बी टाऊनमध्ये सध्या चर्चा आहे ती नेहा कक्कर आणि आदित्य नारायणच्या लग्नाची. व्हेलेंटाईन डे च्या शुभमुहूर्तावर हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाला आता फक्त 3 दिवस उरले आहेत. पण या लग्नाची पुढील काहीच बातमी पुढे येत नाही म्हटल्यावर त्यांच्या फॅन्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी टोनी कक्करने त्यांच्या लग्नाची घोषणा व्हिडिओमधून केल्यानंतर त्यांच्या लग्नाची गोष्ट अगदी Confirmed झाली होती. पण आता आदित्यचे वडील उदित नारायण यांनी मात्र आता या लग्नाच्या चर्चेला ‘फुलस्टॉप’ दिला आहे. नेमकं त्यांनी या चर्चेला का फुलस्टॉप दिला ते जाणून घेऊया
नेहा कक्कड आणि आदित्यचं लग्न खरंच ठरतंय…
नेहा आणि आदित्यच्या लग्नाला उदित नारायण यांचा विरोध
आता नेहा आणि आदित्यच्या लग्नाला उदित नारायण यांचा विरोध आहे का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर असे काही नाही. उदित नारायण यांना ज्यावेळी लग्नाबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, लग्नाची ही बातमी खोटी आहे. त्यांच्या शो चा टीआरपी वाढवण्यासाठी हा सगळा घाट घालण्यात आला आहे. इंडियन आयडॉलच्या नव्या सीझनमध्ये आदित्य अँकर आहे आणि नेहा जज. या शो ची टीआरपी वाढण्यासाठी प्रोडक्शनकडून ही मस्करी करण्यात आली आहे. यामध्ये काहीही तथ्य नाही.
पण गोष्ट खरी असती तर झाला असता आनंद
उदित नारायण यांनी नेहासोबतच्या लग्नाची गोष्ट खोटी सांगितली असली तर त्यांनी पुढे जे सांगितले ते मात्र ऐकण्यासारखे आहे. एका मुलाखतीत उदित नारायण म्हणाले की, ‘आदित्य आमचा एकुलता एक मुलगा आहे त्यांच्या लग्नाची ही बातमी खरी असती तर सगळयात जास्त आनंद आम्हाला झाला असता. कारण त्याच्या लग्नाची आम्ही पण वाट पाहत आहोत.’ यावरुन एक गोष्ट सिद्ध होत आहे की, उदित नारायण यांना सून म्हणून नेहा कक्कर पसंत आहे. त्यामुळे आदित्यला खऱ्या आयुष्यात याचा विचार करण्यास काहीच हरकत नाही.
नेहाचा हार्टब्रेक
2019 सालं नेहासाठी अजिबात चांगलं नव्हतं. याच वर्षात ती हिमांश कोहलीपासून वेगळी झाली. त्यानंतर नेहा आणि हिमांश दोन्हीही कोलमडले. नेहाने तिचा ब्रेकअप जगजाहीर केला. पण हिमांश त्यावेळी शांत राहिला. दोघांमध्ये नेमकं कोणत्या कारणावरुन बिनसले ते कळलंच नाही. नंतर या सगळ्या प्रकरणावर पडदा पडला आणि अचानक नेहा आणि आदित्यच्या लग्नाची बातमी आली. पण आता ही बातमी खोटी असल्याचे समजल्यावर फॅन्सचा हार्टब्रेक नक्कीच झाला असेल यात काही शंका नाही.
व्हेलेंटाईन वीकची तयारी
नुकताच आदित्य आणि नेहाचा एक व्हिडिओ सतत दाखवला जातोय तो म्हणजे नेहा आदित्यला फ्लाईंग किस देण्याचा. पण आता इतकं सगळं वाचल्यानंतर तुम्हाला कळालं असेलच की हा सगळा ही एक बनाव आहे व्हेलेंटाईन वीकसाठी. त्यामुळे नेहा-आदित्यमध्ये काहीच नाही हे नक्की आहे. पण भविष्यात काही झालचं तर आदित्यच्या घरातून याला विरोध नाही हे मात्र नक्कीच खरं
मग आता नेहा- आदित्यच्या लग्नाचा बार उडणार नसला तरी फॅन्सनी नाराज होण्याची गरज नाही. कारण या सेटवर कधी काय घडेल सांगता येत नाही.
https://www.popxo.com/shop/zodiac-collection/#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/