Advertisement

आरोग्य

गरोदरपणात भेडसावणाऱ्या चिंता आणि भीती (Anxiety) वर कशी कराल मात

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 22, 2021
how-to-overcome-anxiety-during-pregnancy

Advertisement

कोविड-19 महामारीने प्रत्येकाच्या जीवनात भीती आणली आहे, तिथे गरोदरपणा अर्थात प्रेगंन्सी हा शब्द आनंद आणि उत्साह आणतो तिथे या परिस्थितीत मात्र प्रेग्नेंट होणे काय/कसे आहे? यावर अनेकांना चिंता आणि भीती मनात निर्माण झाली आहे. एका लहान बाळाचे लवकरच पालक होण्याचा आनंद आणि उत्साह जितकी प्रेग्नेंसी आणते, तितकाच आपण प्रेग्नेंसीदरम्यान भावनांचा चढ-उतार अनुभवू शकता. काही स्त्रियांना होणाऱ्या बाळाने मारलेल्या प्रत्येक लाथेचाही आनंद वाटतो, तर काहींना तीव्र थकवा, मूडमध्ये बदल आणि एन्क्झायटी अर्थात चिंता आणि भीती जाणवते. याबाबतीत आम्ही तनुश्री बैकर-तळेकर, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, मसीना हॉस्पिटल यांच्याकडून अधिक जाणून घेतले. 

चिंता आणि भीती (Anxiety) हे आहे सर्वसामान्य

stress

गरोदरपणादरम्यान अशी स्थिती असणे हे अत्यंत सर्वसामान्य आहे. मुलाच्या वाढीविषयी चिंता, प्रसूतीचा अनुभव किंवा कुटुंबातील अतिरिक्त सदस्याचा आर्थिक भार; या सर्व चिंता पूर्णपणे सामान्य आहेत. परंतु कोविड-19 महामारीच्या दरम्यान प्रेग्नेंट महिला म्हणून चिंताग्रस्त होणे भीतीदायक आहे कारण कोविड-19 महामारीमुळे जागतिक लोकसंख्येवर तीव्र परिणाम झाला आहे. गरोदर स्त्रियांना आई आणि मुलाला काही कोमॉरबिडिटीज होण्याच्या जोखमीच्या मोठ्या प्रमाणावर सामोरे जावे लागले. म्हणूनच गर्भवती लोकसंख्येवर त्याचा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम झाला आहे.

म्हणूनच, या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, गर्भवती महिलांनी नियमित शारीरिक हालचालींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले पाहिजे व पुरेशी झोप घेतली पाहिजे. यासाठी त्यांच्यामध्ये जागरूकता आणि त्यांच्या काळजीबद्दल अधिक अनुभव शेअर करायला हवा. अत्याधिक एन्क्झायटीमुळे भविष्यातील मातांमध्ये प्रीनेटल डिप्रेशनदेखील येऊ शकते. कोविड-19 महामारीमुळे, सोशिअल डिस्टेंसिंग, सेल्फ-आयसोलेशन आणि क्वारंटाईनने भविष्यातील मातांमध्ये चिंता वाढवली आहे. 

अधिक वाचा – कोरोना काळात वाटतेय अस्वस्थ, या टिप्स करतील मन शांत

यामुळे तयार होतेय प्रिनेटल डिप्रेशन 

भविष्यातील मातांसाठी सामाजिकीकरण, सजीवपणा, दैनंदिन कामकाजाची गरज अपूर्ण राहिली. क्वारंटाईन कालावधी, प्रवास निर्बंध ने भविष्यातील मातांच्या क्रियाकलाप जसे की नियमित चालणे, मित्र-मैत्रिणींशी भेटणे, इत्यादी मर्यादित केले आहे. अशा प्रकारे, या सर्व गोष्टींमुळे भविष्यातील बहुसंख्य संवेदनशील मातांमध्ये उच्च पातळीची एन्झायटी तसेच प्रीनेटल डिप्रेशन निर्माण झाली.

यामध्ये, त्यांचे पार्टनर भविष्यातील मातांच्या मानसिक आरोग्याला आधार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात. जेव्हा दोन्ही पार्टनर एकमेकांना पाठिंबा देतात, तेव्हा ते या गोष्टीची तीव्रता किंवा प्रीनेटल डिप्रेशन कमी करत त्यांचे बंधन मजबूत करतात. ते भविष्यातील मातांना (पार्टनर्स) प्रोत्साहन देऊन आणि आश्वासन देऊन भावनिक आधार देऊ शकतात. जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करा, उदा. निरोगी जेवणाचे सेवन करणे जे तिला चांगले खाण्यास मदत करू शकते. एकत्र वॉक करा जे तुम्हा दोघांना बोलण्यासाठी आणि व्यायामासाठी वेळ देते. तुम्हा दोघांना कसे वाटत आहे याबद्दल पार्टनर त्यांच्याशी बरेच काही बोलू शकतो. ते त्यांच्या पार्टनरसह डॉक्टरांच्या भेटीसाठी देखील जाऊ शकतात.

डिप्रेशन (प्रीनेटल) म्हणजे दुःख किंवा एकाच वेळी आठवडे किंवा महिनेभर निराशा वाटणे किंवा चिडचिडे होणे आहे. प्रीनेटल डिप्रेशन म्हणजे जेव्हा एखादी स्त्री कामावर किंवा घरी अत्याधिक तणावाचा सामना करण्यास आनंदी नसते, मुलाच्या भविष्याबद्दल तसेच मुलाच्या आरोग्याबद्दल अति विचार करते.

अधिक वाचा – योग्य वयातील गर्भधारणेमुळे गुंतागुत होण्याची शक्यता कमी, तज्ज्ञांचे मत

याचा नक्की अर्थ काय?

Anxiety म्हणजे ज्या गोष्टी घडू शकतात त्याबद्दल चिंता किंवा भीती वाटणे. आपण एक चांगली आई होणार नाही किंवा आपण बाळाला वाढवू शकत नाही याबद्दल आपल्याला काळजी वाटू शकते. कोविड-19 महामारीच्या काळात, तुम्हाला आजाराशी ग्रस्त होण्याची  चिंता होऊ शकते ज्यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये तसेच होणाऱ्या मुलामध्ये अधिक गुंतागुंत होऊ शकते. महामारीमुळे गर्भवती महिलांमध्ये भावनिक आणि वर्तणुकीच्या समस्यांचा दीर्घकालीन धोका निर्माण झाला आहे. भावनिक समस्या जसे की रडणे, अलिप्त राहणे, अति विचार करणे, चिंता करणे यासारख्या समस्या दिसून येतात. दुसरीकडे, चिडचिडे होणे, आक्रमक होणे, हायपर होणे हे गर्भवती महिलांमध्ये दिसणाऱ्या काही वर्तणूक समस्या आहेत.

 म्हणूनच, न्यूजफीडचा वेळ कमी करणे महत्वाचे आहे कारण यामुळे महिला चिंताग्रस्त किंवा व्यथित होऊ शकतात. सामाजिक संपर्क महत्वाचा आहे, म्हणून त्यांच्याशी दूरध्वनी आणि ऑनलाइन चॅनेलद्वारे संपर्कात राहणे महत्वाचे आहे. भीती, चिंता आणि कंटाळवाणे हाताळण्याचा एक मार्ग म्हणून अल्कोहोल आणि ड्रग्सचा वापर टाळा. ज्या गर्भवती महिलांना जीवनाचा ताण, कमकुवत सामाजिक आधार आणि घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो, अशा महिलांमध्ये मानसिक आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका अधिक असतो. गर्भवती स्त्रिया, ज्यांना अन्यथा मदतीची कमतरता आहे किंवा जे संसर्गाच्या भीतीमुळे मदत मागणे टाळतात, त्यांच्यासाठी सामाजिक संपर्क व आधार विकसित करणे आणि वाढवणे महत्वाचे आहे. 

अधिक वाचा – तुम्हालाही गर्भधारणेत अडचणी येत आहेत, मग या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्या

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक