ADVERTISEMENT
home / Brothers
नेमकं काय घडतं जेव्हा भावंडांच्या वयात खूप अंतर असतं

नेमकं काय घडतं जेव्हा भावंडांच्या वयात खूप अंतर असतं

बहीण आणि भाऊ, बहीण आणि बहीण अथवा भाऊ आणि भाऊ हे नातं जगातील सर्वात प्रेमाचं नातं असतं. ज्यांना एकापेक्षा अधिक भावंडे असतात त्यांच्यामध्ये प्रेमळपणा, समजंसपणा, एकमेकांसोबत शेअर करण्याची वृत्ती आपोआप जन्माला येते. सध्याच्या जमान्यात एकापेक्षा जास्त मुल होणं हे आर्थिक दृष्ट्या नक्कीच हिताचं नाही. मात्र आधीच्या पिढीच्या प्रत्येकानेच जास्त भावंडे असण्याचे फायदे अनुभवले असतील. काहींची भावंडे त्यांच्यापेक्षा वयानेही खूप मोठी असतील. अशा भावंडांमध्ये खरंतर एक मोठी जनरेशन गॅपच निर्माण होते. मात्र अशी वयाने मोठी भावंडे असल्यावर लहान भावंडाचे लहान मुलांप्रमाणे लाड होतात. मोठी भावंडे असण्याचे काय काय फायदे असतात हे तुम्हा माहीत आहे का?

मोठी भावंडे असण्याचे फायदे –

 • तुमच्या मोठ्या भावंडांना तुमच्या लहानपणीच्या सर्व छोट्या छोट्या गोष्टी माहीत असतात. त्यामुळे तुम्ही मोठं झाल्यावरही त्यांच्या माध्यामातून तु्म्ही तुमचं बालपण नेहमी अनुभवत राहता. 
 • तुम्ही लहानपणी केलेल्या अनेक खोड्या, दंगामस्ती त्यांच्या चांगला लक्षात असतो. त्यामुळे ते अधुनमधुन तुम्हाला प्रेमाने ब्लॅकमेल करतात आणि संकट काळात पाठीशी उभेही राहतात.
 • काही वेळा भावंडांमधील जनरेशन गॅप फारच मोठी असते त्यामुळे तुमचे छंद,आवडीनिवडी एकमेकांपासून खूप वेगळ्या असतात.
 • कधी कधी तुमची मोठी भावंडे तुमच्या आईवडीलांपेक्षाही तुम्हाला जास्त धाकात आणि शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. ज्यामुळे तुम्हाला मोठ्या भाऊबहिणीपेक्षा आईबाबा परवडले असं वाटू लागतं.
 • तुमच्या मोठ्या भावंडांनी दिलेला प्रत्येक सल्ला हा त्यांना आलेल्या अनुभवातून दिलेला असतो. त्यामुळे त्यांचं ऐकलं तर तुमचं कधीच नुकसान होत नाही.
 • जर तुम्ही लहान भावंडं असाल तर तुमच्या मोठ्या भावंडांना आलेल्या अनुभवामुळे तुम्ही इतरांपेक्षा नेहमी स्मार्ट राहता. कारण तुम्हाला इतरांपेक्षा जास्त गोष्टी माहीत असतात.
 • लहान भावंडांमुळे मोठ्या भावंडाना नवीन ट्रेंड आणि फॅशनविषयी सतत अपडेट मिळतात. त्यामुळे त्यांचा तुमच्यामुळे नेहमीच जास्त फायदा होतो.
 • जर तुमची बहीण तुमच्यापेक्षा वयाने खूप मोठी असेल तर तुमचे फ्रेंड्स तिला तुमच्या आई नाहीतर मावशी समजतात.
 • तुमच्या करिअर आणि शिक्षणावर नेहमीच मोठ्या भावंडाचा पगडा असतो. त्यामुळे तुम्ही त्यानुसार करिअर निवडता.
 • मोठ्या भावंडांचे कपडे आणि वस्तूंवर सर्वात जास्त तुम्ही हक्क दाखवता. मग ती ताईने नवीन घेतलेली साडी असो किंवा दादाचं लेदर जॅकेट
 • मोठ्या भावंडांना नेहमी तुमच्यापेक्षा समजूतदारपणे वागावं लागतं. त्यामुळे वाढत्या वयात जीवनात जास्त तडजोड त्यांनी तुमच्यासाठी केलेली असते.
 • तुमचे मित्र मंडळी नेहमीच वेगवेगळ्या जनरेशनचे असतात. मात्र तुम्हाला तुमच्या मोठ्या भावंडांच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्त रस असतो.
 • तुमच्या आयुष्यातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये आईवडीलांना समजवण्यासाठी तुमची मोठी भावंडे नेहमीच तुमची साथ देतात.
 • तुमच्या मनातील भावना तुम्ही न सांगताही तुमच्या मोठ्या भावंडांना आपोआप समजतात. 

तुम्हाला देखील वयाने खूप मोठी भावंडे असतील तर तुमचे अनुभव कंमेट बॉक्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा.

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

जोडीदारासोबत नातं मजबूत असल्याचे संकेत (Sign Of A Healthy Relationship)

खऱ्या मित्रांची ओळख पटते या गुणांवरुन.. जाणून घ्या कसे

सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स (Tips For Happy Married Life)

29 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT