home / Diet
vitamin C

Vitamin C Foods In Marathi | क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ

धावपळीच्या आयुष्यात सर्वांचं सर्वात जास्त दुर्लक्ष होतं ते म्हणजे आपल्या आरोग्याकडे. हे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक आजारांनी माणूस घेरला जातो. त्यामुळे आपल्याला सर्वांनाच संतुलित आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्व समाविष्ट करून घेता. आहारामध्ये असेच एक सर्वात महत्त्वाचे पोषक तत्व आहे आणि ते म्हणजे क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ (Vitamin C In Marathi). क जीवनसत्वयुक्त पदार्थ अर्थात विटामिन सी. याची कमतरता शरीराला अत्यंत गंभीररित्या परिणामकारक ठरते. विटामि सी अर्थात क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे फायदे काय आहेत आणि नक्की कोणत्या पदार्थांमध्ये (Vitamin C Foods List In Marathi) हे समाविष्ट असते याची इत्यंभूत माहिती.

विटामिन सी पदार्थांची माहिती मराठीत | Vitamin C Foods In Marathi

विटामिन सी युक्त अर्थात क जीवनसत्त्व असणारे अनेक पदार्थ  (Vitamin C Foods List In Marathi) आहेत. याचा नक्की काय फायदा होतो आणि कोणत्या पदार्थांमधून शरीराला विटामिन सी (C Vitamin Foods In Marathi) मिळू शकते याची माहिती आम्ही तुम्हला या लेखातून देत आहोत. कोणत्या पदार्थांमधून अधिक विटामिन सी (Vitamin C Rich Foods In Marathi) शरीराला प्राप्त होते ते घ्या जाणून. 

लिंबू (Lemon)

lemon and sugar
Vitamin C Foods In Marathi

लिंबामध्ये विटामिन सी (Vitamin C In Marathi) चे अधिक प्रमाण असते हे सर्वांनाच माहीत आहे. लिंबू पाणी पिण्याचे शरीराला अधिक फायदे मिळतात. विटामिन सी ची शरीरातील कमतरता भरून काढण्यासाठी लिंबू पाणी प्यायले जाते. तसंच स्कर्वी (विटामिन सी च्या कमतरतेमुळे होणारी समस्या) सारख्या समस्येसाठीही लिंबू पाण्याचा फायदा करून घेता येतो. याशिवाय लिंबाचा उपयोग उच्च रक्तदाब आणि साधारण तापासाठीही करता येतो. ताप आल्यावर तोंडाची चव गेली असल्यास, लिंबाचा उपयोग करून घेता येतो. लिंबामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट, अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिव्हायरल हे अतिशय प्रभावी ठरते आणि शरीरात बॅक्टेरिया निर्माण होण्यापासून वाचवते. 

प्रमाण – लिंबामध्ये 100 ग्रॅम प्रमाण असेल तर त्यामध्ये 41.1 मिलीग्रॅम इतके विटामिन सी आढळते.

किवी (Kiwi)

किवी फळ खाण्याचे फायदे
Vitamin C In Marathi

विटामिन सी चा स्रोत किवी या फळामध्ये अधिक आढळतो. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात जे शरीरापासून आजार दूर राखण्यास मदत करतात. एनसीबीआयच्या संकेतस्थळावर असणाऱ्या एका शोधानुसार, यामध्ये विटामिन सी (Vitamin C In Marathi) अर्थात क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ (Vitamin C Foods In Marathi) अधिक प्रमाणात आढळतात. तसंच यामध्ये अँटिऑक्सिडंट (मुक्त कणांपासून दूर ठेवण्यासाठी उपयुक्त), अँटीइन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारे), अँटिहायपरटेन्सिव्ह (रक्तदाब नियंत्रिण करण्यासाठी) आणि अँटिथ्रोम्बोटिक (रक्ताच्या गाठी तयार होण्यापासून दूर ठेवणारे) यावर प्रभावी ठरते. 

प्रमाण – 100 ग्रॅम किवीमध्ये 93.2 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते.

वाचाड जीवनसत्व असणारे पदार्थ | Vitamin D Foods In Marathi

केल (Kale)

Vitamin C Rich Foods In Marathi

पालक या भाजीप्रमाणे दिसणारे केल बऱ्याच जणांना माहीत नाही. मात्र यामध्ये विटामिन सी चा चांगला स्रोत आहे. क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ असणाऱ्या केलमध्ये उच्चस्तरावर अँटिऑक्सिडंट्स असतात. तसंच हे हृदयरोगासंबंधित आजारावरही उपयुक्त ठरते. एका अभ्यासानुसार, पोस्टप्रांडियल (जेवणानंतर) केल सेवन केल्यास, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत मिळते. त्यामुळे याचा किमान तुमच्या आहारात समावेश करून घ्यावा. विटामिन सी तुम्हाला नियमित मिळू शकते. 

प्रमाण – 100 ग्रॅम केलमध्ये 93.4 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते.

लिची (Lychee)

Vitamin C Foods List In Marathi

विटामिन सी शरीराला मिळवून द्यायचे असेल आणि त्याचा स्वादही चांगला हवा असेल तर तुम्हाला लिची हे फळ नक्कीच उपयोगी ठरते. याचे सेवन क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांची कमतरता पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट, विटामिन आणि फायबर अधिक प्रमाणात आढळतात. तसंच यामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल, अँटिडायबेटिक आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्मही अस्तित्वात आहेत. शरीराचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी याचे नियमित सेवन करा. तुमच्या नियमित खाण्यामध्ये लिचीचा नक्की समावेश करून घ्या.  

प्रमाण – लिचीमध्ये साधारण 71,5 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते.

वाचा
ई  जीवनसत्व असणारे पदार्थ
ई जीवनसत्व असलेल्या पदार्थांचे फायदे

ब्रोकोली (Broccoli)

C Vitamin Foods In Marathi

ब्रोकोली ही भाजी सर्वांनाच माहीत आहे असं नाही.मात्र बऱ्याच ठिकाणी ब्रोकोली सूप अथवा काही सलाडमध्ये याचा उपयोग केला जातो. ब्रोकोलीमध्येदेखील विटामिन सी (Vitamin C In Marathi) चा चांगला स्रोत आहे. यामध्ये विटामिन सी सह विटामिन के, विटामिन ई, लोह आणि जिंक यासारखे शरीराला आवश्यक असणारे पोषक तत्वदेखील आहेत. याशिवाय यामध्ये अँटिऑक्सिडंट्सदेखील आढळतात. क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा (Vitamin C Foods In Marathi) चांगला स्रोत आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात तुम्ही ब्रोकोली नक्की समाविष्ट करून घ्या. काही जणांना याची चव आवडत नाही, तर काही जणांना ब्रोकोली दिसायला आवडत नाही. पण विटामिन सी शरीराला हवे असते त्यामुळे तुम्ही याचा नक्कीच जेवणात समावेश करून घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार इतर फळभाज्या मिक्स करून याचे सलाड बनवा आणि खा. 

प्रमाण – 100 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये 91.8 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते.

पिवळी भोपळी मिरची (Sweet Yellow Pepper)

C Vitamin Foods In Marathi

आपल्याकडे अनेकदा घरामध्ये हिरव्या भोपळ्या मिरचीची भाजी केली जाते. तर पिझ्झा करताना आपण घरात पिवळी अथवा लाल भोपळी मिरची आणतो. शरीरात विटामिन सी ची कमतरता असेल तर तुम्ही आहारात पिवळ्या भोपळी मिरचीचा वापर करावा. ही मिरची कोलेस्ट्रॉलमुक्त असण्यासह यामध्ये सोडियम आणि कॅलरीदेखील कमी आढळते. तसंच क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांसह यामध्ये विटामिन ए चे प्रमाणही आढळते. याचे सेवन केल्याने मधुमेह, संधिवात आणि हृदयरोगासारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत मिळते. 

प्रमाण –  100 ग्रॅम पिवळ्या भोपळी मिरचीमध्ये 183.5 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते.

पेरू (Guava)

Vitamin C Benefits In Marathi

पेरूचे अनेक फायदे आहेत. आपण केवळ एक फळ म्हणून नेहमी पेरू खातो. पण पेरूमध्ये क जीवनसत्त्वासह अनेक मिनरल्सदेखील आढळतात. याच्याशी संबंधित एका शोधानुसार, यकृताशी निगडित आजारांवर हे अँटिऑक्सिडंट स्वरूपात काम करते. यामध्ये आढळणारे विटामिन्स हे रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास मदत करते. याशिवाय हे त्वचेचा रोग स्कर्वी जो विटामिन सी च्या कमतरतेमुळे उद्भवतो त्यावर मात करण्यासाठी उपयोग ठरते. तसंच थायरॉईडसारखी समस्या असल्यासदेखील याचा फायदा करून घेता येतो. 

प्रमाण –  100 ग्रॅम पेरूमध्ये 228.3 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते

मिरची (Chilli Pepper)

Vitamin C Foods In Marathi

मोठी मिरची जी जास्त तिखट नसते त्याला चिली पेपर म्हटले जाते. विटामिन सी चा चांगला स्रोत म्हणून याकडे पाहिले जाते. याशिवाय या मिरचीमध्ये विटामिन बी, विटामिन ए, लोह आणि कॅल्शियमसारखे पोषक तत्वही आढळतात. तसंच क जीवनसत्वासह यामध्ये संधिवात आणि शरीराला सूज आल्यास, कमी करण्यासाठी उपयुक्त गुणधर्मही आहेत. तसंच याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास, तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासही याचा फायदा मिळतो. मधुमेह आणि लठ्ठपणाची समस्या असणाऱ्या व्यक्तींना याचा नक्कीच फायदा करून घेता येतो. यातून क जीवनसत्त्व योग्य प्रमाणात तुम्हाला मिळू शकताे. 

प्रमाण –  100 ग्रॅम चिली पेपरमध्ये 40 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते

ब्लॅक करंट (Black Currant)

Vitamin C Rich Foods In Marathi

ब्लॅककरंटदेखील क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा (Vitamin C Foods In Marathi) चांगला स्रोत आहे. विटामिन सी चा स्रोत असल्यासह यामधअये खास औषधीय गुण अस्तित्वात आहेत. जसे अँटीव्हायरल, अँटिऑक्सिडंट (फ्री रॅडिकल्सपासून दूर ठेवणारे) आणि अँटिबॅक्टेरियल (बॅक्टेरिया नष्ट करणारे) गुणधर्म यामध्ये आढळतात. याचा उपयोग डोळ्यांसंबंधी आजार नष्ट करण्यासाठीही होतो.  त्यामुळे शरीरामध्ये विटामिन सी ची कमतरता जाणवत असेल तर तुम्ही ब्लॅककरंट खावे. 

प्रमाण –  100 ग्रॅम ब्लॅककरंटमध्ये 12.6 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते

ओवा (Thyme)

पोटात दुखायला लागल्यावर आपण पटकन ओव्याचा उपयोग करतो. पण क जीवनसत्त्व यामध्येही आढळते हे तुम्हाला माहीत आहे का?  ओव्यामध्ये विटामिन सी सह विटामिन ए आणि विटामिन बी6 चे भरपूर प्रमाण आढळते. तसंच यामध्ये कॅल्शियम, लोह, फायबर आणि मॅग्नेशियमसारखे पोषक तत्वही आढळते. यातील विटामिन ए प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते तर विटामिन बी6 हे लाल पेशी वाढविण्यास मदत करते. शरीरामध्ये क जीवनसत्त्वाची कमी जाणवत असेल तर तुम्ही नुसता थोडासा ओवा चाऊन खाल्लात तरी तुम्हाला बरं वाटेल. 

प्रमाण –  100 ग्रॅम ओव्यामध्ये 160.1 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते

संत्रे (Orange)

Benefits Of Orange In Marathi

Vitamin C Benefits In Marathi

लिंबाप्रमाणेच संत्र्यामध्ये क जीवनसत्त्व अधिक असते हे सर्वांनाच माहीत आहे. बरेचदा संत्र्याचा रस प्यायला जातो. मात्र त्यापेक्षा संपूर्ण संत्रे खाणे शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते. संत्र्याचे अनेक फायदे आहेत. विटामिन सी चा चांगला स्रोत म्हणून संत्र्याकडे पाहिले जाते. यामध्ये असणारे विटामिन ए हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करते. तसंच विटामिन सी सह यामध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय मॅग्नेशियम मांसपेशींना आणि हृदयाला मजबूत करण्यास मदत करते. संत्र्यांचे फायदे अनेक आहेत.

प्रमाण –  100 ग्रॅम संत्र्यामध्ये 53.2 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते

पपई (Papaya)

विटामिन सी अर्थात क जीवनसत्त्वयुक्त पदार्थाचा चांगला स्रोत म्हणून पपई नियमित खावी. यामध्ये विटामिन ए, सी, ई आणि बी कॉम्प्लेक्ससह फोलेट, मॅग्नेशियम, पोट्रशियम आणि फायबर इतके अनेक पोषक तत्व आढळतात. तसंच यामध्ये अँटिमायक्रोबियल (बॅक्टेरिया नष्ट करणारे घटक), अँटिपॅरासिटीक (परजीवाणू नष्ट करणारे घटक), अँटिट्यूमर (ट्यूमरचा विकासाला रोखणारा घटक), अँटिइन्फ्लेमेटरी (सूज कमी करणारा घटक) आणि अँटिऑक्सिडंट (कणांपासून वाचवणारा घटक) हे सर्वच घटक अस्तित्वात आहेत. विटामिन सी ची कमतरता भासत असेल तर आठवड्यातून किमान एकदा तरी पपई खावी. 

प्रमाण –  100 ग्रॅम संत्र्यामध्ये 60.9 मिलीग्रॅम इतके विटामिन सी चे प्रमाण आढळते

क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे फायदे (विटामिन सी चे फायदे Vitamin C Benefits In Marathi)

विटामिन सी अर्थात क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे अनेक फायदे मिळतात. शरीराला नक्की कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊया. 

त्वचेची सुरक्षा – क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांची संरचना होते आणि त्यामुळे त्वचेची सुरक्षा होते. त्वचेला प्रोटीन पोहचणे सहज शक्य होते. तसंच त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठीही याचा उपयोग होतो. यामुळे त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यास मदत मिळते आणि त्वचेवर लवकर सुरकुत्या येत नाहीत. विटामिन सी मुळे चेहरा अथवा डोळ्यांवर येणाऱ्या सुरकुत्यादेखील कमी होतात. तसंच त्वचेमधील हायड्रेशन योग्य राखण्यास विटामिन सी मुळे मदत मिळते. यातील एप्रिकॉट ऑईल हे त्वचेला अधिक चांगले पोषक तत्व देते. 

जखम लवकर भरते – विटामिन सी मध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्समुळे शरीरावर होणारे घाव, जखम भरण्यास मदत मिळते. तसंच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यासही याचा फायदा मिळतो. 

सूर्यकिरणांपासून करते रक्षा – सध्याचे दूषित वातावरण आणि प्रदूषणामुळे त्वचेला खूपच नुकसान पोहचते. तसंच सूर्याच्या किरणांचाही त्वचेवर खूपच वाईट परिणाम होताना दिसून येतो. मात्र क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांच्या सेवनामुळे ही हानी कमी होण्यास मदत मिळते. त्यामुळे नेहमीच विटामिन सी युक्त सनस्क्रिनचा वापर करण्यात येतो. 

हाडे मजूबत राहतात – विटामिन सी हाडे निरोगी राखण्यास मदत करतात. तसंच याचे योग्य प्रमाणात सेवन हे हाडांशी निगडीत आजार बरे करण्यास फायदेशीर ठरते. हाडांची कोणतीही समस्या असल्यास, विटामिन सी चे सेवन करावे. 

तरूण दिसण्यास करते मदत – वाढत्या वयाच्या निशाणी चेहऱ्यावर लगेच दिसून येतात. शरीरातील ग्लायकोसअमिनोग्लायकन्स जेव्हा कमी होतात तेव्हा त्वचा कोरडी पडू लागते. विटामिन सी यापासून दूर राखण्यास मदत करते. तसंच येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यासही मदत मिळते. 

क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्या (Problems You Faced With Less Vitamin C)

विटामिन सी मुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. याची माहिती आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्हीही याची माहिती करून घ्या. 

स्कर्वीः शरीरामध्ये विटामिन सी ची कमतरता होणे यालाच स्कर्वी असे म्हटले जाते. हा आजार झाल्याने शरीरातील सर्वच कामे बाधित होतात. यामध्ये व्यक्तीला अनिमिया (रक्ताची कमतरता), कमजोरी, हिरड्यांशी संबंधित आजार आणि त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

त्वचेसंबंधित समस्याः शरीरात क जीवनसत्त्वाची कमतरता त्वचेच्या रोगाला आमंत्रण देऊ शकते. एटॉपिक डर्मेटायटिस (खाजेसह त्वचा लाल होणे, त्वचेवर चकते येणे आणि जळजळ) आणि पोरफायरिया कटानिया टार्डा (एका प्रकारचा रक्ताचा आजार जो त्वचेला त्रासदायक ठरतो) यासारख्या समस्या होतात. यातून सुटका मिळविण्यासाठी विटामिन सी चा स्रोत शरीरात जाणे आवश्यक आहे. 

प्रतिकारशक्ती कमी होणेः विटामिन सी ची कमतरता शरीरातील आजारासह प्रतिकारकशक्तीही कमी करते. यामुळे कोणताही आजार तुम्हाला पटकन होऊ शकतो. त्यामुळे आहारात विटामिन  सी युक्त पदार्थ असणे अत्यंत आवश्यक आहे. 

गर्भावस्थेदरम्यान समस्याः गर्भावस्थेदरम्यान क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन गरजेचे आहे. अन्यथा बाळाच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. विटामिन सी ची कमतरता गर्भपाताचा धोका दर्शविते. त्यामुळे गरोदरपणात योग्य प्रमाणात क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करावे. 

अलर्जीः क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन न केल्यास, कोणत्याही पदार्थांची अथवा गोष्टींची अलर्जी तुम्हाला पटकन होऊ शकते. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष द्या. 

केसांसंबंधित समस्याः केसांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. वास्तविक क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ हे शरीरात लोह वाढविते. त्यामुळे केसांच्या समस्या सोडविण्यासाची याची आवश्यकता भासते. 

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा सर्वात चांगला स्रोत कोणता आहे?

रसदार फळे अर्थात संत्रे, आवळा, लिंबू, किवी यांना क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा सर्वात चांगला स्रोत मानण्यात येते. त्यामुळे नियमित आहारात याचा समावेश करावा. 

2. क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन न केल्यामुळे स्कर्वी हा आजार जास्त प्रमाणात होतो. तसंच इतर आजारही होतात ज्याची माहिती आम्ही तुम्हाला वर लेखात दिली आहे. 

3. स्ट्रॉबेरी हे फळ क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांमध्ये येते का?

स्ट्रॉबेरी हे फळ क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा चांगाल स्रोत मानले जाते. तसंच याचे सेवन केल्याने प्रतिकारशक्तीदेखील वाढते. 

11 Oct 2021

Read More

read more articles like this
good points logo

good points text