ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
इंदौरमध्ये पूर्ण झालं सारा आणि विकीच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग

इंदौरमध्ये पूर्ण झालं सारा आणि विकीच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग

विकी कौशल आणि सारा अली खान लवकरच एका चित्रपटातून सर्वांसमोर येणार आहेत. चाहते ही फ्रेश जोडी पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक आहेत. लक्ष्मण उतेकरच्या आगामी चित्रपटात या दोघांचा रोमांन्स चाहत्यांना पाहता येणार आहे. विकीचा लग्नसोहळा पार पडताच तो या चित्रपटाच्या शूटिंगसाठी रवाना झाला होता. भोपाळ नंतर आता इंदौरमध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होताच दोन्ही कलाकारांनी त्यांचा एक रोमॅंटिक फोटो सोशलल मीडियावर शेअर करत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. मात्र अजूनही या चित्रपटाचं शीर्षक मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

रिलेशनशीपबद्दल पहिल्यांदाच बोलली रुबिना दिलैक

विकी कौशलने शेअर केली पोस्ट

चित्रपटाचं इंदौरमधील शूटिंग पूर्ण होताच विकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्याने पोस्ट केलं आहे की, “नावात काय आहे, आताच तर चित्रपटाचं शूटिंग संपलं आहे. (सर्व टीमला टॅग करत) एवढा चांगला अनुभव दिल्याबद्दल सर्व टीमचे खूप आभार. या सुंदर स्टोरीला शूट करताना दररोज मजा आली. मी सर्वांना खूप मिस करणार आहे. इंदौरमधील सहकार्य करणाऱ्या आणि प्रेमळ लोकांचे पण खूप मनापासून आभार. ही गोष्ट मनातील आहे जी आता घरा घरात पोहचेल… किंवा गोष्ट घरातील आहे जी  मनाला स्पर्श करेल… लवकरच भेटू चित्रपटात”

शाहिद कपूरच्या जर्सीला मिळाली नवी रिलीज डेट, कोरोनामुळे होता रखडला

ADVERTISEMENT

काय म्हणाली सारा अली खान 

सारा अली खाननेही तिच्या अकाउंटवर एक खूप मोठी पोस्ट शेअर केली आहे. साराने शेअर केलं आहे की, “चित्रपटाचं शूटिंग इथे संपत आहे यावर विश्वास बसत नाही. लक्ष्मण सर तुमचे खूप आभार तुम्ही मला सौम्याचे  पात्र साकारण्यासाठी दिले. तुमच्या मार्गदर्शन, सपोर्टमुसाठी खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या पाठीशी सतत असण्यासाठी आणि मला सर्वोत्तम बनवण्यासाठी. सारा पुढे शेअर करते की, विकी तुझ्यासोबत दररोज अक्षरशः धमाका होता. पंजाबी गाण्यावर थिरकणं, सकाळसकाळ ड्राईव्ह करणं सर्व करताना खूप मजा आली. माझ्यासोबत तू हा प्रवास खूप मजेदार केलास यासाठी तुझे आभार. तू एक प्रतिभावंत कलाकार आहेस. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला तुझ्यासोबत स्क्रिन शेअर करायला मिळाली”

चित्रपटाचे कथानक 

लक्ष्मण उतेकर यांनी याआधी मिमी, लुकाछुपी हे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. ते आता शरीब हाश्मीसोबत या चित्रपटात काम करत आहेत. विकी आणि साराने या चित्रपटाचं आणि टीमचं भरपूर कौतुक केलं आहे. मात्र अजूनही चित्रपटाचं कथानक आणि शीर्षक गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. लवकरच या गोष्टीचा खुलासा केला जाईल आणि या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांना काहीतरी नवं पाहायला मिळेल. 

तापसी पन्नू ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, भारतीय चित्रपट संस्थेने जाहीर केली यादी

28 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT