Advertisement

अॅक्सेसरीज

नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 27, 2019
नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)

Advertisement

कोणत्याही नववधूची शॉपिंगची लिस्ट ही मोठीच असते. पण त्यात सर्वात जास्त खरेदी करायची असते ती दागिन्यांची. त्यातही जर महाराष्ट्रीयन नववधू असतील तर जसे मराठी उखाणे महत्त्वाचे असतात. तसंच मोत्यांच्या दागिन्यांना सर्वात जास्त पसंती दिली जाते. मोत्यांच्या दागिन्यांनी कोणत्याही नववधूच्या सौंदर्यात जी भर पडते ती अगदी सोन्याच्या दागिन्यांनीही येत नाही. सहसा महाराष्ट्रीय लग्नामध्ये सध्या नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यावर मोत्यांचे दागिने अगदीच शोभून दिसतात. इतकंच नाही तर मोत्यांच्या साजात सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यामुळे मोत्यांच्या दागिन्यांना नेहमीच जास्त मागणी असते. अगदी लग्नाचा हंगाम असो वा नसो मोत्यांच्या आकर्षक दागिन्यांची खरेदी नेहमीच केली जाते. कारण कोणत्याही समारंभात हे दागिने तुम्हाला अधिक आकर्षक बनवतात. 

एखादा सण जवळ यायला लागला की कोणते कपडे घालायचे किंवा कोणती हेअरस्टाईल करायची त्यावर काय दागिने घालायचे हे सगळं आपण ठरवत असतो. या सगळ्यात पहिल्या क्रमांकावर दागिने असतात. साडी किंवा आपण नक्की काय घालणार आहोत यावरून आपण कोणते दागिने घालणार हे ठरतं. पण कोणत्याही समारंभामध्ये मोत्यांच्या दागिन्यांची शोभा ही काही औरच! पारंपरिक पेहराव आणि मोत्यांचे दागिने हे समीकरण तर जणू जुळलेलंच आहे. पण हे दागिने नक्की कसे निवडायचे हेदेखील आपण समजून घ्यायला हवं. 

लग्नासाठी मोत्यांच्या दागिन्याची निवड कशी करावी? (How To Choose Pearl Jewellery For Wedding)

बरेचदा मोत्यांचे दागिने खरेदी करताना नक्की काय करायला हवं किंवा कशा प्रकारे खरेदी करायला हवी याची माहिती नसते. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोत्यांचे दागिने खरेदी करत असताना आपल्याला मोत्यांबद्दल किमान माहिती तरी असायला हवी. आपल्या पिवळा मोती आणि पांढरा मोती असे दोन प्रकार नक्कीच माहीत असतात. पण खरा मोती कोणता याची पारख ही दुकानदारांनाच असते. मोत्यांचे अनेक प्रकार असतात. त्यामध्ये रिअल कल्चर्ड मोती, बसरा मोती, साऊथ सी, फ्रेश वॉटर फॉल, ताहिती सी, व्हेनेझुला, माबे मोती असे मोत्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी बसरा आणि व्हेनेझुला हे दोन्ही मोती समुद्रामध्ये तयार होतात. खरं तर समुद्रात मिळाणारे मोती हे टिकायला जास्त चांगले असतात. शिवाय त्याचा लुकही जास्त आकर्षक असतो. मोत्यांना आकार नसते. ते अजिबातच गोल आकाराचे नसतात. त्यापासून ठराविक दागिनेच वापरले जातात. चिंचपेटी, तन्मणी, नथ, कुड्या, मोत्यांची रस, लफा असे ठराविक पण आकर्षक दागिने मोत्यांपासून तयार होतात, जे बघितल्यानंतर तुम्ही ते खरेदी केल्याशिवाय राहूच शकत नाही. या मोत्यांचा रंग मोतिया, पांढरा, करडा आणि खाकी अशा प्रकारांमध्ये असतो. पण खरेदी करताना तुम्हाला नक्की कोणता मोती आहे इतपत विचारण्याइतकी माहिती तरी असायला हवी. प्रत्येक मोती हा वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कोणत्या कपड्यांवर कोणत्या प्रकारचे दागिने घालायचे आहेत हे ठरवून त्याप्रमाणेच मोत्यांच्या दागिन्यांची खरेदी करा. सहसा लग्न समारंभामध्येच मोत्यांचे दागिने जास्त प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे या ठिकाणी नववधूसाठी मोतिया आणि पांढऱ्या रंगाच्या मोत्यांचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. 

Also Read Jewellery Trends In Marathi

खऱ्या मोत्यांचे प्रकार (Type Of Pearls)

खऱ्या मोत्यांचे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला त्याची माहिती आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. आपल्याला फक्त चांगलं दिसलं की आपण लगेच त्याची खरेदी करतो. पण नक्की कोणता मोती आहे आणि मोत्यांचे किती प्रकार असतात ते आपण पाहूया. 

रिअल कल्चर्ड मोती (Real Cultured)

Instagram

रिअल कल्चर्ड मोती हे मानवनिर्मित आहेत. शिंपल्याच्या आतमध्ये एक खास गोळी टाकली जाते आणि त्यानंतर त्या शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. या मोत्यांपासून सर्व प्रकारचे दागिने बनवण्यात येतात. तसंच हे मोती गोलाकार असून याचा रंग सहसा मोतिया, पांढरा आणि गुलाबी असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा तजेलदारपणा दीर्घकाळापर्यंत टिकून राहातो. 

हाफ पर्ल (Half Pearl)

Instagram

हा मोत्यांचा थोडा वेगळा प्रकार आहे. पण हा मोतीदेखील मानवनिर्मितच आहे. रिअल कल्चर्ड मोती ज्या शिंपल्यात तयार करण्यात येतो त्याच शिंपल्यामध्ये अर्धा मोती तयार करण्यात येतो. त्याचीही प्रक्रिया तशीच असते. अर्धा मोती म्हणजे हा मोती एका बाजूने फुगीर आणि एका बाजूने सपाट असतो. त्यामुळे त्याला अर्धा पर्ल म्हटलं जातं. 

माबे पर्ल (Mabe Pearl)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

 

#Mebepearls

A post shared by Ploypailin Ploy (@piriya_pearls) on Sep 2, 2019 at 6:42am PDT

माबे मोती हेदेखील अर्धा पर्लप्रमाणेच असतात. या मोत्यांचा वापर सहसा हार, ब्रेसलेट अथवा अंगठीमध्ये करण्यात येतो. माबे मोती हे पांढऱ्या रंगामध्ये जास्त दिसून येतात. तर हे मूळ मोती आकाराने वेडेवाकडे असतात. त्याचे दागिने तयार करताना त्याला आकार देण्यात येतो. 

फ्रेशवॉटर पर्ल (Freshwater Pearl)

Instagram

नदी अथवा गोड्या पाण्यातल्या मोत्यांना फ्रेश वॉटर पर्ल असं म्हटलं जातं. रंगाने पांढरे असणारे हे मोतीदेखील आकाराने मूळात वेडेवाकडे असतात. यांना दागिने तयार करताना आकार देण्यात येतो. हे मोती ठिसूळ असल्याने लवकर झिजतात. यांचा आकार विशिष्ट नसल्याने या मोत्यांचे केवळ सर बनवले जातात. 

वाचा – तुम्हालाही नक्कीच आवडतील या वेगवेगळ्या आणि सुंदर कानातले डिझाईन नवीन ज्यामध्ये आहेत

साऊथ सी (South Sea)

Instagram

नदी अथवा गोड्या पाण्यातील मोत्यांपेक्षा समुद्रातील शिंपल्यांमध्ये तयार होणारे मोती हे जास्त काळ टिकतात. त्यामुळे नेहमी समुद्रातील मोत्यांना जास्त मागणीही असते आणि त्याची किंमतही जास्त असते. मोती म्हटलं की, त्यात एक प्रकारचा नाजूकपणा असणं साहजिक आहे. साऊथ सी हा मोती समुद्रात सापडतो. या मोत्याचं वजन आणि आकार मोठा असल्याने त्याचे कानातले आणि सर बनवले जातात. तसंच बांगडी, नथ यासारख्या छोट्या दागिन्यांमध्येही याचा वापर करण्यात येतो. पण याचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे मोत्याची माळ. मोत्याची माळ घ्यायची असेल तर साऊथ सी मोत्यांची घ्यावी. 

महाराष्ट्राची शान नऊवारी नेसण्याचे प्रकार

ताहिती सी (Tahiti Sea)

Instagram

हादेखील समुद्रातील मोती आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा काळ्या रंगाचा मोती असतो. हे मोती कधी कधी करड्या रंगाचेही असतात. हा मोतीदेखील जड आणि मोठा असल्याने त्याचे साऊथ सी च्या मोत्याप्रमाणेच दागिने बनवले जातात. त्याला योग्य प्रकारे पॉलिश करून याचे दागिने तयार करण्यात येतात.

कोणते मोत्यांचे दागिने दिसतील सुंदर (Design Of Pearl Jewellery)

मोत्याचे अनेक दागिने बनतात. पण नववधू सजण्यासाठी साधारण या दागिन्यांचा सर्वात जास्त वापर करतात. त्यामुळे असे कोणते दागिने आहेत ते पाहूया जे नववधूच्या सौंदर्यात अधिक भर घालतील. 

नथ (Nath)

नथीशिवाय तर कोणतंही महाराष्ट्रीयन लग्न पूर्ण होत नाही. आता हा नथीचा ट्रेंड इतर लग्नांमध्येही दिसू लागला आहे. नववधू नेहमीच मोत्याची नथ घालण्याला प्राधान्य देतात. कारण लग्नाच्या साडीवर ही नथ अधिक आकर्षक दिसते आणि शोभून दिसते. त्यामुळे मोत्याची नथ घालून साजश्रृंगार करण्याची मजाच काही और आहे. 

मोत्याची सर (Pearl Head)

काही जणांना जास्त भपका आवडत नाही. अशावेळी मोत्याची सर तुमच्या मदतीला येते. गळ्यात ही साधीसुधी घातलेली मोत्याची सर खूपच सुंदर दिसते. अगदी शर्ट आणि पँटवरदेखील ही सर तुम्हाला घालता येते. ज्यांना जास्त दागिने आवडत नाहीत त्यांच्यासाठी मोत्याची सर हा दागिन्याचा प्रकार नक्कीच उत्तम पर्याय आहे. 

बाजूबंद (Bajuband)

सोन्याचा भाव अक्षरशः गगनाला भिडला आहे असं म्हणावं लागेल. बाजूबंद सोनं आणि मोत्यांचं मिक्स्चर करून घेतले तर अधिक सुंदर दिसतात. यामध्ये मध्येभागी वेगवेगळ्या रंगाचे खडे आणि इतर दोन ते तीन मोत्यांच्या सरी तुमच्या हातांच्या दंडावर अधिक शोभून दिसतात. तसंच यामध्ये अधिक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे नववधू हल्ली मोत्यांचे बाजूबंद घालण्याला अधिक प्राधान्य देतात. 

तन्मणी (Tanmani)

तन्मणी हा प्रत्येकीचा आवडता आणि पारंपरिक दागिना आहे. तन्मणी घातल्याशिवाय कोणताही सणसमारंभ पूर्ण होत नाही. तन्मणीमध्येही अनेक प्रकार असतात. पिवळी, गुलाबी, पांढरा अशा सगळ्या मोत्यांचे तन्मणी तुम्हाला मिळतात. तसंच एकसर, तीनसर असे विविध तन्मणी उपलब्ध असतात. अगदी कुरत्यांपासून ते साडीपर्यंत सर्व कपड्यांवर तुम्हाला तन्मणीचा वापर करता येतो. 

मोतीहार (Moti Haar)

मोतीहार म्हणजे एकसर अथवा दोन सर असणारा हा हार तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी अथवा तुमच्या नेहमीच्या पेहरावावरही वापरता येतो. हा दिसायला नाजूक असल्याने साहजिकच समोरच्या व्यक्तीचं तुमच्या गळ्याकडे आपोआप लक्ष जातं आणि तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. 

‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend

मोत्याचा चोकर (Choker Necklace)

आजकाल चोकरचा ट्रेंड चालू आहे. मोत्यांमध्येही अनेक डिझाईन्सचे चोकर्स तुम्हाला बाजारात पाहायला मिळतात. अगदी वेगवेगळ्या लहान डाळिंंबी रंगाच्या खड्यांपासून ते हिरव्या आणि जांभळ्या खड्यांचे तसंच पांढऱ्या आणि पिवळसर रंगाच्या मोत्यांचा चोकर हा दिसायला अप्रतिम दिसतो. त्याशिवाय तुमच्या मॉडर्न कपड्यांवरही याचा तुम्हाला वापर करून घेता येतो. त्यासाठी तुम्ही पारंपरिक कपडे घालायलाच हवेत असं काही नाही.  

मोत्याची अंगठी (Pearl Angheeti)

मोत्याचे दागिने घातल्यानंतर तुमच्या बोटात मोत्याची नाजूक अंगठीदेखील सुंदर दिसते. फक्त तुम्ही ही अंगठी निवडताना त्याचे मोती लहान आहेत की नाही ते व्यवस्थित पाहून घ्या. कारण मोठ्या मोत्यांची अंगठी ही थोडी भपकेबाज वाटते. पण तुमची अंगकाठी मोठी असेल तर अशा तऱ्हेची अंगठीदेखील तुम्हाला शोभून दिसते. 

बांगडी (Pearl Bangle)

नववधूच्या हिरव्या बांगड्यांमध्ये मोत्याची एक नाजूक अशी बांगडी मधोमध खूपच सुंदर दिसते. हिरवा रंग आणि मोत्यांचा रंग हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसतं. नववधू म्हटल्यानंतर बांगड्या तर हातामध्ये भरभरून हव्यात हे नक्की मग अशावेळी केवळ हिरव्या बांगड्या घालण्यापेक्षा असं कॉम्बिनेशन करून घातलेल्या बांगड्या या अधिक सुंदर दिसतात. 

मोत्याची कुडी (Pearl Mattress)

 

मोत्याची कुडी ही अगदी आपल्याकडे पूर्वपरंपरागत चालत आलेला दागिना आहे. पूर्वी या मोत्याच्या कुड्या सर्रास वापरात होत्या. पण आजही त्याचा ट्रेंड कायम आहे. नऊवारी साडी नेसल्यानंतर कानात कुड्या घालणं अतिशय सुंदर दिसतात. 

मोत्याचे तोडे (Moti Tode)

 

बांगड्यांसह मोत्याचे तोडेही अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही हिरव्या बांगड्या भरून मध्ये मोत्याच्या बांगड्या आणि त्यानंतर अगदी हाताच्या पुढे मोत्याचे तोडे घातलेत तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते. मोत्याचे तोडे विविध डिझाईन्सध्ये उपलब्ध आहेत. तुमच्या नववधूचा लुक हे मोत्याचे तोडे कम्प्लिट करतात.

मोत्यांची इमिटेशन ज्वेलरी तुम्ही कशी वापरू शकता? (How You Can Use Imitation Pearl Jewellery)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Price:1099/- No COD ❌ Only Gpay phonepay paytm Bank transaction #bridesofhyderabad #bridesofindia #southindianwedding #telugubride #tamilbride #pellikuthuru #pearlnecklacesets #pearlnecklaces #pearlnecklaceset #pearlnecklacewithbrooch #pearlnecklacecanidate #prilaga #pearlnecklaceforsale #pearlnecklacecake #pearlnecklacetattoo #pearlnecklace #pearlnecklacesforeveryone #pearlnecklacerepair #pearlnecklaceaward #pearlnecklacestout #pearlnecklacehandmade #pearlnecklaceph #pearlnecklaceforkids #pearlnecklacedesigns #pearlnecklaceearphone #pearlnecklaceset💁 #pearlnecklaceandearrings #pearlnecklacechesapeakestout #pearlnecklaceporn #pearlnecklaceoysterstout

A post shared by Trendy castle (@trendy_castle09) on Sep 24, 2019 at 9:08pm PDT

प्रत्येकाला खरा मोती घालणं परवडेल असं नाही. त्यामुळे मोत्यांची इमिटेशन ज्वेलरीदेखील बाजारात तुम्हाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. इमिटेशन ज्वेलरीमधील मोत्यांनी काही त्रास तर होणार नाही ना? असा प्रश्नही सर्वात पहिल्यांदा तुमच्या डोक्यात येतो. पण यामधील मोती हादेखील चांगल्या दर्जाचा असतो. तुमच्या त्वचेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी यामध्ये घेण्यात आलेली असते. पण तरीही मोत्यांचे दागिने खरेदी करत असताना तुम्ही व्यवस्थित तपासून त्याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. काही वेळा प्लास्टिकच्या गोळीलाही रंग देऊन तो मोती म्हणून वापरण्यात येतो. त्यामुळे अगदी स्वस्तातले दागिने घेऊ नयेत आणि दुकानातूनच खरेदी करावी. 

इमिटेशन मोत्यांच्या दागिन्यांमध्ये खरेदी करत असताना खड्यांमध्ये लाल, जांभळा, हिरवा हे रंग आकर्षक दिसतात. यापैकी तुमच्या कपड्यांना शोभून दिसणारे दागिने निवडा. साडी नेसणार असाल तर सहसा दागिने निवडताना साडीच्या काठाचा रंग बघून मोत्यांचे दागिने निवडा. 

तसंच हल्ली बरेच जण ऑफिसला जातात. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये बऱ्याच जणींना फॉर्मल कपडे अर्थात शर्ट आणि पँट्स घालावे लागतात. त्यावर नेहमीचे कानातले, झुमके अथवा जड कानातले घालता येत नाहीत. तसंच गळ्यातही घालता येत नाही. अशावेळी मोत्याचे स्टड अथवा एकच खडा हेदेखील आकर्षक दिसतं. त्याशिवाय तुमच्या कपड्यांवर एखादी मोत्याची सरदेखील सुंदर दिसते. तुमच्या लुकला अधिक शोभा येते. तसंच तुम्ही कुरता घालून जाणार असाल तर त्यावर लहान आकाराची कुडी अथवा सोन्याचे ठराविक मोती वापरून बनवलेले कानातलेदेखील तुम्ही ऑफिसला जाताना घालू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या सौंदर्यात अधिक भर घालता. मोती हा सर्वात जुना असला तरीही आजच्या पिढीसाठी हा कधीही आऊटडेटेड नाही. उलट मोत्याचे दागिने घालणं हे कधीही सर्वांनाच अगदी सुटसुटीत वाटतं. मोती हा दिसायला अतिशय नाजूक आणि सोबर असल्याने त्यामध्ये जास्त भपकेपणा दिसून येत नाही आणि त्याचं हेच वैशिष्ट्य महिलांमध्ये जास्त प्रिय आहे. कानातले आणि गळ्यांतल्यांसह मोत्याची बारीक बांगडी अथवा कुरत्यावर वा पंजाबी सूटवर घालण्यासाठी मोत्यांचे ब्रेसलेटदेखील मिळतात. या अशा प्रकारच्या इमिटेशन मोत्यांच्या दागिन्यांचा वापर करून तुम्ही अधिक आकर्षक दिसू शकता. 

सोन्याच्या दागिन्यांसह कसे करावे मॅच? (How To Match Pearl Jewellery With Gold Jewellery)

मोत्यांचे दागिने आपण अनेक सणासमारंभाला बऱ्याचदा सोन्याच्या दागिन्यांसह घालतो. पण सोन्याच्या दागिन्यांसह घालताना कसं मॅचिंग करावं हे बऱ्याच जणींना कळत नाही.  दागिने आहेत म्हणून सगळे घातले जातात पण ते बघताना चांगलं दिसत नाही. मोत्यांच्या रंगांमध्येही फरक असतो. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांसोबत मोत्यांचे दागिने घालत असाल तर त्यासाठी तुमचे मोती हे पिवळसर रंगाचे असायला हवेत हे लक्षात घ्या. मोती हा मुळातच सुंदर असतो. त्यामुळे लेसचे डिझाईन असलेले कपडे, पारंपरिक नववधूचे कपडे, जरदोसी, जाड अथवा बारीक काठापदराची साडी या सगळ्यांवर हे मोत्यांचे दागिने सोन्याच्या दागिन्यांसह उठून दिसतात. भरपूर दागिने घालण्यापेक्षा एखादा सोन्याचा दागिना आणि त्याबरोबर मोत्याचा एखादा मोठा दागिना घालून तुम्ही तुमचा लुक अप्रतिम करू शकता. पण  जर नववधूचा लुक असेल तर तुम्ही सोन्याच्या दागिन्यांसह जास्तीत जास्त मोत्यांचे दागिने घालून नववधूचा साज अधिक खुलवू शकता. 

महाराष्ट्रीयन दागिन्यांंमध्ये ‘ठुशीचा’ ठसकाच वेगळा