ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Ice Roller चा वापर कसा करावा, काय आहेत फायदे

Ice Roller चा वापर कसा करावा, काय आहेत फायदे

सध्या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अथवा व्हिडिओमध्ये आईस रोलर (ice roller)चा वापर चेहऱ्यावर होताना दिसत असतो. पण काही जणांना हे आईस रोलर म्हणजे नक्की काय आहे आणि याचा वापर कसा करायचा अथवा कशासाठी असतो याची कल्पना नसते. आईस रोलरचा वापर चेहऱ्याची त्वचा ताजी ठेवण्यासाठी, तसंच चेहऱ्यावर आलेली सूज अर्थात पफीनेस घालविण्यासाठी, तसंच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी केला जातो. पण याचा योग्य वापर कसा करायचा याची तुम्हाला कल्पना आहे का? केवळ रोलर हातात आहे म्हणून चेहऱ्यावर फिरवायचा असं होत नाही. तर हे वापरण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि त्यामुळेच फायदा मिळतो. याची वापरण्याची पद्धत आणि फायदे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्हीही याचा फायदा तुमच्या चेहऱ्यासाठी करून घेऊ शकता. 

तांदूळ पीठ वापरा आणि त्वचा बनवा अधिक उजळ

कसा वापरावा आईस रोलर

कसा वापरावा आईस रोलर

Freepik

ADVERTISEMENT

स्टेप 1 – क्लिन्झिंग 

आईस रोलरचा वापर करण्यापूर्वी सर्वात पहिले आपण आपला चेहरा एखाद्या चांगल्या क्लिंन्झरने स्वच्छ करून घेणे अत्यावश्यक आहे. चेहरा क्लिन अर्थात स्वच्छ करून झाल्यावर तुम्ही एखाद्या चांगल्या मोठ्या टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. चेहरा खसाखसा न पुसता अगदी हलक्या हाताने पुसा. याची व्यवस्थित काळजी घ्या. 

स्टेप 2 – टोनिंग 

चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी टोनरचा वापर करा. त्यासाठी कापसावर टोनर घ्या आणि चेहरा स्वच्छ पुसून घ्या. चेहऱ्याचे टोनिंग व्यवस्थित करा. हलक्या हाताने चेहरा टोनरने स्वच्छ करून घ्या. जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर ओपन पोर्स कमी होतील. 

ADVERTISEMENT

स्टेप 3 – मॉईस्चराईजिंग 

चेहरा हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही तुमच्या स्किनटोननुसार मॉईस्चराईजर निवडा आणि त्याचा चेहऱ्यावर वापर करा. क्लिन्झिंग आणि टोनिंग करून झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा. 

या टिप्सने ओळखा तुमचे जेड रोलर खरे आहे की ड्युप्लिकेट

स्टेप 4 – आईस रोलर

ADVERTISEMENT

यानंतर तुम्ही आईस रोलरचा वापर करा. सर्वात पहिले तुम्ही आईस रोलर तुमच्या गालावर आणि मग कपाळावर व्यवस्थित फिरवा. त्यानंतर डोळे बंद करून तुम्ही डोळ्यांवर आईस रोलर फिरवा. असं केल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो. त्यानंतर तुम्हाला जर डोळ्यांखाली वर्तुळं येत असतील तर डोळ्यांखाली आईस रोलर फिरवा. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते. सर्वात शेवटी तुम्ही तुमच्या मानेवरही याचा वापर करून घेऊ शकता. मान हादेखील चेहऱ्याचा अविभाज्य भाग असल्याने मानेवर आईस रोलर फिरवणे विसरू नका. 

स्टेप 5 – चेहरा सुकू द्या 

आईस रोलरचा वापर तुम्ही साधारण 5-10 मिनिट्स चेहऱ्यावर करा आणि त्यानंतर चेहरा नैसर्गिकरित्या सुकू द्या. चेहरा सुकू देणेही गरजेचे असते.

या स्टेप्सचा वापर करून तुम्ही आईस रोलरचा योग्य वापर करू शकता. यामुळे तुमची त्वचा अधिक ताजी आणि आकर्षक दिसायला मदत मिळते. तसंच त्वचेवर कायम चमक राहते. कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तुम्ही त्वरीत चमक मिळविण्यासाठी याचा नक्कीच वापर करू शकता. आजकाल सतत काम आणि ताणामुळे डोळ्यांवर सूज येणे अथवा चेहरा सुजलेला दिसणे ही समस्या कॉमन झाली आहे. पण त्यावर तुम्ही आईस रोलरचा वापर करून नक्कीच उपाय करू शकता. आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुमच्या नियमित वापराने तुम्हाला नक्कीच त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी मदत मिळते. 

ADVERTISEMENT

त्वचा टोन्ड करण्याचे काम करतात हे फेस मसाजर, नक्की वापरुन पाहा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT