‘यमला पगला दीवाना’ आणि ‘लाइफ इन ए मेट्रो’ व ‘लाहोर’ सारख्या चित्रपटात अभिनय केलेल्या अभिनेत्री नफीसा अली सध्या कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचा सामना केला आहे. नफीसा अली यांचा जन्म 18 जानेवारी 1957 ला मुंबईत झाला. त्यांचं कुटुंब पश्चिम बंगालचं आहे. नफीसा यांना 1976 साली मिस इंडियाचा किताब मिळाला होता.
कॅन्सरशी लढा दिलेले टॉप 10 बॉलीवूड सेलिब्रिटीज
कॅन्सरशी लढणाऱ्या नफीसा यांनी आपले जुने फोटो शेअर केले आहेत. हे फोटोज 1976 सालचे आहेत. जेव्हा त्या मिस इंडिया झाल्या होत्या. हे फोटो शेअर करताना त्यांनी लिहीलं आहे की, ‘ वयाच्या 19 च्या जेव्हा मी मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर. हा फोटो माझे वडील अहमद अली यांनी काढला होता.’
स्वयंपाकघरातील अशा वस्तू ज्यामुळे असतो कॅन्सर होण्याचा धोका
नफीसा यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅन्सरमुळे नफीसाच्या लुकमध्ये खूप बदल झाला आहे. नफीसा ‘मिस इंटरनॅशनल-1977’ च्या रनर अपही होत्या. ‘जुनून’ चित्रपटापासून नफीसा यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली होती. आपल्या पूर्ण करियरमध्ये त्यांनी फक्त 9 चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटातून त्यांनी शशी कपूर, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि सलमान खान यासारख्या स्टार्ससोबत काम केलं आहे.
नफीसा यांचं लग्न अर्जुन पुरस्काराने सन्मानित पोलो खेळाडू कर्नल आरएस सोढी यांच्याशी झालं आहे. लग्नानंतर त्यांनी आपल्या फिल्मी करियरमधून ब्रेक घेतला होता. कॅन्सर झाल्यावर नफीसा सध्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहेत. तसेच त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचेही अनेक फोटोजही शेअर केले आहेत. नफीसा या कॅन्सरच्या थर्ड स्टेजवर आहेत आणि त्यांचे हे फोटोज खरंच प्रेरणादायी आहेत. तसंच कॅन्सरशी लढा दिल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.
स्तनपानाने टळतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका…हे खरं आहे का
कॅन्सरसारख्या दुर्धर रोगांशी सामना केलेल्या नफीसा अली यांनी म्हटलं आहे की, आयुष्यात अजून काही वाईट घडण्याआधी मला माझ्या तिसऱ्या नातू किंवा नातीला बघायचं आहे. नफीसा यांनी हेही सांगितलं आहे की, त्यांना कॅन्सरबाबत कसं कळलं ते. त्यांनी म्हटलं आहे की, माझ्या पोटात दुखत असल्यामुळे मी डॉक्टरकडे गेले होते. पाच दिवस औषध घेऊनही जेव्हा माझं दुखणं कमी नाही झालं. तेव्हा डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत मला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचं कळलं होतं.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रॉडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रॉडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूटही देत आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.