त्वचा टोन्ड असणे हे आपल्या सगळ्यांसाठीच फार महत्वाचे आहे. जर तुम्ही स्किन टोनिंगचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मसाज किती महत्वाचा आहे ते तुम्हाला माहीत असेलच. पण त्वचा टोन्ड करण्यासाठी योग्य मसाज कसा करायचा हे देखील आपल्याला माहीत असायला हवा. जर तुम्हाला मसाज करण्याचा कंटाळा आला असेल आणि तुम्हाला मसाजची झटपट, योग्य आणि फायदेशीर पद्धत जाणून घ्यायची असेल तर त तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या काही फेस मसाजरविषयी तुम्हाला माहिती हवी. जाणून घेऊया त्वचा टोन्ड करणारे फेस मसाजर
जेड रोलर हा प्रकार तुम्ही अगदी हमखास हल्लीच्या दिवसात ऐकला असेल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळतात. जेड रोलर हा फेशियल रोलर असून यामध्ये खास स्टोनचा वापर केलेला असतो. त्याच्या मसाजमुळे तुम्हाला खूपच फायदा होतो. तुमच्याकडे असलेले कोणतेही फेस ऑईल (तुमच्या त्वचेला चालत असेल असे) घेऊन तुमच्या त्वचेवर या तेलाचे दोन- चार थेंब टाका. त्यानंतर जेड रोलरच्या मदतीने तुम्ही चेहऱ्याला मसाज करा असे करताना तुम्हाला मसाज वरच्या बाजूच्या दिशेने करायचा आहे. यातील लहान बाजू ही डोळ्यांच्या खाली आलेल्या काळ्या वर्तुळांसाठी असते. त्यामुळे तुमचे डोळे सुजले असतील तर त्यांची सूज कमी होते. तुमच्या त्वचेला आराम मिळतो. तुम्ही लावलेले फेस ऑईल तुमच्या त्वचेत छान मुरतं.
टीप: जर तुम्हाला यापासून अधिक आराम मिळावा असे वाटत असेल तर हा जेड रोलर स्वच्छ करुन फ्रिजरमध्ये ठेवा आणि मगच वापरा. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स बंद होण्यास मदत मिळेल.
अनेकांना चेहरा टोन्ड असावा असे वाटते. जर तुम्ही शा फेशिअल टुल वापरु शकता. हे टुल एखाद्या त्रिकोणाप्रमाणे असते. डबल चीन किंवा गालाचे मांस कमी करुन त्याला टोन्ड करण्याचे काम करते. हे टुल पकडण्यासाठी त्याला विशेष हँडल नसते. तुम्हाला त्रिकोणाचा निमुळता भाग हातात घेऊन हनुवटीपासून वर गालाच्या हाडापर्यंत म्हणजेच साधारण कानापर्यंत तुम्हाला ते ओढायचे आहे. तुम्हाला त्वचा ही वरच्या बाजूला ओढायची आहे. तुम्ही सुरुवातीला 5 वेळा दोन्ही बाजूला करा. तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली असेल तर तुम्हाला तुमची त्वचा टोन्ड करण्यास हे टुल मदत करेल.
टीप: शा फेशिअल टुलमध्ये तुम्हाला अनेक प्रकार मिळतात. वेगवेगळे आकारही मिळतात. पण त्वचा टोन्ड करणे याचे काम असते.
सध्या सगळीकडे या मसाजर बारची चांगलीच चलती आहे. अनेक सेलिब्रिटींना तुम्ही हे वापरताना पाहिले असेल. हा बारही तुमच्या त्वचेसाठी चांगला आहे. तुमच्या त्वचेला आराम देण्यासोबतच तुमची त्वचा टोन्ड करण्याचे काम हा बार करतो. इतर रोलमध्ये वायब्रेड होत नाही. पण यामध्ये ती सोय आहे. तुम्ही दिलेल्या सूचना पाहून त्याचा उपयोग करु शकता. तुमच्या त्वचेची इलास्टिसिटी वाढवणे आणि तुमची त्वचा तजेलदार करण्याचे काम हा टी बार करते.
आता जर तुम्हाला घरच्या घरी आणि पटकन असा मसाज करायचा असेल तर तुम्ही हे रोलर निवडू शकता.