ADVERTISEMENT
home / Dry Skin
tips to take care of dry skin during monsoon in Marathi

पावसाळ्यात त्वचा कोरडी पडत असेल तर अशी घ्या काळजी

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढू लागते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडण्याची शक्यता असते. जर तुमची त्वचा मुळातच कोरडी असेल तर यामुळे समस्या अधिकच वाढू शकते. पावसाळ्यात तहान कमी लागते ज्यामुळे शरीराला पाणी कमी मिळते. असं झाल्यास त्वचा डिहायट्रेट होऊन कोरडी पडते. सहाजिकच पावसाळा सुरू होतात ड्राय स्कीन असलेल्या लोकांनी त्वचेची योग्य निगा राखायला हवी. यासाठी पावसाळ्यात फॉलो करा या कोरड्या त्वचेसाठी या स्कीन केअर टिप्स (Skin Care Tips For Dry Skin During Monsoon)… यासोबतच वाचा पावसाळ्यासाठी सर्व प्रकारच्या त्वचेसाठी आणखी काही पावसाळी स्कीन केअर टिप्स | Skin Care Tips For Monsoon In Marathi, कोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय (Dry Skin Care Tips In Marathi), कोरड्या त्वचेसाठी उत्तम क्लिंन्झर (Best Cleanser For Dry Skin In Marathi)

हायड्रेट राहा

पावसाळा सुरू होताना वातावरण धड उबदारही नसतं आणि धड कोरडंही नसतं. अशा वातावरणात अति उकाड्यामुळे तुम्हाला भरपूर घाम येतो. घामावाटे तुमच्या शरीरातील पाणी कमी होतं आणि त्वचा कोरडी होते. म्हणूनच पावसाळ्यातही योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी शरीरासाठी पुरेसं असतं. जर तुम्हाला पाणी पिण्याचा कंटाळा असेल, तहान लागत नसेल तर तुम्ही लिंबू पाणी, नारळपाणी, सरबत, ताक, लस्सी पिऊ शकता. ज्यामुळे शरीर हायड्रेट राहील.

मॉइस्चराइझर लावायला विसरू नका 

त्वचा हाताला रखरखीत लागत असेल तर तुमच्या त्वचेला मॉइस्चरायझरची गरज आहे ओळखा. स्कीन केअर रूटिनमध्ये यासाठी योग्य मॉइस्चराइझरची निवड करा. कारण त्वचेवर क्रीम अथवा लोशन लावण्यामुळे त्वचेचं योग्य पोषण होतं. पावसाळ्यात तुम्ही जेल बेस्ड मॉइस्चराइझर वापरू शकता पण त्वचा अति कोरडी असेल तर मात्र क्रीम बेस्ड मॉइस्चराझरच बेस्ट ठरेल.

कोमट पाण्याने अंघोळ करा

पावसाळ्यात वातावरणात थंडावा वाढू लागताच तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करू लागता. मात्र अति गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमच्या त्वचेचा मऊपणा कमी होतो. त्वचा कोरडी आणि रखरखीत होते. यासाठी पावसाळ्यात जरी वातावरण थंड असलं तरी कोमट पाण्याने अंघोळ करा. खूप वेळ अंघोळ करत बसू नका. कारण कोमट पाण्यानेही बराच वेळ अंघोळ केल्यास त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता असते. 

ADVERTISEMENT

चांगला आहार घ्या

पावसाळ्यात तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचं आहे. कारण या दिवसांमध्ये तेलकट, चमचमीत पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. ज्याचा नकळत परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेण्यावर भर द्या. आहारात भरपूर सॅलेड, ताज्या भाज्या, सिझनल भाज्या आणि फळं असतील तर तुमच्या त्वचेचं नक्कीच चांगलं पोषण होईल.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

15 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT