Advertisement

आरोग्य

आई होण्याचा विचार करताय? पण स्थुलपणामुळे येतायत अडचणी

Leenal GawadeLeenal Gawade  |  Oct 13, 2021
स्थुलपणामुळे येतायत अडचणी

Advertisement

आई होणं प्रत्येक बाईचं स्वप्न असतं. काही जणांना अगदी सहजपणे आई होणे शक्य असते पण काहींना मात्र बरेच प्रयत्न करावे लागतात. हल्लीचे लाईफस्टाईल पाहता खूप जणांना प्रयत्न करुनही गर्भारपण येत नाही. धकाधकीचे जीवन, बसून असलेले काम, टेन्शन त्यातच वाढलेले वजन या सगळ्यासाठी कारणीभूत ठरते. तुम्हीही आई होण्याचा विचार करत असाल आणि स्थुलपणाही तुची अडचण असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आई बनू इच्छिणाऱ्यांना सगळ्या मुलींनी या गोष्टीची काळजी घेतली तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल.

गरोदरपणात भेडसावणाऱ्या चिंता आणि भीती (Anxiety) वर कशी कराल मात

 डाएटवर हवे नियंत्रण

Instagram

सध्या डाएट हा अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य असा भाग झाला आहे. डाएट म्हणजे उपाशी राहणे असे मुळीच नाही. आहार चांगला आणि सकस हवा. आहार सकस असेल तर तुमचे आरोग्य चांगले राहते. हल्ली बाहेरचे खाणे जास्त वाढले आहे. त्यामुळे शरीरात फॅट वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. बरेचदा ज्यांच्या शरीरात फॅट अधिक असते अशावेळी कन्सिव्ह करणे हे कठीण जाते. त्यामुळे अशावेळी वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. ही वेळ  तुमच्यावर येऊ द्यायचे नसेल तर डाएटवर नियंत्रण ठेवा. आहारात चांगले पदार्थ समाविष्ट करा. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तुम्हाला जर कन्सिव्ह करण्यास अडथळे येत असतील तर त्यासाठी स्थुलपणा हा कारणीभूत ठरु शकतो.

शरीराला हवी हालचाल

हल्ली खूप जणांच्या कामाचे स्वरुप हे बसून असते. जर तुम्हीही फार बसून असाल तर तुमच्या पोटापासून फॅट हे वाढत राहते. जे प्रेग्नंसीसाठी चांगले नाही असे म्हटले जाते. तुम्ही स्थुल असणे  आणि तुमचे फॅट बसून बसून फॅट वाढण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे तुम्ही शारीरिक हालचाल ही करायलाच हवी. तुम्हाला व्यायाम शक्य नसेल तर तुम्ही काही काळासाठी धावा किंवा चाला. जर तुम्ही दररोज चालाल किंवा धावाल तर तुमची शारीरिक हालचाल राहिली तर फॅट वाढत नाही. शारीरिक हालचाल असेल तर तुम्ही आळशी होत नाही. काहीतरी करण्याची इच्छा होत राहते. जर मन कशात तरी गुंतलेले असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. 

फर्टिलिटी टेस्ट (Fertility Test) म्हणजे काय माहीत आहे का, प्रत्येक महिलेने हे वाचावेच

मानसिक वजन वाढी नको

Instagram

खूप जणांची वजन वाढी ही मानसिक कारणामुळे झालेली असते. आई न होण्याचा तणावही खूप जणांवर असतो. लग्नाला बरीच वर्ष झाली असतील तर अनेकांंना आई होण्याच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते. तुम्ही जर हा ताण घेतला असेल आणि त्यामुळे तुमची झोप आणि आहार यामध्ये परिणाम होऊ लागला असेल तरी देखील तुमचे वजन वाढू शकते. खूप जणांना या टेन्शनमध्ये अधिक खाण्याची इच्छा होते. त्यामुळे अर्थात डाएट बदलतो. शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे कधी वनज वाढते हे कळत नाही. त्यामुळे मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी बोला. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचा ताण घेण्यापेक्षा ते कसं मिळवता येईल आणि आनंदी राहता येईल याकडे अधिक लक्ष द्या. 

आता स्थुलपणा तुमच्या आई होण्याच्या आड येत असेल तर तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घ्या.