ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
shruti marathe

श्रुती मराठेचे लुक थक्क करणारे, दिसतेय अप्रतिम

श्रुती मराठे (Shruti Marathe) नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते आणि आपले वेगवेगळे फॅशन स्टाईल स्टेटमेंट (Fashion Style) शेअर करत असते. साडी असो वा कोणतेही वेस्टर्न वेअर अर्थात आधुनिक कपडे श्रुती ते तितक्यात आत्मविश्वासाने घालताना दिसून येते. तिचा प्रत्येक लुक पाहावासा वाटतो. श्रुतीचे असेच अनेकविध लुक तुम्हाला करतील घायाळ. श्रुतीचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले तर अगदी विविध रंगाचे आणि विविध स्टाईलचे लुक करण्यात आले आहेत. तिच्या याच फॅशन स्टाईल स्टेटमेंटवर टाकूया एक नजर. 

बाहुलीसारखी श्रुती 

Instagram

अत्यंत लाईट अशा लव्हेंडर रंगाच्या या ड्रेसमध्ये श्रुती अक्षरशः एखाद्या बाहुलीइतकीच गोड दिसतेय. इंडस्ट्रीतील काही मित्रमैत्रिणींनीदेखील तिला या पोशाखात अत्यंत गोड दिसत अशल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी तिला ‘baby doll’ असेही म्हटले आहे. तिचा हा लुक खरंच अप्रतिम असून तुम्ही कोणत्याही पार्टीसाठी असा लुक नक्कीच करू शकता. ‘कुठेही जाल तिथे थोडेसे चमकणे हवेच’ अशी कॅप्शन श्रुतीने या फोटोलुकसाठी दिली आहे आणि ती नक्कीच योग्य आहे. अति भडक अथवा दिखावा न करता अत्यंत सौम्य मेकअप आणि सोबर लुकमध्ये श्रुतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

कॉर्पोरेट लुक 

Instagram

कोणत्याही लुकमध्ये श्रुती अगदी समरसून गेलेली दिसून येते. श्रुतीचा हा कॉर्पोरेट लुक सर्वांनाच भावला आहे. यामध्ये श्रुतीने केलेला मेकअप थोडा भडक असून नेहमीच्या लुकपेक्षा श्रुती वेगळी दिसत आहे. मात्र तरीही तिच्या चाहत्यांना हा लुक आवडला आहे. नेहमी साडीमध्ये आणि हसतानाचा फोटो शेअर करणारी श्रुती यामध्ये अगदीच वेगळी दिसून येते आहे. श्रुतीला हा पिवळा रंग अगदी खुलून दिसला आहे. कोणत्याही कॉर्पोरेट इव्हेंटकरिता हा लुक नक्कीच तुम्ही करू शकता. फक्त इतका मेकअप त्यासाठी करण्याची तुम्हाला गरज नाही. पण आऊटफिट म्हणून अर्थात स्टाईल म्हणून तुम्ही या लुकचा संदर्भ नक्कीच घेऊ शकता. 

अधिक वाचा – रीना जिंकत आहे ‘मन उडू उडू झालं’ मधून प्रेक्षकांचे मन

ADVERTISEMENT

मराठमोळा लुक

Instagram

कोणत्याही घरातील कार्यक्रमाला कसे सजावे हे या लुकमधून तुम्हाला कळू शकते. तुम्हालाही अत्यंत साधा आणि सोबर लुक हवा असेल तर तुम्ही श्रुतीचा हा साडीतील लुक कॅरी करू शकता. केसात माळलेला गजरा. अत्यंत माफक मेकअप आणि सुंदररित्या नेसण्यात आलेली साडी असा हा लुक कोणाच्याही काळजाचा ठाव घेऊ शकतो. आपल्याकडे कार्यक्रमांमध्ये असा लुक नेहमीच वाखाणण्यात येतो आणि साडी ही प्रत्येक मुलीला सुंदरच दिसते यामध्ये नक्कीच कोणाचे दुमत नसेल. 

परी म्हणून की अप्सरा 

Instagram

एखाद्या पार्टीसाठी पांढरा रंग ही जर थीम असेल तर श्रुतीचा हा लुक नक्कीच तुम्ही स्टाईल म्हणून वापरू शकता. यामध्ये परी म्हणून की अप्सरा अशीच बघणाऱ्याची अवस्था होत आहे. पांढऱ्या क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये श्रुती अत्यंत सुंदर दिसत असून कपड्यांना साजेसा मेकअप तिने यामध्ये केला आहे. तुम्हीही तुमच्या वाढदिवसाची पार्टी असो अथवा कोणत्याही पार्टीत जाण्यासाठी ही स्टाईल फॉलो करू शकता. 

अधिक वाचा – मृणाल ठाकूरला लागला जॅकपॉट, तूफाननंतर आता ‘थडाम’च्या हिंदी रिमेकमध्ये एन्ट्री

कॅज्युअल लुक 

Instagram

कुठेही पटकन बाहेर जायचं म्हटलं की, जीन्स आणि टीशर्ट हा आपला सर्वांचाच आवडता फॅशन सेन्स असतो. श्रुतीची ही स्टाईलही अप्रतिम आहे. अत्यंत साधी आणि तरीही आकर्षक. निळी जीन्स आणि पांढरा टी – शर्ट हा नेहमीच बाहेर जाताना उत्तम पर्याय आहे. फॅशन स्टेटमेंटसाठी तुम्हाला अधिक मेहनत करायची नक्कीच गरज नाही. तुम्हीही ही अगदी बेसिक फॅशन करून आपल्या मित्रमैत्रिणींसह कॉफी शॉपमध्ये संध्याकाळ मजेत घालवू शकता. इतकंच नाही तर अगदी फोटोही तितकेच चांगले कॅप्चर करू शकता. 

ADVERTISEMENT

तुम्हाला श्रुतीच्या या अदा कशा वाटल्या आणि आमचे आर्टिकल कसे वाटले हे नक्की आम्हाला कळवा. असेच आर्टिकल वाचण्यासाठी आमच्या marathi.popxo.com वर क्लिक करा. 

अधिक वाचा – या सेलिब्रिटी कपलच्या घटस्फोटाची चर्चा, पण…

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT