ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
ट्रिपल क्लिंझिंग म्हणजे काय, त्वचेसाठी आहे का फायदेशीर

ट्रिपल क्लिंझिंग म्हणजे काय, त्वचेसाठी आहे का फायदेशीर

त्वचा निरोगी आणि चमकदार दिसण्यासाठी ती नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण त्यामुळे त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअपचे कण, डेड स्किन निघून जाते. त्वचा खोलवर स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला पुरेसं ऑक्सिजन मिळतं आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी बाजारात अनेक क्लिंझर्स मिळतात. रात्री झोपण्यापूर्वी नियमित त्वचेला क्लिंझर्स लावण्यामुळे चांगला फायदा होऊ शकतो. सध्या ट्रिपल क्लिंझिंग हा प्रकार महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे. जर तुम्हाला या टेकनिकचा वापर करायचा असेल तर त्यासाठी जाणून घ्या ट्रिपल क्लिंझिंग म्हणजे काय आणि कशी वापरावी ही क्लिंझिंग पद्धत

ट्रिपल क्लिंझिंग म्हणजे काय

त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी ट्रिपल क्लिंझिंगचा वापर केला जातो. त्वचेवर तेलाचा थर हा चेहऱ्यावरच्या टी झोनवर जास्त प्रमाणात  असतो. मात्र या पद्धतीमुळे तुमच्या चेहऱ्यावरचा तेलकट टी झोन ऑईल फ्री होतो. ट्रिपल क्लिंझिंगसाठी दोन प्रकारचे फेशिअल क्लिंझर्स वापरले जातात. ज्यामध्ये सर्वात आधी ऑईल बेस्ड क्लिंझर्स वापरलं जातं ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ केली जाते आणि त्यानंतर वॉटर बेस्ड क्लिंझर्सचा वापर केला जातो ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट होते. त्यानंतर त्वचेला मॉईस्चराईझर आणि टोनरने मॉईस्चराईझ केलं जातं. या टेकनिक मध्ये चेहऱ्यावरच्या टी झोन स्वच्छ करण्यावर फोकस केला जातो. सध्या पार्लर अथवा सलॉनमध्ये ट्रिपल क्लिंझिंग या ब्युटी ट्रिटमेंटला जास्त मागणी आहे. मात्र तुम्ही थोड्याशी माहिती मिळवून योग्य पद्धतीने ही ट्रिटमेंट घरीच करू शकता. 

shutterstock

ADVERTISEMENT

स्क्रबने करा टी झोनर ऑईल फ्री

ज्या लोकांच्या चेहऱ्यावरचा टी झोन तेलकट असतो. त्यांना त्वचा तेलकट असणे, त्वचेवर ब्लॅकहेडस्, व्हाईटहेड्स मोठ्या प्रमाणावर होणे असा त्रास जाणवतो. यासाठीच आठवड्यातून एकदा हा टी झोन स्क्रबने स्वच्छ करावा. स्क्रबरचा वापर केल्यामुळे त्वचेवरील तेल, घाण, ब्लॅकहेड्स निघून जातात. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही घरगुती स्क्रबचा वापर करू शकता. कारण ते सर्वात जास्त प्रभावी ठरतात. शिवाय त्यामुळे त्वचेचं पोषणही होत असतं. 

त्वचेवर लावा ऑईल फ्री मॉईस्चराईझर

त्वचा स्वच्छ केल्यावर त्वचेवरील नैसर्गिक तेल कमी झाल्यास ती कोरडी आणि निस्तेज होऊ शकते. यासाठीच त्वचेचं योग्य पोषण होणंही तितकंच गरजेचं आहे. तुम्ही यासाठी त्वचा स्वच्छ केल्यावर तिच्यावर ऑईल फ्री मॉईच्सराईझर लावू शकता. ज्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेलाचं संतुलन राखता येतं. वॉटर बेस्ड क्लिंझर्स अथवा वॉटर बेस्ड मॉईस्चराईझरमुळे त्वचा तेलकट दिसत नाही. म्हणजेच या गोष्टींचा वापर केल्यामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय ती मऊही होते. 

त्वचा टोन करणे

त्वचा क्लिन केल्यावर ती टोनरने टोन करणं महत्त्वाचं असतं. कारण योग्य प्रकारच्या टोनरमुळे त्वचेला पोषण मिळतं. बऱ्याचदा क्लिंझर्स वापरल्यावर त्वचा टोन करण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र हे अतिशय चुकीचं आहे. टोनरचा वापर केल्यामुळे तेलकट त्वचेवर पिंपल्स कमी येण्याचा धोका कमी होतो. आम्ही शेअर केलेलं हे टेकनिक तुम्हाला आवडलं का  हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर सांगा. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

तेलकट त्वचेसाठी हे आहेत बेस्ट क्लिंझर (Best Cleanser For Oily Skin In Marathi)

जाणून घ्या दिवसभरात कितीवेळा करायला हवा चेहरा क्लिन

चेहरा धुण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत आहे का

22 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT