ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
vastu-tips

Vastu Tips: लग्न झालेल्या नव्या जोडीचे बेडरूम हवे असे, संसार होईल सुखाचा

सध्या लग्नाचा हंगाम (Wedding Season) सुरू आहे आणि ज्यांचे लग्न होणार आहे त्यांनी आता लग्नाच्या तयारीला सुरूवातही केली असेल. लग्नाची तयारी म्हणजे केवळ खरेदी (Shopping) नाही. तर नव्या जोडप्यासाठी आपली खोली कशी सजवावी आणि त्यामध्ये काय काय असायला हवे अथवा आपली बेडरूम वास्तुच्या दृष्टीने कशी असावी हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.  जेव्हा घरात नवरीचे अर्थात घरात नव्या नवरीचे स्वागत होते तेव्हा आनंद आणि सुख-समृद्धी घेऊन येते. आपल्याकडे घरात येणाऱ्या सुनेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. ज्याप्रमाणे देवी लक्ष्मी गृहप्रवेश करताना घरात सुख, समृद्धी आणि भरभराट आणते तसंच घरात येणारी नवी नवरीदेखील आनंद घेऊन येते असं मानण्यात येते. लग्न झालेल्या नव्या जोडीचे बेडरूम वास्तुशास्त्रानुसार कसे हवे याची विशेष माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. नव्या जोडीसाठी खोलीची दिशा, रंग आणि त्यातील सामान कोणत्या स्वरूपात असायला हवे याची खास माहिती तुमच्यासाठी. 

बेडरूमची दिशा 

bedroom

वास्तुशास्त्र म्हणजे एक अभ्यास आहे आणि आर्किटेक्चरप्रमाणेच याचा उपयोग केला जातो. यामध्ये दिशेचे महत्त्व अधिक असते. नवे लग्न झाले असेल तर त्यांची बेडरूम ही दक्षिण – पूर्व दिशेला असायला हवी आणि घरातील सर्वात वरच्या मजल्यावर त्यांची खोली असायला हवी असे मानले जाते. बरेचदा नव्या जोडप्याची खोली ही वास्तुशास्त्राच्या पद्धतीप्रमाणे नसते. त्यामुळे अशावेळी वास्तुदोष दूर करण्यासाठी खोलीतील सेटिंग अशाप्रकारे असायला हवी जेणेकरून नवऱ्याचे डोके हे दक्षिण दिशेला आणि पाय हे उत्तरेला असतील. यामध्ये ही गोष्ट लक्षात राहू द्या की, पाय हे एकदम दरवाजासमोर येता कामा नयेत. जर तुम्हाला या दिशेले झोपणे शक्य नसेल तर तुम्ही तुमचे डोके पूर्व दिशेला करून झोपा. पण जेव्हा तुम्हाला गरोदर होण्याची इच्छा असेल तेव्हा तुम्ही तुमची झोपण्याची जागा बदलायला हवी.  बेडरूम टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील.

कसा असायला हवा बेड 

सोशल डेकोरेशन विसरून तुम्ही तुमचा बेड निवडायला हवा. मेटलमध्ये कोल्ड एनर्जी असते आणि लाकडामध्ये वॉर्म एनर्जी असते. नवीन लग्न झालेल्या जोडीला वॉर्म एनर्जीची अत्यंत गरज असते. याशिवाय लक्षात ठेवा की, बेडमध्ये जर बॉक्स असेल तर त्यामध्ये कोणत्याही भंगार असणाऱ्या वस्तू ठेऊ नयेत आणि त्याचप्रमाणे कात्री, सुरी अशा कोणत्याही धारदार वस्तू या बेडमध्ये असू देऊ नयेत. तसंच बेडची गादीही समान असावी. दोन गादी असू नयेत. 

कसा असावा आरसा 

आरसा हा आपले प्रतिबिंब दर्शवित असतो. कोणतीही गोष्ट दुप्पट करणे आणि एनर्जी पसरवणे हे आरशाचे महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे आरसा बेडरूमध्ये योग्य दिशेला असणे अत्यंत गरजेचे आहे. झोपताना तुम्ही आरशात दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार घरात कुठे आरसा असावा यालाही महत्त्व आहे. त्यामुळे आरसा हा नेहमी तुमच्या बेडच्या बाजूला असावा. समोर असू नये.  

ADVERTISEMENT

खोलीचे डेकोरेशन कसे असावे 

खोलीचे डेकोरेशन नक्की कसे असावे हेदेखील वास्तुशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त लोक फोटोफ्रेम्सचा वापर करतात. मात्र नव्या लग्न झालेल्या जोडप्याने बेडरूमध्ये असे फोटो लावावेत ज्यामुळे त्यांना आनंद मिळतो. देवीदेवतांचे फोटो कधीही बेडरूममध्ये लाऊ नयेत. तसंच कोणत्याही सोलो व्यक्तींचा अथवा जंगली जानवरांचे फोटो बेडरूममध्ये लाऊ नयते. एकमेकांबरोबर असणारे फोटोफ्रेम्स नक्कीच तुम्ही वापरू शकता. 

बेडरूमचा रंग कसा असावा 

आपला आवडता रंग कोणता आहे त्याचा वापर तुम्ही भिंतीवर करावा. जमलं तर तुम्ही खोलीला लाल रंग नक्की द्या. कारण हा रंग तुमच्यातील एनर्जी आणि उत्साह वाढवायला अधिक मदत करतो. तसंच तुमच्यामधील प्रेम वाढविण्यासाठीही याची मदत होते. जास्त लाल रंगाचा वापरही करू नका. कारण यामुळे तुम्हाला गरोदरपणात अडचणी येऊ शकतात. तसंच एकमेकांमध्ये भांडणही होऊ शकतात. त्यामुळे एखाद्या भिंतीला लाल रंग असणे योग्य आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रंगाचा वापर करावा. काळा रंग वापरू नये. 

तुम्हाला आम्ही दिलेल्या या वास्तु टिप्स नक्की कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Dec 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT