त्वचेची काळजी करणे किती आवश्यक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. आपण नेहमी प्रवास करताना असो अथवा घरात असो प्रदूषणाचा सामना हा करतच असतो. धूळ – माती, प्रदूषण इत्यादी गोष्टी हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्यात जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुमचा चेहरा अधिक तेलकट होतो आणि चिकट होतो. ज्यामुळे त्वचेवरील सेल्स डेड होती आहे आणि त्वचेवर मुरूमं होण्यासाठी त्वचा अधिक निस्तेज दिसते. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही ऑर्गेनिक उत्पादनांचा खजिना घेऊन आलो आहोत. याच्या मदतीने तुमच्या त्वचेला हानी पोहचत नाही आणि तेलकट त्वचा अधिक निरोगी राहाते. वास्तविक ऑर्गेनिक हार्वेस्ट (Organic Harvest) हे तुमच्यासाठी नैसर्गिक उत्पादनांपासून बनविण्यात आले आहेत. याच्या ऑईली स्किन केअर रेंजमध्ये तुम्हाला बरेच उत्पादन मिळतील. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. विशेषतः या उत्पादनांमध्ये हानिकारक केमिकल्सचा वापर करण्यात आलेला नाही आणि यामुळे ही उत्पादने तुमच्या त्वचेसाठी उत्तम ठरतात.
ऑईल कंट्रोल फेस वॉश (Oil Control Face Wash)
ऑर्गेनिक हार्वेस्टचे हे ऑईल कंट्रोल फेसवॉश विशेषतः तेलकट त्वचेसाठी बनविण्यात आले आहे. हे तुमच्या चेहऱ्यावर मॉईस्चर राखून ठेवते आणि तसंच चेहऱ्यावरील अधिक तेल हटविण्यासाठीही मदत मिळते. ऑर्गेनिक हार्वेस्टचा हा फेसवॉश केमिकल आणि पेस्टिसाईडमुक्त आहे आणि तुम्ही याचा रोज वापर करू शकता. आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग, ग्राईम, ग्रिसिंग इत्यादी काढण्यासाठी आणि तुम्हाला पोर्स ओपन करण्यासाठीही मदत करते. तसंच तुमची त्वचा अधिक ताजी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.
डेली डे क्रिम (Daily Day Cream)
उन्हाळा असो वा हिवाळा आपली त्वचा मॉईस्चराईज ठेवण्यासाठी आपण क्रिम लावतो. मग कोणतेही बाजारातील क्रिम घेण्यापेक्षा तुम्ही ऑर्गेनिक हार्वेस्टचे डेली डे क्रिम (Daily Day Cream by Organic Harvest) हा चांगला पर्याय आहे. हे क्रिम आपल्या चेहऱ्याला सूर्यांच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. तसंच तुमची त्वचा दिवसभर मॉईस्चराईज राखण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच हे क्रिम लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल येत नाही. या क्रिममध्ये बीटरूट एक्स्ट्रॅक्टसह विटामिन सी देखील आहे. चेहऱ्यावरील डेड स्किन (Dead Skin) काढून टाकण्यासाठी आणि योग्य स्किन टोनदेखील यामुळे मिळतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या किटमध्ये याचा नक्की समावेश करून घ्यायला हवा.
टोनर (Toner)
केवळ फेसवॉश (Face Wash) आणि डे क्रिम त्वचेची देखभाल करण्यासाठी पुरेसे नाहीत. तुम्हाला चेहरा धुतल्यानंतर आणि चेहरा मॉईस्चराईज करण्याच्या आधी टोनरचा वापर करायला हवा. यासाठी तुम्ही ऑर्गेनिक हार्वेस्टचे नीम तुलसी टोनर (Neem Tulsi Toner) घेऊन यावे. वास्तविक हे टोनर प्लांट आधारित गोष्टींपासून बनविण्यात आले आहे आणि आपल्या चेहऱ्यावरील मोठे पोर्स कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच चेहऱ्यावरील अधिक तेल हटविण्यासाठी याचा उपयोग होतो. याशिवाय यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणइ अँटिइन्फ्लेमेटरी घटकदेखील आहेत, जे त्वचेला इन्फेक्शनपासून वाचविण्यास मदत करतात. टोनरचा वापर करणे सोपेदेखील आणि उपयुक्तदेखील आहे.
तुमची त्वचा संवेदनशील असेल आणि तेलकट असेल तर त्वचेला हानी न पोहचवणारी अशी ऑर्गेनिक हार्वेस्टची उत्पादने तुम्ही वापरू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक