये ठेवा. आलं लवकर खराब होत नाही.
6. ज्याप्रमाणे लिंबाचा रस पिळून आलं तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता. त्याचप्रमाणे आल्याचे तुकडे करून तुम्ही त्यात व्हिनेगर मिक्स करून फ्रिजमध्ये ठेवल्यास, आलं व्यवस्थित स्टोअर होते.
7. आलं नीट सोलून धुवा. त्याचं पाणी सुकू द्या आणि त्यानंतर काचेच्या जारमध्ये ठेवा. त्यामध्ये अॅसिटिक लिक्विड घालून फ्रिजमध्ये स्टोअर करा.
आरोग्य आणि स्मरणशक्तीसाठी वरदान आहे आलं (Health Benefits Of Ginger In Marathi)
आलं टिकवून ठेवण्याआधी काही गोष्टींकडे द्या लक्ष –
Shutterstock
- तुम्हाला आलं बऱ्याच वेळेपर्यंत टिकवायचं असेल तर ते सोलू नका आणि त्याचे काप काढूनही ठेऊ नका
- सोललेलं आणि कापलेलं आलं हे लवकर खराब होतं
- हवा अथवा दमटपणा आल्याला लागू दिला नाही तर आलं तीन आठवड्यांपर्यंत टिकू शकते
- तुम्हाला आल्याचे तुकडे करून ठेवायचे असतील तर ते तुकडे तुम्ही टाईट कंटेनरमध्ये भरून फ्रिजरमध्ये ठेवा तरच टिकतील