प्रेम… हा फक्त शब्द नसून एक भावना आहे. हे कधीही आणि कोणावरही जडू शकतं. यामध्ये ना वयाचं बंधन असतं ना धर्माचं ना दुसरं काही परिमाण. मैत्री तरी विचार करून करता येते पण प्रेम हे फक्त प्रेम असतं. हे विचार करून करता येत नाही. बस्स…ते जडतं. काही कपल्समध्ये बरेचदा वयाचं अंतर जास्त असतं. पण असं काही नाही की, वयाचं अंतर जास्त असेल तर त्यांच्यातील प्रेम हे कोणत्या अटींवर आधारलेलं आहे. तसंच कोणालाही त्यांच्या प्रेमावर टीका करायची संधी आहे. जर तुमचा पार्टनरही तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच माहीत असल्या पाहिजेत.
स्टॅबिलीटी
जर तुम्हा दोघांमध्ये 5-10 वर्षाचं अंतर असेल तर त्यामानाने तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा जास्त स्टेबल आहे. मग ते फायनेन्शियल मॅटर असो वा पर्सनल, तो प्रत्येकबाबतीत तुमच्या पुढे असेल. त्याच्याकडे जास्त सेव्हींग्स असतील आणि तो नात्याबाबतही जास्त मॅच्युर असेल. तुम्ही त्याला फायनेन्शियल गोष्टींबाबत विचारू शकता, कारण त्याच्यापेक्षा चांगला सल्ला तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही. कारण त्याला तुमच्या पैशांची नाहीतर तुमची गरज आहे. पण अशा नात्यांमध्ये अनेकदा तुम्हाला इतरांकडून मनीडिगर ठरवलं जाऊ शकतं. जर तुम्ही एकमेंकावर खरंच प्रेम करत असाल तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
आपापसात ईगो ईश्यू नसेल
जेव्हा पार्टनर्स एकाच वयाचे किंवा एकाच प्रोफेशनमधले असतात. तेव्हा बरेचदा त्यांच्या नात्यात अहं भावना येण्याची शक्यता असते. पण जेव्हा वयात अंतर असतं तेव्हा या गोष्टींचं टेन्शन नसतं. जर एखाद्याकडून चूक होत असेल तर दुसरा सांगायला संकोच वाटत नाही आणि एकमेंकाना लगेच माफ करतात. जर तुमचा पार्टनरही तुमच्यापेक्षा वयाने मोठा असेल तर ही गोष्ट होईल की, तो नेहमीच तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहील. यामागील कारण म्हणजे तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रोफेशनल शर्यत नसेल. एकाची जरी ग्रोथ झाली तरी दुसऱ्याला नक्कीच आनंद होईल.
त्याने पाहिलंय जग
तुम्हाला हेही माहीत असंल पाहिजे की, जर तुम्ही आत्ता जगाच्या शर्यतीत उतरला असाल तर त्याने आयुष्याचे काही चढ-उतार आधीच पाहिलेले असतील. तुमच्या दोघांची स्वप्न आणि त्यांना पूर्ण करण्याची ओढही वेगळी असेल. आयुष्याबाबत जी स्वप्नं तुम्ही पाहिली असतील, ती कदाचित त्याची पूर्ण करून झाली असतील. समजा जर तुम्हाला फिरायचं असेल किंवा शॉपिंग करणं आवडत असेल तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, त्याच कदाचित तुमच्या आधीच तिकडे जाणं झालं असेल किंवा त्या जागी तुमच्याबरोबर जायला त्याला आवडणार नाही. त्यामुळे निराश होऊ नका. अशा ठिकाणी तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत फिरायला जा किंवा सोलो ट्रॅव्हलिंगची आयडियाही वाईट नाही.
विश्वास ठेवा त्याच्या मॅच्युरिटीवर
याबाबत दुमत नाही की तो तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त मॅच्युर असेल. जर तुमच्या नात्याची सुरूवात असेल तर कदाचित त्याचं एखाद नातं जगूनही झालं असेल. त्याने जर आयुष्याशी निगडीत एखाद्या गोष्टीबाबत सल्ला दिल्यास तो नक्की फॉलो करा. ज्या चूका त्याच्याकडून झाल्या आहेत त्या चुका तो तुम्हाला कधीच पुन्हा करू देणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्याला कोणताही सल्ला देऊ शकत नाही. जर तो तुमच्याशी त्याचे प्रोब्लेम शेअर करायला तयार असेल तर तुम्हीही त्याला नक्कीच सल्ला द्या. वयाने तो मोठा आहे म्हणजे त्याला काही प्रोब्लेम्स नसतील असं तर नक्कीच नसेल.
संवाद गरजेचा आहे
नात्यामध्ये जर संवाद नसेल तर वयाचं अंतर असलेली मॅच्युरिटी काहीच कामाची नाही. असं होऊ शकतं की, तुमच्या दोघांचं घर, कामाचं ठिकाण आणि शेड्यूल वेगवेगळं असले पण तरीही कनेक्टेड राहायचा प्रयत्न करा. जास्त बोलणं शक्य नसेल तर एखादा मेसेज तरी नक्की करून ठेवा. पार्टनर्समध्ये संवाद सुरू असताना काही काही छोट्या छोट्या गोष्टीही खूप जादूच्या कांडीसारखं काम करतात. एज गॅपचा अजून एक मोठा फायदा म्हणजे तुमच्याकडे बोलायला बरेच टॉपिक्स असतात. जसं तुमच्या हॉबीज, इंटरेस्ट्स आणि मित्रांबाबतच्या काही गोष्टीबाबत बोला. काही कॉमन इंटरेस्ट डेव्हलप करा.
लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा
असं नातं असल्यास अनेकदा तुम्ही लोकांच्या गॉसिप्सचा विषय ठरता. तुमचा समजूतदारपणा यातच आहे की, लोकांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करा किंवा त्यांना सडेतोड उत्तर देऊन त्यांचं तोेड बंद करा. असं होईल की, लोक तुम्हाला गोल्ड डिगर म्हणतील किंवा तुमच्या पार्टनरबद्दल वाईट सल्ला देतील. पण अशा गोष्टींमुळे नाराज होऊ नका. कारण अशा गोष्टींमुळे तुमचं प्रेम आणि नातं अजून मजबूत होण्यास मदत होईल. त्यामुळे असा गोष्टी तुम्ही दोघांनी हसण्यावारी नेल्यास तुमचं चांगल आहे. लक्षात ठेवा की, एकमेंकावरील विश्वासाशिवाय काहीही महत्त्वाचं नाही. तुमच्या नात्यासाठी कोणाच्याही सर्टीफिकेटची गरज नाही.
त्याला हवं तसं वागताना
तो त्याच्या आयुष्याबद्दल एकदम क्लिअर असेल. त्याला चांगलंच माहीत आहे की, आयुष्यात त्याचं काय करून झालंय, तो काय करत आहे आणि काय करणार आहे. त्यामुळे कदाचित तो तुम्हाला त्याच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगणारही नाही. जर तो त्याच्या मित्रांना भेटायला जाताना तुम्हाला नेणं टाळत असेल तर ते चुकीचं आहे. या गोष्टीची त्याला जाणीव नक्की करून द्या. जर त्याला फक्त त्याच्या मताप्रमाणे जगायचं असेल तर त्याच्या आयुष्यात तुमचं महत्त्व नाहीयं. त्यामुळे या गोष्टी आधीच क्लियर केलेल्या चांगल्या ठरतील. जर तुम्ही त्याला प्रत्येक गोष्टीत साथ देत असाल तर त्याने रिएक्ट होण्याची गरज आहे.
काही वेळ स्वतःसाठी
तुमच्या दोघांचे करिअर गोल्स, प्रायोरिटीज आणि फॅमिली इश्यूज सगळंच वेगळ असेल. एवढ्या भिन्नता असूनही जर तुमचं एकमेंकावर प्रेम असेल तर एकमेंकासाठी नक्की वेळ काढायला हवा. फिरायला गेल्यावर किंवा एकत्र असताना फक्त वर्तमानाबद्दलच बोला. कारण तेव्हाच तुम्हाला दोघांना क्वालिटी टाईम मिळणार आहे. असं काहीतरी करा जे तुम्हाला दोघांना आवडत असेल. निगेटीव्हिटी विसरून फक्त तो क्षण एकत्र जगा. हवं असल्यास एकमेकांचे रोल स्वॅप करा आणि त्या क्षणांचा आनंद घ्या.
नेहमी द्या एकमेंकाना साथ
जेव्हा एज गॅप असते तेव्हा एकमेकांना जास्त चांगल्या रितीने समजून घेण्याची गरज असते. प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून आणि सांभाळून घेण्यासाठी त्याचं मोठे वय आणि तुमचा बालीशपणा यांचा बॅलन्स साधणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्याच्यावर डिपेंड करू शकता तर त्यालाही काही गोष्टी तुमच्यावर टाकून बेफिकीर राहता आलं पाहिजे. तुम्ही वयाने लहान असलात तरी साथ देताना तुमच्या विचारातही थोडी मॅच्युरिटी आणायला हवी. एकमेकांना पँपर करण्यात एक वर्ष जातं पण त्यानंतर एकमेकांना समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं.
फिजीकल गरजा असतील वेगळ्या
फिजीकल गरजांचा अर्थ फक्त सेक्स नाही तर एकमेंकाना मिठी मारणं किंवा किस करणं हेही असू शकतं. कोणत्याही नात्यातील दृढपणा येण्यासाठी टच इफेक्ट फारच महत्त्वाचा असतो. त्यामुळे याचं महत्त्व नक्की समजून घ्या. सेक्सच्याबाबतीत बोलायचं झाल्यास ज्या पोझिशनमध्ये तुम्ही कंफर्टेबल असाल त्यात तो असेलच असं नाही. अशा वेळी एकमेंकाशी मोकळेपणाने बोला. नवीन पोझिशन्स ट्राय करायला संकोच करू नका. तुमच्या पार्टनरला हे समजलं पाहिजे की, पहिल्यांदा त्याने हे सर्व अनुभवलं असलं तरी तुमच्यासाठी ते नवीन आहे.
हेही वाचा –
जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात ‘प्रेम’