ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
या छोट्या छोट्या सवयींतून मिळेल आर्थिक सक्षमतेचा मार्ग

या छोट्या छोट्या सवयींतून मिळेल आर्थिक सक्षमतेचा मार्ग

आपण आज एकविसाव्या शतकात आहोत. तरी अजूनही बऱ्याच महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नाहीत. बऱ्याच महिलांना आर्थिकदृष्ट्या नवऱ्यावर किंवा घरातल्या इतरांवर अवलंबून राहावे लागते. काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की महिला पैसे कमावतात पण पगार मात्र नवऱ्याच्या हातात  देतात आणि मग त्यांना स्वतःच्या छोट्या मोठ्या सगळ्या गरजांसाठी नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात. काही आदर्श घरांत स्वतःच्या आई किंवा पत्नीला पैसे मागावे लागू  नयेत ह्याची काळजी घेतली जाते तर काही घरांमध्ये नवरे आजही बायकांच्या आर्थिक नाड्या स्वतःच्या हातात ठेवतात. अश्या वेळेला स्त्रियांना कुणाकडे पैसे मागण्यास संकोच वाटतो. पण स्त्रियांनी जर त्यांच्या खर्च करण्याच्या सवयींमध्ये काही लहान बदल केले, काही छोट्या छोट्या सवयी लावून घेतल्या तर त्यांची बरीच बचत होईल आणि त्यांना त्यांच्या खाजगी गोष्टींसाठी कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत. 

आपल्याकडे  स्वतःची खाजगी बचत असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला पैसे कसे वाचवायचे आणि कुठे गुंतवायचे हे माहित असले पाहिजे जेणेकरून तशी काही वेळ आलीच तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू. या सवयी आपण लावून घेतल्या तर आपली आर्थिक बाजू चांगली राहील. 

अधिक वाचा – घर बसल्या ऑनलाईन पैसे कमवण्याचे सोपे मार्ग

खर्चाचे बजेट बनवणे आणि त्यानुसारच खर्च करणे

बचत करून आपला बँक बॅलन्स वाढवण्याची पहिली पायरी म्हणजे आठवड्याचे किंवा महिन्याचे एक बजेट तयार करणे व त्याप्रमाणेच खर्च करणे. सुज्ञ लोक आपले उत्पन्न बघून त्याप्रमाणे बजेट ठरवतात आणि बजेटच्या बाहेर जाऊन कधीही खर्च करत नाहीत. अर्थात बजेट तयार करताना ते प्रॅक्टिकल असावे. त्यात आवश्यक तो सगळा खर्च गृहीत धरलेला असावा. बजेट सांभाळण्याची एक सोपी युक्ती म्हणजे आपले सगळे खर्च एका नोंदवहीमध्ये लिहून ठेवणे. हल्ली तर बरेच लोक डिजिटल डायरी वापरतात. आपले बरेचसे व्यवहार ऑनलाईन होतात. त्यामुळे खर्चाची नोंद करणे खूप सोपे झाले आहे. आजकाल तर असेही ऍप्लिकेशन्स आले आहेत जे आपल्या उत्पन्नानुसार आणि बचतीनुसार आपल्याला बजेट तयार करून देऊ शकतात. ह्या ऍप्सची मदत घेऊन आपण खर्चाची नोंद ठेवू शकतो आणि आपले बजेट सांभाळू शकतो. तसेच आधी बचत मग खर्च हा नियम पाळणेही सगळ्यात महत्वाचे आहे.

ADVERTISEMENT

अनावश्यक खर्चाला आवर घालणे  

व्यवहारचतुर व्यक्तींना कुठल्या गोष्टींना केव्हा प्राधान्य द्यायचे आणि अनावश्यक खर्च कसे टाळाचये हे चांगले जमते.  गरज नसताना उगाच आवडले नि घेतले अशी खरेदी, डिस्काउंट आणि ऑफर्सच्या मोहात पडून केलेली खरेदी ह्यापासून स्वतःला शक्य तितके  लांब ठेवा.  एखादी वस्तू  सवलतीच्या दरात असली तरीही आपले पैसे खर्च होतातच. अर्थतज्ज्ञ सांगतात की आपली आर्थिक स्थिती आपल्या खर्चाच्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. व्यवहारात तरबेज असणारी माणसे जीवनाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता जिथे जमेल तिथे बचत करतात. 

अधिक वाचा – सिंगल मदरने आर्थिक नियोजन कसे करावे, सोपे व्यवस्थापन

डिस्काऊंट्स, ऑफर्स, व्हाउचर्सचा वापर करणे

पैसे वाचवणे म्हणजे  गुणवत्तेशी तडजोड करणे नव्हे. आपल्याला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी डिस्काऊंट्स व ऑफर्सचा योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापर केला तर आपले बरेच पैसे वाचतात.आपल्याला हव्या असलेल्या उत्तम क्वालिटीच्या वस्तू सेलच्या काळात खरेदी करणे ही एक उत्तम युक्ती आहे. तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यापूर्वी कूपन कोड आणि व्हाउचरचा वापर केल्याने देखील आपल्याला चांगल्यापैकी डिस्काउंट मिळू शकतो. स्वतःच्या आवडत्या ब्रँडवर आणि सेलवर लक्ष ठेवून ऑफर्स सुरु असताना खरेदी करून पैसे वाचवता येतात.  

या छोट्या सवयी आपण लावून घेतल्या तर आपली आर्थिक बाजू भक्कम होण्यास हातभार लागेल.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

02 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT