नेहा कक्कड आणि आदित्यचं लग्न खरंच ठरतंय...

नेहा कक्कड आणि आदित्यचं लग्न खरंच ठरतंय...

बॉलीवूडची सध्याची आघाडीची गायिका नेहा कक्कड (Neha Kakkar) आणि प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण (Aditya Narayan), जो स्वतः चांगलं गातो आणि एक प्रसिद्ध निवेदक आहे यांचं लवकरच लग्न होणार असल्याच्या चर्चांना गेले काही दिवस उधाण आलं आहे. खरंच दोघे लग्न करत आहेत का हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. कारण नेहा आणि आदित्यची जोडी खरंच खूप छान दिसते. पण तरीही त्यांच्या चाहत्यांना हा प्रश्न सतावत आहे की,  हे दोघं खरंच लग्न करणार आहेत की, केवळ मजामस्करी चालू आहे. गाण्याच्या एका रियालिटी शो मध्ये नेहा जज असून आदित्य त्या शो चा निवेदक म्हणून काम करत आहे. या दोघांची एकमेकांबरोबर खूपच मजा मस्ती चालू असते. पण आता ही मजा मस्ती एक गंभीर वळण घेत असल्याचंही काही जणांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर यांच्या जोडीचा #nehadi असा हॅशटॅगही झाला आहे. 

नेहा कक्कर नशेमध्ये, जमिनीवर पडल्याचा व्हिडिओ व्हायरल

नेहाने स्वीकारला शगुन

काही दिवसांपूर्वीच गायक कुमार सानू हे सेटवर आले होते आणि त्यांनी एक मोठा भाऊ म्हणून नेहा कक्कडला शगुनमध्ये लाल ओढणी दिली. आपण आदित्यचे मोठे भाऊ असून नेहाने त्याचा स्वीकार करावा असं त्यांनी यावेळी म्हटलं आणि नेहाने हा शगुन स्वीकारदेखील केला होता.  इतकंच नाही तर ‘ओढली चुनरिया’ हे आपलं प्रसिद्ध गाणंदेखील कुमार सानू यांनी यावेळी गायलं होतं. रितीनुसार ओढणी देणं हा एक महत्त्वाचा हिस्सा असतो. तर काही दिवसांपूर्वीच आदित्य आणि नेहाने आपल्या सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करून ही मजामस्करी आहे की नाही हे समजण्याआधीच यावर आपला होकार असल्याप्रमाणे एक मोहोरच लावून टाकली. नेहा आणि आदित्यने हाताने अर्ध हृदय दाखवत आपले फोटो पोस्ट केले होते. तसंच या फोटोंसह ‘14 फेब्रुवारी’ अशी तारीखही कॅप्शनमध्ये नेहाकडून देण्यात आली. तर आदित्यने शेअर केलेल्या फोटोखाली लिहिले, ‘माझ्या जीवाचा एक भाग’. तसं तर हे फोटो बघून हे नक्कीच खरं असेल की नाही अशी शंका येते आहे. पण तरीही या दोघांची जोडी आणि मजामस्ती मात्र अप्रतिम आहे. 

पुन्हा डेट करत असल्याच्या अफवेवर नेहा कक्कर भडकली

टीआरपीसाठी वाट्टेल ते!

मिळालेल्या माहितीनुसार आदित्य आणि नेहाचं हे नातं शो ची टीआरपी वाढवण्यासाठी आहे असं म्हटलं जात आहे. आदित्यने आतापर्यंत बऱ्याचदा नेहाला आपल्या मनातील गोष्ट सांगितली असून प्रेमाबद्दल सांगितलं आहे. आदित्य कधी नेहासाठी रोमँटिक गाणं गातो तर कधी रोमँटिक डान्स करतो. इतकंच नाही तर दोघांच्याही कुटुंबाकडून या नात्याला परवानगी देण्यात आली आहे. आता नक्की खरंच हे दोघं लग्न करणार की या शो पुरतंच हे मर्यादित राहणार हे लवकरच कळेल. असं असलं तरीही नेहा आणि आदित्य दोघांच्याही चाहत्यांना या दोघांनी एकमेकांशी लग्न करावं असं वाटत आहे. कारण या दोघांची जोडी अप्रतिम असून दोघंही एकमेकांना सांभाळून घेतील असं त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. इतकंच नाही ही जोडी सध्या ट्रेंडिंगमध्येही आहे. मजामस्ती करता करता खरंच या दोघांचं लग्न झालं तर चाहत्यांसाठी दुसरा कोणताही आनंद नसेल. आदित्य नेहमीच नेहाला सेटवर पण जपताना दिसतो. तसंच नेहादेखील आदित्यबरोबर खूपच कम्फर्टेबल असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या दोघांबाबत ही गोष्ट खरी ठरली तर नक्कीच सर्वांना आनंद होईल.

नेहा कक्कड पुन्हा चर्चेत, स्पर्धकाने खुलेआम केलं Kiss

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.