लग्न सोहळ्यातील महत्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने. विशेषत: महाराष्ट्रीयन लग्नात दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. पण मध्यंतरीच्या काळात कुंदन, अमेरिकन डायमंड या दागिन्यांची क्रेझ आली आणि मग सोन्याचेही दागिने अनेकांना नकोसे होऊ लागले. अनेक महाराष्ट्रीयन लग्नात तुम्ही अशा प्रकारचे दागिने नववधूने देखील घातलेले पाहिले असतील.पण आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांची मागणी वाढली आहे. इतर कोणत्याही नव्या डिझाईनच्या वेस्टनाईज दागिन्यांपेक्षा वेगवेगळ्या पेहरावावर पारंपरिक दागिने घालण्याचा एक ट्रेंड आला आहे.विशेष म्हणजे हुबेहूब पारंपरिक दागिन्यांचे खोटे दागिने बाजारात मिळू लागले आहेत. तेही अगदी माफक दरात. आता तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी दागिने घ्यायचे तर तुम्हाला लगेच सोन्याचे दागिने म्हणजे किती खर्च असा विचार करायची गरज नाही. तर तुम्ही आम्ही दाखवलेले हे प्रकार सहज बाजारातून घेऊ शकता तेही अगदी परवडणाऱ्या दरात…यामध्ये गळ्यातील दागिने, गळ्यातील हार आहेत. या दागिन्यांची नावे आणि स्टायलिंग याची माहिती तुम्हाला आज आम्ही देणार आहोत.
Table of Contents
- नवरीसाठी गळ्यातील दागिने | Maharashtrain Bridal Jewellery
- ठुशी
- चंदनहार
- शाहीहार
- टेंपल ज्वेलरी
- राणी हार
- मराठी पारंपारिक गळ्यातील दागिने | Marathi Paramparik Dagine
- चिंचपेटी
- कोल्हापुरी साज
- बोरमाळ
- पुतळी हार
- पुतळी चपला हार
- गळ्यातील दागिने नवीन प्रकार | New Haar Designs
- गेरु फिनिश चोकर
- स्टोन्स नेकलेस
- हेरम हार
- फॅन्सी चोकर
- ऑक्सिडाईज चोकर
- अशी घ्या दागिन्यांची काळजी
नवरीसाठी गळ्यातील दागिने | Maharashtrain Bridal Jewellery
नवरीचा श्रुंगार हा खुलवण्यासाठी खास गळ्यातील दागिने आपण पाहणार आहोत. आम्ही असे काही प्रकार निवडले आहेत जे अगदी पारंपरिक आहेत. पण तरीही त्यांचा साज हा नवरीला खुलवल्याशिवाय राहात नाही. जाणून घेऊया गळ्यातील हार प्रकारातील काही दागिने
ठुशी
गळ्यालगत घातला जाणारा हा प्रकार. आता तुम्हाला माहीत आहे याला ‘ठुशी’ का म्हणतात? तर तुम्ही ठुशी नीट निरखून पाहिली तर बारीक मण्यायामध्ये ठासून भरलेल्या असतात. म्हणूनही ठुशी. अगदी बारीक बारीक मण्या यामध्ये गुंफलेल्या असतात. आता यातही अनेक प्रकार आहे. जो साधा आणि ठुशीचा बेसिक प्रकार आहे त्यामध्ये तुम्हाला गोलाकार रुपात सोनेरी रंगाचे मणी गुंफलेले दिसतील. मध्यभागी एखादा मोठा गोलमणी असेल. किंवा छोटेसे पेडंट असेल. या शिवाय चपट्या पट्टीवर जर मणी गुंफलेले असतील तर त्याला पट्टी ठुशी म्हणतात.याशिवाय मोरणी ठुशी,मोहनमाळ ठुशी असे प्रकार आहेत.जर तुम्ही अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन पद्धतीची साडी नेसली असेल तर हा दागिना शोभून दिसतो
चंदनहार
गुजराती लोकांकडे अगदी आवर्जून केला जाणारा हा प्रकार म्हणजे चंदनहार. ज्याप्रमाणे आपल्याकडे ठुशी किंवा कोल्हापुरी साज ठरलेला असतो अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या येथे हा हार करण्याची पद्धत आहे. थोडीशी जाळीसारखी डिझाईन असलेले हे चंदन हार दिसायला खूपच सुंदर आणि ट्रेंडी दिसतात. तुम्हाला त्याच त्याच टिपिकल डिझाईन्स आवडत नसतील तर तुम्ही चंदनहार देखील घेऊ शकता. अगदी कितीतरी तोळ्यापासून ते एक ग्रॅमपर्यंत तुम्हाला हा हार मिळतो. गळ्यालगत एखादा दागिना घातल्यानंतर तुम्ही त्याखालोखाल काही मोठा दागिना घालण्याचा विचार करत असाल तर हा हार तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे.
शाहीहार
शाहीहार हा महिलांचा सगळ्यात आवडता असा हाराचा प्रकार आहे. लेयर्समध्ये असलेला हा हार खूप कपड्यांवर चांगला शोभून दिसतो. साडी असो वा एखादा इंडोवेस्टर्न ड्रेस तुम्हाला तुमच्याप्रमाणे त्याची स्टायलिंग करता येऊ शकते. हल्ली शाहीहारामध्ये वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये मध्येमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स असतात. ज्यामुळे त्याचे सौंदर्य अधिक वाढते. काठापदराची साडी किंवा कठापदराचा ड्रेस असे तुम्ही काही घातले असेल तर तुम्हाला त्यावर शाहीहार घालता येऊ शकतो. जो दिसायला खूपच सुंदर दिसतो.
वाचा – Motyache Dagine Designs In Marathi
टेंपल ज्वेलरी
हल्ली सगळ्यात फॉर्ममध्ये असलेला दागिन्यांचा प्रकार म्हणजे टेंपल ज्वेलरी या ज्वेलरी दिसायला खूपच सुंदर असतात. टेंपल ज्वेलरीमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती यांना गुंफले जाते. टेंपल ज्वेलरीमध्ये गळ्यालगतचे चोकर आणि हेरम म्हणजेच लांब असे हार मिळतात. हे हार छान जाड असतात. त्यामुळे नवरी म्हणून घालताना तुम्ही दोन हार घातला तर तुम्हाला इतर काहीही घालायचे गरज नाही. हे दोन हार पुरेसे असतात. जर तुम्हाला इतर कोणाच्या लग्नासाठी हे हार घालायचे असतील तर तुम्ही त्यापैकी एक हार घालू शकता. हे हार अधिक उठून दिसतात.
राणी हार
मराठमोळ्या दागिनांमध्ये मोडणारा आणखी एक हार म्हणजे राणीहार. राणीहार सगळ्या हारांची शान आहे असे म्हणायला हवे कारण राणी घातल्यानंतर तुमचा गळा संपूर्ण भरल्यासारखा वाटतो. राणीहार हा दोन किंवा तीन पदरी असतो. राणीहाराच्या प्रत्येक पदराला बारीक बारीक डीझाईन केलेली असते. त्यामुळे हा हार अगदी घसघशीत वाटतो. विशेषत: लग्न समारंभात तुम्ही एखादी काठापदराची साडी, पैठणी, इरकल असे काही प्रकार घातले असतील तर तुम्ही हा एक नुसता हार घातला तरी तुम्हाला चांगला वाटू शकेल. त्यामुळे तुम्ही हा नक्की घालून पाहा
मराठी पारंपारिक गळ्यातील दागिने | Marathi Paramparik Dagine
मराठमोळे पारंपरिक दागिने हे दिसायला नेहमीच सुंदर दिसतात. असे दागिने तुम्हाला साडी किंवा नऊवारी साडीवर नक्कीच घालता येतात. मराठी पारंपरिक गळ्यातील दागिने निवडायचा विचार करत असाल तर तुम्ही Marathi Paramparik Dagine घालू शकता.
चिंचपेटी
ठुशीसारखाच गळ्या लगत घालण्याजोगा प्रकार म्हणजे चिंचपेटी. पण ठुशीपेक्षा हा प्रकार फारच वेगळा आहे. मोत्यामध्ये या हाराची गुफंण करण्यात येते. किर्तीमुख आणि मत्स्य याचे नक्षीकाम त्यावर असते. हा हार अगदी ताठ कॉलर असल्यासारखा दिसतो. हा देखील एक पारंपरिक दागिना असून आता यामध्ये अनेक प्रकार पाहायला मिळतात. अगदी 500 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत हे हार मिळतात.
कोल्हापुरी साज
कोल्हापुरी साज या नावावरुनच तुम्हाला कळाले असेल की, हा कोल्हापुरकरांची शान असलेला दागिना आहे. या दागिन्याचे विशेष सांगायचे झाले तर हा दागिना लाखेवर तयार केला जातो. कोल्हापूरमध्ये तो अधिक घातला गेला म्हणून त्याला कोल्हापुरी साज असे म्हटले जाते. साधारण 60 वर्षे जुना असा हा दागिन्याचा प्रकार आहे. कोल्हापुरी साजमध्ये जावमणी आणि पानड्या (वेगवेगळ्या आकारांची पाने) सोनाच्या तारेमध्ये गुंफली जातात. याशिवाय यामध्ये चंद्र, बेलपान, शंख, कासव, भुंगा अशी शुभ शकुने मानल्या जाणाऱ्या गोष्टी असतात. हाराच्या मध्यभागी एक गोलाकार आकाराचे पेंडट असते.
बोरमाळ
बोरमाळ हा देखील महाराष्ट्रीयन दागिन्यांमधील पारंपरिक प्रकार आहे.लहान बोरांच्या आकारासारखे मणी या माळेत गुंफलेल असतात. म्हणून त्याला बोरमाळ असे म्हणतात.काठापदरांच्या साड्यांवर हे हार शोभून दिसतात. आता या दागिन्याचे विशेष सांगायचे तर सोन्यात हा दागिना घडवताना फार पैसे जात नाहीत.कारण या दागिन्याला फार सोने लागत नाही. पातळ पत्र्याचे मणी बनवून त्यात लाख भरण्यात येते. त्यामुळे पूर्वीच्या काळी हा दागिना सगळ्याच महिलांकडे सर्रास असायचा. आता या मध्ये व्हरायटी आलेली पाहायला मिळते. दोन ते तीन पदर असलेल्या बोरमाळा हल्ली सगळीकडे पाहायला मिळतात. गळ्यातील हार प्रकारातील हा एक उत्तम प्रकार आहे.
पुतळी हार
अत्यंत पारंपरिक असा हाराचा प्रकार म्हणजे पुतळी हार. पुतळी हार हा दोऱ्यामध्ये ओवलेला असतो. हा हार गळ्यालगत आणि मोठा असा दोन्हीही स्वरुपात मिळतो. यामध्ये पान ओवलेली असतात. सोन्याची पान किंवा इमिटेशन ज्वेलरीची पाने असे तुम्हाला यामध्ये वापरता येते. पुतळी हार घातल्यानंतर एक वेगळाच साज चढतो. तुम्हाला जर सोन्यामध्ये करुन घेणार असाल तर तो तुम्हाला एक ग्रॅममध्ये देखील करता येऊ शकतो.
पुतळी चपला हार
पुतळी हार यामध्ये चपला म्हणजेच चपटे कॉईन्स लावले की, तयार होतो पुतळी चपला हार. पुतळी हारमधील पुतळी या थोड्या लांब लांब असतात. पुतळी चपला हार मध्ये त्या जवळजवळ गुंफलेल्या असतात. त्यामुळे असे हार अधिक चांगले दिसतात. पुतळी चपला हार घालायचा विचार करत असाल तर तुम्हाला तो लांब आणि लहान अशा दोन्ही स्वरुपात घेता येईल.
गळ्यातील दागिने नवीन प्रकार | New Haar Designs
गळ्यातील दागिने प्रकारातील काही लेटेस्ट असे दागिने तुम्ही नक्की ट्राय करु शकता. तुम्हाला काही वेगळे दागिने तयार करायचे असतील तर हे काही प्रकार नक्की ट्राय करु शकता.
गेरु फिनिश चोकर
हल्ली गेरु फिनिश दागिन्यांचा चांगलाच ट्रेंड आहे. गेरु फिनिश केलेले दागिने थोडे लालसर असतात. त्यामुळे ते खप चकाकत नाहीत तर ते सुंदर दिसतात. गेरु फिनिश चोकर हे दिसायला खूपच सुंदर दिसतात. गेरु फिनिश चोकरमध्ये वेगवेगळे पँडेंट आणि मण्यांचे आकार असतात. साडी किंवा एखादा ड्रेस घातल्यानंतर त्याचा लुक वाढवण्यासाठी हे दागिन्याचे हे प्रकार छान उठून दिसतात. हल्ली अनेक दागिन्यांमध्ये त्याचे पेटेंड बदलण्याचीदेखील सोय केलेली असते.
स्टोन्स नेकलेस
हल्ली स्टोन्स नेकलेस खूपच चांगले ट्रेंडमध्ये आहेत. खड्यांचे काम केलेले पेंडेंट आणि त्याच्या आजुबाजूला छान माळा असलेले नेकलेस दिसायला खूपच सुंदर दिसतात. इंडो-वेस्टर्न अशा कोणत्याही आऊटफिटवर हे छान उठून दिसतात. स्टोन्स नेकलेस घेऊन तुम्ही छान स्टायलिंग करु शकता. स्टोन्स नेकलेस वेगवेगळ्या रंगामध्ये आणि पॅटर्नमध्ये मिळतात. त्यामुळे ते सुंदरच दिसतात.
हेरम हार
हेरम हार हा थोडा लांब असतो. यामध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. हे हार दिसायला खूपच सुंदर दिसतो.यामध्ये टेंपल ज्वेलरीदेखील मिळते. हेरम हारमध्ये इतकी विविधता असते की असे सेट्स तुमच्या साडीची शोभा वाढवतात. गळ्यातील हार पाहताना हा पर्याय देखील तुम्ही नक्की ट्राय करु शकता.
फॅन्सी चोकर
तुम्हाला गळ्या लगत असणारे हार आवडत असतील तर तुम्ही फॅन्सी चोकर देखील ट्राय करु शकता. हे चोकर अगदी सिंगल लेअर पासून ते मल्टी लेअरमध्ये मिळतात. हल्ली कुंदन वर्क केलेले फॅन्सी चोकर दिसायला खूपच छान दिसतात. एखाद्या साध्या साडीलाही फॅन्सी लुक देण्याचे काम करतात. त्यामुळे तुम्ही असे फॅन्सी चोकर नक्की ट्राय करा.
ऑक्सिडाईज चोकर
सध्या सिल्हवर किंवा ऑक्सिजाईज दागिन्यांचा ट्रेंड आहे. पंजाबी ड्रेस किंवा एखाद्या सिल्व्हर बॉर्डरच्या साडीवर तुम्हाला असे चोकर घालता येतात. हे चोकर दिसायला सुंदर दिसतात. ऑक्सिडाईज चोकर गोल, चौकोन अशा वेगवेगळ्या आकारात मिळतात. त्यामुळे ऑक्सिडाईज चोकरही तुम्ही ट्राय करायला हवेत. ट्रेडिशनल डिझाईन असलेले चोकर असतात. तुमच्याकडे एखादी सिल्व्हर बॉर्डरची साडी असेल तर तुम्हाला ऑक्सिडाईज चोकर वापरता येतील.
अशी घ्या दागिन्यांची काळजी
इमिटेशन प्रकारचे दागिने सोन्याच्या तुलनेत एकदम स्वस्त आणि मस्त असतात. हे दागिने योग्य वापरले तर जास्त टिकतात सुद्धा जास्त. त्यामुळे त्यांची काळजी घेताना तुम्ही नेमकं काय करायला हवं ते जाणून घेऊया.
- इमिटेशन ज्वेलरी कायम प्लास्टिक बॉक्समध्ये भरुन ठेवा. त्यामुळे ते खराब होत नाही.
- इमिटेशन ज्वेलरी घातल्यानंतर त्यावर कधीही परफ्युम लावू नका. कारण त्यामुळे त्याचा रंग खराब होण्याची शक्यता असते.
- इमिटेशन दागिने महाग मिळतात. हे दागिने महाग असतील त्यावर वापरलेले कोटिंग हे जास्त चांगले असते. त्यामुळे ते टिकण्यास मदत मिळते.
- इमिटेशन दागिन्यांच्या कानातले दांडे हे पटकन वाकू शकतात. त्यामुळे दागिन्यांमधील कानातले ठेवताना तुम्ही ते नीट ठेवा.
- इमिटेशन ज्वेलरीवर खडे असतील तर ते छान कापडात बांधून ठेवा एकमेकांना घासणार नाही याची नक्कीच काळजी घ्या.
आता गळ्यातील दागिने निवडताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या.