ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
स्वस्त पण मस्त असे ड्रेस मटेरिअल आहेत ट्रेंडमध्ये

स्वस्त पण मस्त असे ड्रेस मटेरिअल आहेत ट्रेंडमध्ये

एखादा नव्या ट्रेंडचा ड्रेस आपल्याला आवडीच्या रंगाचा मिळाला नाही तर तो अनेक जण शिवून घेतात. ताग्यातून घेतलेला कपडा स्वस्त आणि मनासारखा मिळतो. जर तुम्ही थोडे क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला अगदी हमखास आपल्या आवडीचा ड्रेस पसंतीच्या ड्रेसमधून शिवता येतो. पण एखाद्या ड्रेससाठी कपडा कसा निवडावा हे जर तुम्हाला कळत नसेल तर आम्ही असे काही मटेरिअल शोधून काढले आहे जे तुमच्या बजेटमध्ये बसणारे आहेत. रेडिमेडच्या तुलनेत तुम्हाला हे कपडे फार स्वस्त पडतील. आता हे ड्रेस मटेरिअलचे प्रकार कोणते ते जाणून घेऊया.

ट्रेंडमध्ये आहे इंडिगो प्रिंट,अशी करा फॅशन

देवी सिल्क

देवी सिल्क हा प्रकार एकदम चकचकीत असतो. यामध्ये बरेच प्रकार आणि रंग येतात. याचे कुुडते आणि स्ट्रेट फिट पँट शिवल्यानंतर एक चांगला लुक देतात. जर तुम्हाला प्लेन मटेरिअल आवडत असेल तर हा प्रकार फक्त तुमच्यासाठी आहे असेच समजा. याची फिटिंग खूप चांगली बसते. याला स्टाईल करताना तुम्ही मिस मॅच दुपट्टा घेऊ शकता. यावर जॉर्जेट दुपट्टा चांगला दिसतो. 

बजेट : साधारण 70 रुपये मीटर

ADVERTISEMENT

उन्हाळ्यात ट्रेंडी आणि कूल दिसण्यासाठी ट्राय करा या फॅशन टिप्स

इक्कत प्रिंट

इक्कत प्रिंट

सध्या ट्रेंडमध्ये असलेली ही प्रिंट प्रत्येक मुलीला तिच्याकडे असावीच असे वाटत असेल. तुम्हाला तुमच्या आवडीचा रेडिमेड ड्रेस मिळत नसेल तर तुम्ही हिंदमाता किंवा कपड्यांचे होलसेल मार्केट गाठा तिथे तुम्हाला मधल्या कित्येक व्हरायटी मिळू शकतील. तुम्हाला हवे ते पॅटर्न आणि रंग यामध्ये मिळतात. ब्लाऊज, ड्रेस,साडी असा तुम्हाला काहीही तुमच्या आवडीनुसार हे शिवता येते. कॉटन मटेरिअल असल्यामुळे या कपडयामध्ये तसे गरम ही होत नाही. उन्हाळ्यासाठी तुम्ही हा कपडा अगदी हमखास खरेदी करा.
बजेट : 150 रुपये मीटर

ADVERTISEMENT

 

लग्नासाठी निवडा अशा प्रकारे दागिने, काही सोप्या टिप्स

जयपूर प्रिंट

जयपूर प्रिंट

ADVERTISEMENT

जयपूर प्रिंटची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या प्रिंट खूप नाजूक आणि सुंदर असतात. या प्रिंटमधले कपडे मिसमॅच करुन तुम्हाला ड्रेस शिवता येतात. मलमल कॉटनमधील हा प्रकार अंगालाही त्रासदायक नाही. तो नेहमीच रिच आणि चांगला दिसतो. यामध्ये तुम्हाला खूप व्हरायची मिळते. कुडता, लाँग बॉटम, पलाझो, स्कर्ट, मॅक्सी ड्रेस या सगळ्यांसाठी हा कपडा उत्तम आहे. असे कपडे तुम्हाला कोणत्याही मीटिंगसाठी किंवा अगदी लग्नकार्यासाठी घालता येतात. तुम्ही हे कपडे नक्की घ्या. 

बजेट : 150 रुपये मीटर

अॅनिमल प्रिंट

जर तुम्हाला जॉर्जेटचे कपडे आवडत असतील तर तुमच्या वॉर्डरोबमधील कपड्यांना थोडा वेस्टर्न लुक देणारा अॅनिमल प्रिंट हा प्रकार कायमच ट्रेंडमध्ये असतो. हा प्रकार तुम्हाला बाजारात वर्षभर मिळतो.  हा कपडा वेगवेगळ्या रंगात आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मिळतो.  या प्रिंटमध्ये तुम्हाला कॉटनचा पर्याय ही मिळतो.  तुम्ही या पैकी कोणताही पर्याय निवडू शकता. 

बजेट : 150 रुपये मीटर

ADVERTISEMENT

 आता हे कपडे तुम्ही नक्की ट्राय करा. स्वस्तात तुमचे काम होईल.

18 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT