ADVERTISEMENT
home / Vastu
vastu-tips-for-home-in-marathi

वास्तु शास्त्र टिप्स मराठीत | Vastu Shastra Tips For Home In Marathi

घरात प्रवेश करताना रितसर वास्तुशांती निमंत्रण पत्रिका देऊन वास्तूशांत केली जाते. मात्र बऱ्याचदा काही घरांमध्ये तुम्हाला सतत भांडणं असल्याचं जाणवतं. काही घरांमध्ये सुखशांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशावेळी आपल्याला काही वास्तूदोष असल्याचंही सांगण्यात येतं. पण तुम्हाला जर घरामध्ये सुखशांती राखायची असेल तर तुमच्या स्वभावासह तुमच्या घरातदेखील काही वास्तूबदल करावे लागतात. त्यासाठी नक्की काय उपाय करायचे असतात याबाबतीत बऱ्याच टिप्स असतात. घरात आणि आपल्या ऑफिसमध्ये अथवा आपल्या आजूबाजूला सुख आणि समृद्धी हवी असेल तर त्यासाठी वास्तूचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या सगळ्या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन वातावरण अधिक सकारात्मक बनवण्यास मदत मिळते. वास्तू नियमांप्रमाणे पूर्व आणि उत्तर ही दिशा अधिक उर्जात्मक आहे. त्यामुळे या दिशांना योग्य गोष्टी ठेवल्यास, आरोग्य, समृद्धी आणि इतर शक्तींचा विकास होतो. नक्की काय आहेत घरात सुखशांती राखण्यासाठी वास्तु शास्त्र टिप्स मराठीत (Vastu Shastra Tips In Marathi) जाणून घ्या – 

सोप्या सहज वास्तू टिप्स मराठी – Vastu Tips In Marathi

सोप्या सहज वास्तू टिप्स मराठी | Vastu Tips In Marathi
सोप्या सहज वास्तू टिप्स मराठी – Vastu tips in marathi

घरामध्ये सुखशांती राखून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपला स्वभाव, तडजोड या सगळ्या गोष्टी तर असतातच पण त्यासह आपल्याला साथ हवी असते ती वास्तूदोष हटवण्याची. त्यामुळे त्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या (Vastu Tips In Marathi) हे जाणून घेऊया – 

मेणबत्ती लावून ध्यानधारणा

मेणबत्ती लावून ध्यानधारणा | Use Candle For Meditation
मेणबत्ती लावून ध्यानधारणा (Use Candle For Meditation)

तुमचे मन कोणत्याही कारणाने अशांत असेल आणि ठीक चित्त थाऱ्यावर राहात नसेल तर याचे कारण वास्तुदोष असू शकते. अशावेळी तुम्ही एक दिवा वा मेणबत्ती लावा आणि समोर ठेवा आणि त्यानंतर साधारणपणे हलकेसे मेडिटेशन करण्याासाठी संगीत लावा. आपल्या नजरेसमोर जळती मेणबत्ती ठेवा आणि मग संगीत चालू असताना तुम्ही मेणबत्तीच्या ज्वालेकडे लक्ष द्या. ही प्रक्रिया तुम्ही साधारण 21 दिवस रोज दिवसाला 15 मिनिट्स इतका वेळ करा. लवकरच तुमच्या मानसिक स्वरूपात परिवर्तन घडून येईल आणि अशांत मन शांत होण्यास मदत मिळेल. 

बेडजवळ मोठ्या भांड्यात पाणी ठेवणे

आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीमध्ये तुम्हाला नैराश्याची लक्षणे दिसत असतील तर नैराश्याच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार तुम्ही एका मोठ्या भांड्यांमध्ये पाणी घ्या आणि त्यात रात्रभर फूल टाकून ठेवा. सकाळी हे पाणी तुम्ही एखाद्या झाडामध्ये घाला. तुमचे मन व्यवस्थित राहण्यासाठी साधारणपणे 40 दिवस करायला लागते. 40 दिवस पूर्ण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनस्थितीत बदल घडून आलेला दिसेल.  

ADVERTISEMENT

एक मूठ तांदूळ हातात ठेवणे

जर तुम्ही खूपच भावनिक असाल आणि तुमचे मन सतत अशांत राहात असेल तर तुम्ही एका मुठीमध्ये तांदूळ ठेवा आणि 11 अथवा 21 वेळा ॐ नमः शिवायचा जप करून पक्ष्यांना घाला. हा नियम तुम्ही साधारण 16 दिवस करून पाहा. असं केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शांतता स्थापित होते. त्यामुळे तुम्ही वास्तुत शांतता प्रस्थापित करण्यासाठी साधारणतः हा प्रयोग करून पाहता येतो. 

गाईच्या तुपाने तिलक

तुमच्या घराच्या पूर्वेला एखादे मोठे झाड असेल आणि त्याची सावली तुमच्या घरावर येत असेल तर तुमच्या घराला पूर्व दिशेशी जोडलेला असा वास्तुदोष असल्याचे सांगण्यात येते. या दोषामुळे घरात सतत भांडणे होत राहतात. ही भांडणे दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर नेहमी सिंदूर आणि गाईच्या तुपाने तिलक लाऊन ठेवावा. तसंच यावर ॐ लिहा आणि यामध्ये तुम्ही काही फुलांचे झाड लाऊ शकता. 

घराजवळ मोठे झाड लावू नये

घराजवळ मोठे झाड लावू नये (No Tree Opposite Your Home)

दक्षिण दिशेचे स्वामी मंगळ आहे आणि या दिशेचे देवता यम आहेत. जर तुमचा मंगळ शुभ नसेल तर ही दिशा सतत घरामध्ये कोर्टातील अडचणी, राग आणि अन्य गोष्टींचे कारण ठरते. त्यामुळे अशा दिशेमध्ये वास्तुदोष असेल तर त्रिकोणी झेंडा लावा आणि घराच्या समोर तुटलेले कोणतेही सामान ठेऊ नका. तसंच मुख्य दरवाजाजवळ कधीही कोणतेही मोठे झाड लावण्याची चूक करू नका. असं केल्यामुळे घरातील शांतता खराब होते आणि घरात सतत अशांतता राहाते.  

मुख्य दरवाजाजवळ मोठा घळ पाणी भरून ठेवा

उत्तर – पश्चिम दिशेचा स्वामी हा चंद्र आहे. या दिशेचा वायु हा देव आहे. वास्तुशास्त्रानुसार, चंद्र चांगला असेल तर घरात शांतता आणि सुखशांतता लाभते. तर चंद्र अशुभ असल्यास, व्यक्ती चंचल असतात आणि त्यामुळे योग्य काम होत नाही (Vastu Tips In Marathi). अशा परिस्थितीत घरात नेहमी एक मोठी बादली अथवा भांडे पाण्याने भरा आणि त्यात सुगंधित फुल कायम ठेवा. रोज हे फूल बदलत राहा. असं केल्यामुळे घरात शांतता नांदते. 

ADVERTISEMENT

घराचे दार दक्षिणमुखी नसावे

घराचे दार दक्षिणमुखी नसावे (Door Should Not Face South)

आपण बऱ्याचदा ही गोष्ट ऐकतो. पण याचं नक्की कारण काय हे आपल्याला माहीत नसतं. खरं तर हिंदू संस्कृतीनुसार मृत व्यक्तीचे पाय हे दक्षिण दिशेला करून ठेवले जातात. त्यामुळे दक्षिण बाजूला नकारात्मक ऊर्जा असते असं म्हटलं जातं. म्हणूनच कोणत्याही घराचं दार हे दक्षिणमुखी नसावं असंही सांगण्यात येतं. जर तुमचं दार दक्षिण बाजूला असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही त्याच दाराच्या समोर मोठा आरसा लावू शकता ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही. 

लाकडी वस्तू ठेवाव्या

लाकडी वस्तू ठेवाव्या (Keep Wooden Things)

तुम्ही तुमच्या घर अथवा ऑफिस अथवा तुमच्या शो रूममध्येही पूर्व दिशेला लाकडी फर्निचर अथवा लाकडाने बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवल्यात. उदाहरणार्थ सामान ठेवण्यासाठी वॉर्डरोब, शो पीस, लाकडी फ्रेममधील फोटोज तर यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा घरामध्ये मिळते असं म्हटलं जातं. लाकडी वस्तू या घराला शोभाही देतात आणि बघायलाही प्रसन्न वाटतं त्यामुळे या गोष्टींचा उपयोग करावा. 

खिडक्यांची मांडणी

खिडक्यांची मांडणी (Windows To Bring Sunlight)

घराच्या खिडक्या आणि दारं अशा ठिकाणी तुम्ही करून घ्यावीत जिथून तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश अधिक येईल आणि घरात हसतंखेळतं वातावरण राहील. घरात सतत अंधार आल्यास अधिक प्रमाणात आजार निर्माण होतात. पण हेच जर अधिक आणि व्यवस्थित सूर्यप्रकाश सतत घरात येत असेल तर तुमच्या घरातील आजारपण दूर होऊन घरात सुखशांती आणि समाधान टिकून राहण्यास मदत होते. शिवाय घरातल्या प्रत्येक रूममध्ये किमान एकतरी खिडकी असावीच याकडे लक्ष द्या. 

मुख्य दरवाजाजवळ शौचालय नको

घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात सकारात्मक शक्ती येण्याचा मार्ग. शौचालय हे सहसा आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानण्यात येत नाही. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी तुमचं शौचालय हे घराच्या आतल्या बाजूला एखाद्या कोपऱ्याजवळ असणं अपेक्षित आहे. कधीही घरात प्रवेश करणार (Vastu Tips In Marathi)असलेल्या दरवाजाजवळ शौचालय बांधून घेऊ नये. त्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहातो.  

ADVERTISEMENT

चंदनाची अगरबत्ती लावा

चंदनाची अगरबत्ती लावा (Sandalwood To Reduce Stress)

खरं तर अगरबत्तीच्या सुवासाने संपूर्ण घरात सुगंध पसरतो. त्यातही चंदन हे अँटिऑक्सिडाईज्ड असतं आणि त्याचा आपल्या शरीराला चांगला फायदाच मिळतो. त्यामुळे घरातलं वातावरणही सुगंधी आणि प्रसन्न राहतं. सहसा अशा आनंदी वातावरणात कोणालाही भांडण करावंसं वाटणार नाही. त्यामुळे नियमित तुम्ही मानसिक तणावपासून दूर राहण्यासाठी घरात चंदनाची अथवा तुमच्या आवडीची कोणतीही अगरबत्ती संध्याकाळच्या वेळी लावा. तुम्हाला हवी असल्यास, दिवसातून दोनवेळादेखील तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे तुमचा तणाव कमी होऊन शांतता मिळते. 

दरवाजासमोर बेड नको

तुमची बेडरूम अशी असावी की जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना तुमचा बेड थेट दिसणार नाही. जर दरवाजासमोर बेड असेल त्याला थोड शिफ्ट करा. नाहीतर वास्तुदोषामुळे दांपत्याच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमची रूम छोटी असेल आणि बेड शिफ्ट करता येणार नसेल तर पडदा लावावा. 

बेडसमोर आरसा नको

बेडच्या समोर कधीही आरसा नसावा. यामुळे समाजात बदनामी होण्याची सदैव चिंता राहते. वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरसा बघू नये. जर तुम्ही असं केलंत तर दिवसभर तुमच्याबरोबर चुकीच्या गोष्टी होतील. त्यामुळे तुम्हाला खरं तर दुःख होईल. असं असल्यास, सकाळी उठल्यावर एखादा फोटो बघा ज्याने तुम्हाला सकारात्मक उर्जा प्राप्त होईल आणि जर असं घडणारनसेल तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही किमान 5 मिनिट्स मेडिटेशन करा. 

स्वयंपाकघरात देव्हारा नको

स्वयंपाकघरात देव्हारा नको (No Devghar In Kitchen)

आपल्याकडे बऱ्याच जणांच्या घरात स्वयंपाकघरातच देव्हारा असतो. पण वास्तुशास्त्र नेमकं याच्या उलट सांगतं. वास्तूनुसार, स्वयंपाकघरामध्ये किंवा जवळ कधीही देव्हारा असू नये. यामुळे घरातील लोकांच्या रागात वाढ होते. तसंच आरोग्यनिगडीत समस्याही वाढतात. त्यामुळे शक्य असल्यास देव्हारा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरापासून दूर ठेवा आणि घराच्या हॉलमध्ये अथवा अन्य ठिकाणी तुम्ही हा देव्हारा करून घ्या.

ADVERTISEMENT

चुकीच्या दिशा टाळा

जर तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल किंवा घरात इंटरिअरप्रमाणे बदल करणार असाल (Vastu Tips In Marathi) तर लक्षात ठेवा की, स्वयंपाकघर बनवताना ते नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला असावं. जर त्या दिशेला बनवणं शक्य नसल्यास उत्तर-पश्चिम दिशेला बनवून घ्या आणि स्वयंपाकघराचा दरवाजा उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला बनवा. वास्तूशास्त्रानुसार या दिशांना स्वयंपाकघर न केल्यास कुटुंबात सतत भांडणं होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं स्वयंपाकघर नक्की कोणत्या दिशेला आहे ते नीट तपासून घ्या. 

घराबाहेर ठेवा हत्तीची मूर्ती

घराबाहेर ठेवा हत्तीची मूर्ती (Place Elephant Idol Outside House)

आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवा आणि घराबाहेर पडताना ती बघून निघा. यामुळे तुमचं गुडलक नेहमी कायम राहील आणि घर सुरक्षित राहील. तसंच कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही.

घरात कधीही दोनवेळा केर काढू नका

घरात कधीही दोनवेळा केर काढू नका (Don’t Take Out Litter Twice)

आपल्याकडे शहरात प्रदूषण आणि धूळ सतत असते. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सतत कचरा काढत असते. पण घरात भांडणं नको असतील तर सतत लक्षात ठेवा, घरात कधीही दोन वेळा केर काढू नये किंवा लादी पूसू नये. एकदाच केर-लादी केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण दुसऱ्यांदा अर्थात सतत केरकचरा काढत राहिल्यास, सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते. 

घरात सुखसमाधानासाठी उठा उत्तर – पूर्व दिशेला

जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा डोकं अशा दिशेला असावं की जेणेकरून तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्ही उत्तर-पूर्व दिशेला असेल. कारण या दिशेला कुबेराचा वास असतो असं सांगण्यात येतं आणि असं केल्याने तुमच्या घरातील सुख-समृद्धीही वाढेल. कुबेर अर्थात संपत्ती त्यामुळे तुम्हाला कुबेर प्रसन्न होऊन तुमच्या घरातील सुखसमाधान टिकून राहण्यास मदत होते. 

ADVERTISEMENT

बाथरूमध्ये बादली रिकामी ठेवणं अपयशाचं लक्षण

जर घरातील कोणी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असेल तर लक्षात ठेवा की, बाथरूममध्ये एकही बादली रिकामी ठेऊ नका. प्रत्येक बादली पाण्याने भरलेली असली पाहिजे. बाथरुममध्ये शक्यतो निळ्या रंगाच्या बादल्याचा वापर करावा. बाथरूममध्ये निळा रंग वापरण चांगलं मानलं जातं. वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये नेहमी एक तरी निळ्या रंगाची बादली स्वच्छ पाण्याने भरून ठेवलेली असावी. असं केल्याने तुमचं गुडलक नेहमी चांगलं राहील आणि यशही मिळेल. यश मिळाल्यास, चिडचिड होणार नाही आणि घरातही शांतता टिकून राहील. 

बेडरूमध्ये आवाज होणाऱ्या वस्तू ठेवू नका

तुमच्या बेडरूम अशी कोणतीही वस्तू नसावी ज्यामुळे आवाज होईल. जसं रेडिओ, टीव्ही किंवा कोणतेही वाद्य यंत्र. यामुळे आर्थिक समस्या, मानसिक तणाव, आजारपण इत्यादी समस्या निर्माण होतात. आपल्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंडचाइम लावावे जिथून हवा येत असेल. विंडचाईमचा मधूर आवाज कानावर पडल्याने तुम्हाला एक आनंद मिळतो आणि तणाव कमी होतो. तसंच घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक आणि उत्साही राहण्यास मदत मिळते.  

स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्र टिप्स मराठी – Kitchen Direction As Per Vastu In Marathi

स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्र टिप्स मराठी – Kitchen Direction As Per Vastu In Marathi

स्वयंपाकघर हा प्रत्येक घराचा महत्त्वाचा भाग असतो. आयुष्यात आपण कमावतो ते खाण्यासाठी आणि त्यामुळे जेवणाच्या वेळी कधीही घरात भांडणं होऊ नयेत अशी आपली इच्छा असते. स्वयंपाकघरासाठी वास्तुशास्त्र टिप्स मराठीतून (Kitchen Direction As Per Vastu In Marathi) आम्ही इथे देत आहोत, ते तुम्ही जाणून घ्या –

  • घराची दक्षिण पूर्व दिशा ही स्वयंपाकघरासाठी सर्वात शुभ असते असे समजण्यात येते
  • शौचालयाच्या वर अथवा खाली कधीही स्वयंपाकघर करू नये 
  • बेडरूमच्या वर अथवा खाली स्वयंपाकघराचे डिझाईन करू नये 
  • स्वयंपाकघरामधील गॅस हा स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या समोर कधीही तयार करू नये 
  • स्वयंपाकघराचा मुख्य दरवाजा हा कोणत्याही कोन्यात असू नये. स्वयंपाकघराचा दरवाजा पूर्व, उत्तर वा पश्चिम दिशेला असावा 
  • ईशान्य कोनामध्ये स्वयंपाकघर नसावे. यामुळे घरात मानसिक तणाव अधिक राहातो
  • दक्षिण – पश्चिम दिशेलाही स्वयंपाकघर कधीही बांधू नये. यामुळे घरात भांडणं होतात
  • उत्तर दिशेमध्ये स्वयंपाकघर बनवू नका. ही कुबेर देवाची दिशा असल्याचे मानण्यात येते. या दिशेला स्वयंपाकघर असल्यास, खर्च अधिक वाढतो 
  • जेवण बनवताना पश्चिम दिशेला चेहरा असू नये
  • स्वयंपाकघराच्या भिंतींना कधीही काळा रंग देऊ नये 
  • स्वयंपाकघरातील ईशान्य दिशेला फ्रिज ठेऊ नये 
  • वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात डायनिंग टेबल अजिबात असू नयेत. तुम्हाला जर अगदीच डायनिंग टेबल ठेवायचे असेल तर तुम्ही उत्तर पश्चिम दिशा पाहून ठेवा 
  • गॅस आणि सिलेंडर हे स्वयंपाकघरात दक्षिण पूर्व दिशेला ठेवा 
  • तुम्हाला मायक्रोव्हेव ठेवायचा असेल तर नेहमी दक्षिण पूर्व दिशेला ठेवा 
  • आपल्या घरातील धान्य हे नेहमी स्वयंपाकघरातील दक्षिण पश्चिम दिशेला ठेवा 
  • कधीही स्वयंपाकघरात मध्यावर गॅस ठेऊ नये 

घरासाठी रंग वास्तुशास्त्रानुसार – Vastu Shastra Colour Tips For Home In Marathi 

घरासाठी रंग वास्तुशास्त्रानुसार | Vastu Shastra Colour Tips For Home In Marathi
घरासाठी रंग वास्तुशास्त्रानुसार – Vastu Shastra Colour Tips For Home In Marathi 

वास्तुशास्त्रानुसार घराच्या भिंतींचे रंगही तुमच्या आयुष्यात बदल घेऊन येतात. घरातील रंग हे तुमची आवड दर्शवितात. भिंतींचे रंग हे घरातील लोकांनाच नाही तर घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही आकर्षित करतात. घराला केवळ सुंदर दिसण्यासाठी रंग दिला जातो असं जर तुम्हाला वाटत असेल तर असे अजिबात नाही. वास्तुशास्त्रानुसार घरासाठीही रंग निवडण्यात येतो. तुम्हीही जाणून घ्या यामागील कारणे – 

ADVERTISEMENT
  • घरात प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉईंग रूम दिसते. याचा रंग साधारणतः ऑफ व्हाईट, पांढरा अथवा फिकट पिवळा असावा 
  • बेडरूमचा रंग गुलाबी, फिकट निळा अथवा फिकट हिरवा ठेवावा. जेणेकरून दाम्पत्य आयुष्यात अधिक सुखी राहाते आणि बेडरूम दोषमुक्त राहण्यास मदत मिळते 
  • स्वयंपाकघराच्या भिंतींचा रंग हा लाल अथवा नारिंगी असल्यास अधिक चांगले मानण्यात येते. तर तुम्हाला हवे असल्यास, हिरवा रंगदेखील शुभ मानला गेला आहे
  • वास्तुशास्त्रानुसार, बाथरूमचा रंग पांढरा ठेवावा, कारण हा रंग शुभ मानण्यात येतो 
  • पूजाघराच्या आसपासचा रंग हा फिकट पिवळा, हलकासा निळा अथवा नारिंगी केल्यास अधिक सुंदर दिसतो 
  • घराच्या बाहेरील भिंतीवर फिकट पिवळा अथवा पांढरा असावा. वास्तुशास्त्रानुसार हा रंग उत्तम मानला जातो 

घराला चांगला रंग दिल्यास कायम सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यासह योग्य रंग निवडल्यास, मनालाही शांतता लाभते आणि घरात प्रसन्नता राहाते.

घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तू टिप्स मराठी – Vastu Shastra For Home Entrance In Marathi

घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तू टिप्स मराठी | Vastu Shastra For Home Entrance In Marathi
घराच्या प्रवेशद्वारासाठी वास्तू टिप्स मराठी – Vastu Shastra For Home Entrance In Marathi

घराच्या प्रवेशद्वारासाठीही वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. मुख्य द्वार हे नेहमी इतर दारांपेक्षा मोठे असावे आणि क्लॉकवाईज हे उघडता यावे अशी याची रचना असावी. तर एकाच लाईनमध्ये तीन दरवाजे असू नयेत. कारण असे गेल्यास, गंभीर वास्तुदोष समजण्यात येतो.

  • उत्तर – पूर्व दिशा – वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य द्वाराच्या बाबतीत उत्तर – पूर्व दिशा अत्यंत शुभ मानली जाते. ही एक अशी दिशा आहे जिथून सकाळी सूर्याच्या संपर्कात आल्याने चांगली ऊर्जा प्राप्त होते. तसंच घरातील व्यक्तींना यामुळे ऊर्जा मिळते आणि जीवन जगण्याची चांगली शक्ती मिळते 
  • उत्तर दिशेला मुख्य प्रवेशद्वार असल्यास, कुटुंबामध्ये धन आणि भाग्य प्राप्त होते आणि त्यामुळे तुमच्या घराचे प्रवेशद्वार या दिशेला बांधावे
  • पूर्व दिशेला आदर्श दिशा मानले जाते. ऊर्जा प्राप्त करून देणारी आणि सकारात्मक शक्ती वाढवणारी ही दिशा असते. घरात उत्साह वाढविण्यासाठी उत्तम ठरते. त्यामुळे या दिशेलाही दरवाजा बांधू शकतो
  • दक्षिण पूर्व दिशेला कधीही प्रवेशद्वारे बांधू नये. दुसरा कोणताही पर्याय नसेल तर मात्र इलाज नाही
  • उत्तर – पश्चिम दिशा ही कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यास प्रवेशद्वारासाठी निवडावा

प्रवेशद्वाराचा रंग कसा असावा 

पश्चिमः निळा आणि पांढरा 
दक्षिण आणि दक्षिण – पूर्वः चंदेरी, नारिंगी आणि गुलाबी
दक्षिण – पश्चिम – पिवळा
उत्तरः हिरवा 
उत्तर – पूर्वः क्रिम आणि पिवळा 
उत्तर – पश्चिमः पांढरा आणि क्रिम
पूर्वः पांढरा, ब्राऊन, फिकट निळा

घरात सुखशांतीसाठी पाळा नियम – Rules For Harmony In The House

घरात सुखशांतीसाठी पाळा नियम
घरात सुखशांतीसाठी पाळा नियम 
  • तुमच्या भाग्याची साथ मिळाल्यावरच तुमच्यावर लक्ष्मीची कृपा होईल. त्यासाठी तुम्ही काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. रोज घरातील पहिली पोळी किंवा शेवटी उरलेली पोळी गाय किंवा कुत्र्याला खाऊ घाला. असं केल्याने तुमचा भाग्योदय होईल आणि ज्या कामात तुम्ही भाग घ्याल त्यातही यश मिळेल.  
  • जर तुमच्या किचनमधला एखादा नळ किंवा पाईप गळत असेल तर तो ताबडतोब रिपेअर करून घ्या किंवा बदलून घ्या. वास्तुशास्त्रानुसार, पाणी वाहणं हे पैशांची चणचण जाणवण्याचं कारण असू शकतं. पैशाची चणचण जाणवू नये यासाठी वास्तू टिप्स असतात याशिवाय किचनमधील कचराकुंडी ही नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला असावी. यामुळे घरात सुख शांती कायम राहते.
  • प्रत्येक गृहिणीच्या दैनंदिन वापरातली गोष्ट म्हणजे तवा. पण तुम्हाला माहीत आहे का, या तव्याबाबतही वास्तूशास्त्रात सांगण्यात आलं आहे. रात्री जेव्हा तुम्ही जेवण तयार करता त्यानंतर पोळीचा तवा नेहमी धुवून ठेवा. तव्याचा वापर तुम्ही करणार नसाल तेव्हा तो अशा ठिकाणी ठेवा जो सहजासहजी कोणाला दिसणार नाही. त्याचप्रमाणे तवा आणि कढई कधीही उलटी ठेवू नका. कारण तवा उलटा ठेवल्यास घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो.
  • साधारणतः मुंबईतल्या प्रत्येक घरात स्वयंपाकघर आणि बाथरूम हे लांबलांबच असतं. त्यामुळे ही समस्या जाणवणार नाही. पण वास्तूमध्येसुद्धा ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे की, बाथरुम आणि स्वयंपाकघर कधीही जवळजवळ असू नये. यामुळे घरांमध्ये आरोग्यासंबंधी समस्या जाणवू शकतात. म्हणूनच स्वयंपाकघर हे नेहमी बाथरूमपासून लांब असावं.
  • असं म्हणतात की, लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छता असते. त्यामुळे लक्षात ठेवा की, ईशान्य कोपरा म्हणजेच पूर्व-उत्तर दिशा नेहमी रिकामी ठेवा आणि तिथे खासकरून स्वच्छता ठेवा. शक्य असल्यास तुमचं देवघरही त्याच कोपऱ्यात बनवून घ्या. यामुळे घरात येणाऱ्या लक्ष्मीमध्ये अडथळा निर्माण करणारे दोष दूर होतील.
  • सकाळी आणि संध्याकाळच्या प्रहराला वास्तू शास्त्रात शुभ मानले जाते. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा शक्य असल्यास उघडा ठेवावा. घराच्या आतल्या भागात येणाऱ्या सूर्यकिरणांच्या मार्गही मोकळा ठेवावा. ताजी हवा आणि सूर्याच्या किरणांमुळे घरातील अनेक दोष दूर होतात आणि घरात सदैव लक्ष्मीचा वास कायम राहतो. तसंच उत्पन्नाचे मार्गही खुले होतात.
  • नोकरी करणाऱ्यांच्या घरी अक्वेरियम असणं नेहमी शुभ मानलं जातं. जर तुम्हाला अक्वेरियम आणून त्याची देखभाल करणं शक्य नसेल तर एखादा रंगीबेरंगी माशांच्या फोटो किंवा शो-पीसही तुम्ही ठेऊ शकता. असं म्हणतात की, एक्वेरियमच्या आत वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह निर्माण होतो. ज्यासोबतच घरातील धन संपन्नता आणि खुशालीही वाढते.  
  • आजकालच्या आधुनिक काळात  बेडरूममध्ये बूट-चपला ठेवण्याचीही जागा असते. ते योग्य नाही. झोपण्याच्या खोलीत कधीही बाहेर घालण्याची चप्पल किंवा बूट ठेऊ नये. ह्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यासाठी प्रयत्न करा की, तुमच्या बेडरूमबाहेर बूट-चपला ठेवायची वेगळी जागा असावी
  • चूकूनही कधी बेडच्या आसपास खाण्याची कोणतीही वस्तू ठेऊ नका किंवा बेडरूममध्ये खाऊ ही नका. कारण हे दारिद्रयाचं लक्षण आहे. जेवण नेहमी किचन किंवा डायनिंग एरियामध्ये बसून स्वच्छ जागी जेवावं.
  • बेडरूममध्ये कपडे ठेवायचं कपाट हे उत्तर- पश्चिम किंवा दक्षिण दिशेला असावं.
  • बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सामान असल्यास ते खोलीच्या दक्षिण- पूर्व कोपऱ्यात ठेवावं.
  • बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करू नये. कारण ही खोली प्रेम आणि आराम करण्यासाठी आहे. भांडण किंवा वाद करण्यासाठी नाही.
  • बेडरूमच्या भिंती कोणत्याही प्रकारे तोडफोड झालेल्या नसाव्या. यामुळे दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातही दुरावा येण्याची शक्यता असते.
  • वास्तूनुसार, सिंकची जागा कधीही गॅसपासून लांब असली पाहिजे. स्वयंपाकघराध्ये गॅस नेहमी पूर्व दिशेला असावा. फ्रिज किंवा मायक्रोवेव्ह हे अग्नी कोनात असले पाहिजेत. या गोष्टी वास्तूनुसार शुभ मानल्या जातात.
  • वास्तूनुसार किचनच्या बाहेर किंवा आसपास कधीही पाण्याचं पिंप ठेवू नये. यामुळे नात्यांवर वाईट परिणाम होतो. याशिवाय रेफ्रिजरेटर किंवा गॅससुद्धा कधी खिडकी किंवा दरवाज्याजवळ नसावा. यामुळे घरातली समृद्धी आणि आगीची पवित्रता प्रकृती दरवाज्याने बाहेर जाते.

प्रश्नोत्तरे (FAQs)

प्रश्न – खरंच वास्तूदोष असतात का?
उत्तर – हे अर्थातच तुमच्या मानण्यावर आहे. पण वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्यास, तुम्हाला त्याचा योग्य परिणाम पाहायला मिळतोय का हे तुम्ही एकदा अनुभव घेऊन पाहा.

ADVERTISEMENT

प्रश्न – घरात सुखशांतीसाठी वास्तूशास्रानुसार बदल केल्याने योग्य परिणाम होतात का?
उत्तर – या सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर अवलंबून असतात. पण हे एक शास्र असतं. त्यामुळे तुम्ही जर या शास्त्रानुसार काही टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला त्याचा परिणाम काय होतोय हे पाहायला मिळेल आणि हा तुमचा स्वतःचा अनुभव असेल.

प्रश्न – घरातील भांडणं टाळण्याशाठी वास्तूशास्त्रावर कितपत विश्वास ठेवावा?
उत्तर – हेदेखील तुम्ही सर्वतः तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुमचं घर आधीच तुम्ही व्यवस्थित इंटिरिअर केलेलं असतं. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार तुम्हाला त्यात बदल करायचा आहे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल.

प्रश्न – वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर कोणत्या बाजूला असावे?
उत्तर – वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे नेहमी आग्नेय बाजूला अर्थात दक्षिण पूर्व दिशेला असावे. तसंच उत्तर पश्चिम दिशेलादेखील तुम्ही करून घेऊ  शकता. 

प्रश्न – वास्तुशास्त्रानुसार बेडरूमचा रंग कोणता असावा?
उत्तर – बेडरूमचा रंग गुलाबी, हलकासा निळा अथवा फिकट हिरवा असावा. यामुळे नात्यात मधुरता राहते. तसंच मास्टर बेडरूम हे नेहमी दोषमुक्त राहणे गरजेचे आहे. तर स्वयंपाकघराचा रंग लाल असल्यास अधिक चांगले राहाते. 

ADVERTISEMENT

निष्कर्ष – वास्तुशास्त्रानुसार घरातील गोष्टी योग्य दिशेला हव्यात, यासाठी काही वास्तू टिप्स (Vastu Tips In Marathi) आम्ही तुम्हाला या लेखातून दिल्या आहेत. वास्तुशास्त्र टिप्स (Vastu Shastra Tips For Home In Marathi) या वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घराची रचना करून घेऊ शकता. तर तुमच्या स्वयंपाकघराच्या रचनेसाठीही काही सोप्या टिप्स (Kitchen Direction As Per Vastu In Marathi) आम्ही दिल्या आहेत. याशिवाय वास्तुशास्त्रानुसार कोणते रंग (Vastu Shastra Color Tips For Home In Marathi) महत्त्वाचे आहेत याबाबत महत्त्वाची माहिती. 

20 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT