ADVERTISEMENT
home / मनोरंजन
या’ अभिनेत्री प्रमोट करत आहेत Nude Yoga, व्हायरल झाले फोटोज

या’ अभिनेत्री प्रमोट करत आहेत Nude Yoga, व्हायरल झाले फोटोज

आजकल सोशल मीडियावर हॉट योगा करण्याचा एक वेगळाच ट्रेंड (Trend) आला आहे. काही जण समुद्राच्या किनाऱ्यावर तर काही जण बिकिनीमध्ये योगा पोझ देताना अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. पण सध्या चर्चेमध्ये अशा दोन अभिनेत्री आहेत ज्यांनी सोशल मीडियावर टॉपलेस (Topless) होऊन Nude Yoga चे फोटो शेअर केले आहेत. पण यामध्ये कोणतीही अश्लिलता नसून त्यांचे चाहतेही त्यांच्या या योगासनांचं कौतुक करत आहेत. या दोन्ही अभिनेत्रींचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 

अबिगेल पांडे आणि आश्का गरोडियाचा Nude Yoga

‘जिंगदी विन्स’, ‘हमसे है लाईफ’, ‘नच बलिये 8’ अशा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री अबिगेल पांडे (Abigail Pande) सध्या आपली मैत्रीण आश्का गरोडिया (Aashka Garodia) हॉलिडे एन्जॉय करत आहे. अबिगेलने आपला एक फोटो शेअर करत त्याखाली एक मोठी कॅप्शन दिली आहे. तर असा फोटो शेअर करण्यामागे नक्की कारण काय आहे हेदेखील तिने यामध्ये स्पष्ट केलं आहे. या पोस्टमध्ये अबिगेलने न्यूड योगाची प्रशंसा केली आहे. अबिगेलच्या म्हणण्यानुसार, ‘न्यूड आणि योगामध्ये तसं तर काहीच समानता नाही. पण हे एकत्र केल्यास, तुम्ही लोकांना तुम्हाला मिळणाऱ्या अनुभाबद्दल अगदी मनापासून सांगू शकता. सुरुवातीला मलाही अशा प्रकारे योगा करण्यासाठी खूपच लाज वाटली आणि भीतीही वाटली. पण ते केवळ यासाठी की, आपल्याबद्दल इतर लोक नक्की काय विचार करतील. पण माझी मैत्रीण, माझी फोटोग्राफर आणि बॉडीगार्ड असणारी आश्का गरोडियाने त्यावेळी मला साथ दिली आणि तिच्यामुळेच मी हे करू शकले.’

अबिगेल पांडे बऱ्याचदा इन्स्टाग्रामवर आपल्या अकाऊंटवर योगाचे अनेक फोटो शेअर करताना दिसते. त्यामुळे तिचे चाहतेही तिला योगा गर्ल असं म्हणतात. आतापर्यंत तिने बिकिनीवर योगा केलं आहे. पण अशा तऱ्हेने न्यूड योगाचा हा तिचा पहिलाच फोटो आहे. न्यूड योगा करण्यासाठी आश्का आपली प्रेरणा असल्याचं तिने सांगितलं आहे. कारण आश्काने याआधी अशा तऱ्हेने योगा केलं होतं. 

तसेच योगाचे महत्त्व वाचा

ADVERTISEMENT

आश्काचेही फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वी आश्कानेही टॉपलेस होऊन योगा केला होता. तिच्या चाहत्यांना तिचा हा फोटो खूपच आवडला. इतकंच नाही तिचे टीव्ही क्षेत्रातील मित्रमैत्रिणीही तिला यासाठी प्रोत्साहन देत आहेत. आश्काचा हा योग ‘Nude yoga girl’ पासून प्रभावित आहे. आश्काने आतापर्यंत अनेक मालिकांमधून काम केलं आहे. आश्कानेदेखील आपला हा फोटो शेअर करत असताना दमदार कॅप्शन दिली आहे. ही पोस्ट करताना आश्काने पुरुषांच्या मानसिकतेवर काही प्रश्न विचारले आहेत. आश्काचं इन्स्टाग्राम अकाऊंट हे योगा करतानाच्या फोटोने भरून गेलं आहे. पण तिने यामध्ये आपल्या नवऱ्याबरोबरही काही फोटो पोस्ट केले आहेत. तिचा नवरा तिला यासाठी प्रोत्साहन देत असून यामध्ये काहीही वावगं नसल्याचंही तिने सांगितलं आहे. आश्काने नेहमीच आपल्या मनाला वाटेल ते केलं आहे. तिने ट्रोल करणाऱ्यांकडेही कधीही लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे अशा तऱ्हेच्या फोटोंना नक्की कशा कमेंट्स येतात याकडेही लक्ष न देण्याचा सल्ला आश्काने अबिगेलला दिला आहे. 

हेदेखील वाचा

मालदीव्सच्या सुंदर किनाऱ्यावर मलायकाचा ‘हॉट’ योगा

रोज योगा करत आहात, तर लक्षात ठेवा खास गोष्टी

ADVERTISEMENT

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी

06 Aug 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT