ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
विजय देवरकोंडाचा बॉलीवूड डेब्यू रजनीकांत,प्रभासपेक्षाही असणार ग्रॅंड

विजय देवरकोंडाचा बॉलीवूड डेब्यू रजनीकांत,प्रभासपेक्षाही असणार ग्रॅंड

तेलुगू  चित्रपटांतील सुपरस्टार विजय देवरकोंडा करण जौहरच्या आगामी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. करणच्या ‘लायगर’ या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेची मुख्य भूमिका असेल. विजय देखील त्याच्या बॉलीवूड एन्ट्रीसाठी खूप उत्साही आहे. आजवर साऊथच्या अनेक मोठमोठ्या कलाकारांनी बॉलीवूडमध्ये नाव कमावलं आहे. रजनीकांत आणि प्रभासच्या बॉलीवूड एन्ट्रीमुळे चाहते अगदी थक्क झाले होते. रजनीकांतची चित्रपटातील एन्ट्री तर आजही तितकीच खास असते. मात्र विजय देवरकोंडाच्या बॉलीवूड एन्ट्रीसाठी खास प्लॅनिंग करण्यात आलं आहे. त्यामुळे विजय देवरकोंडाची या हिंदी चित्रपटाती एन्ट्री इतर साऊथ हिरोंपेक्षा ग्रॅंड केली जाणार आहे. 

विजय देवरकोंडाच्या बॉलीवूड एन्ट्रीसाठी खास प्लॅनिंग

लायगर चा निर्माता करण जौहर विजयला बॉलीवूडमध्ये प्रेझेंट करण्यामध्ये कोणतीच कसर सोडणार नाही आहे. त्यामुळे करणला विजयची बॉलीवूड एन्ट्री नेस्क्ट बिंग थिंग स्वरूपात करायची आहे. ज्यामुळे करण जोहरने विजयला प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी खास प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. विजय देवरकोंडा आणि करण जोहरसोबत एकत्र बसून लायगरचा दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणखी एका अॅक्शन चित्रपटाची योजना करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विजय देवरकोंडा हा तेलुगू चित्रपटातील एक दिग्गज अभिनेता आहे. त्यामुळे जर त्याची बॉलीवूडमध्ये एन्ट्री होत आहे तर ती गंगेपासून गंगोत्रीपर्यंत म्हणजेच उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत सर्वांना आवडेल अशी व्हायला हवी. कारण त्यामुळे संपूर्ण भारतीय आणि अभारतीय प्रेक्षकांचे मन चित्रपटातून जिंकता येईल.

या सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा, पण…

श्रुती मराठेचे लुक थक्क करणारे, दिसतेय अप्रतिम

ADVERTISEMENT

विजय देवरकोंडाला बॉलीवूडमध्ये आणण्यासाठी करण जोहर खूप उत्साही आहे. यापूर्वी त्याला वरूण धवनला प्रेझेंट करताना इतकं उत्साही पाहिलं होतं. विजय देवरकोंडादेखील लायगरमधील त्याच्या भूमिकेसाठी खास उत्साही दिसत आहे. त्याच्या मते लायगर हा एक बिग बजेट चित्रपट आहे. ज्याला आणखी भव्य दिव्य स्वरूप देण्यासाठी खास एक्शन सीन्स त्यात आहेत. या एक्शन मूव्ह्ज कदाचित प्रक्षकांनी यापूर्वी कधीच पाहिल्या नसतील. त्यामुळे मला विश्वास आहे की लॉकडाऊननंतर आता पुन्हा सिनेमागृह हाऊसफुल्ल करण्यासाठी लायगर एक चांगला चित्रपट ठरेल.याआधी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार अशी चर्चा होती. मात्र करणला या चित्रपटातून विजयची ग्रॅंड एन्ट्री करायची आहे. त्यामुळे सूर्यवंशी चित्रपटाप्रमाणे लायगरसाठी चित्रपटगृह पुन्हा सुरू होण्याची वाट पाहिली जाईल आणि मगच लायगर प्रदर्शित केला जाईल.

दीपिकाने केली अमिताभ बच्चन यांच्याकडे रणवीरची तक्रार आणि…

08 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT