सुखकर आयुष्यासाठी योग हा फारच महत्वाचा आहे. वेगवेगळ्या फायद्यांसाठी योग केला जातो. मन:शांती, एकाग्रता, पचनक्रिया यासाठी योगा केला जातो. यामधीलच एक प्रकार म्हणजे अग्नी मुद्रा. अग्नी देवतेशी निगडीत असा हा प्रकार असून त्याचा उपयोग हा वेगवेगळ्या पद्धतीने होतो. अग्नी या घटकाशी किंवा तत्वाशी निगडीत असलेल्या अशा योगसाधनेची नेमकी कृती काय आणि त्याचे फायदे काय ते जाणून घेऊन गरजेचे असते. चला करुया सुरुवात
अग्नी मुद्रा कशी करावी?
कोणतीही योगसाधना करण्यासाठी तुम्हाला काही ठराविक कृती फॉलो कराव्या लागतात. त्या कोणत्या ते पाहूया
- अग्नी मुद्रा करण्यासाठी तुम्हाला एका शांत आणि स्वस्थ जागेवर बसायचे आहे.
- पद्मासन किंवा कोणत्याही आरामदायी आसनामध्ये तुम्हाला बसायचे आहे.
- आता अनामिका अंगठ्याच्या खाली घ्यायचे आहे. उरलेली सगळी बोटं सरळ ठेवायची आहेत.
- अंगठ्याने अनामिकेला दाबायचे आहे. त्यामुळे याचा परिणाम चांगलाच जाणवतो.
- हे आसन किमान 15 मिनिटे तरी करायचे आहे. उपाशी पोटी केल्यामुळे याचे अधिक फायदे मिळण्यास मदत मिळते.
अग्नी मुद्रा करण्याचे फायदे
अग्नी मुद्रा कशी करायची हे जाणून घेतल्यानंतर त्याचे नेमके कोणते फायदे होतात ते जाणू घेऊया
- वजन कमी करणे – वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर अग्नी मुद्रा तुमच्यासाठी फारच फायद्याची आहे.खूप लोकांना पचनाचा त्रास असतो. पचनाचा त्रास असणाऱ्या लोकांचे वजन हे वाढत राहते. अशांची चयापचय क्रिया चांगली करण्यासाठी हे आसन उत्तम काम करते.
- डोळ्यांना ठेवते निरोगी: शरीरामध्ये अग्नी तत्व वाढले की त्याचा फायदा डोळ्यांना होतो. म्हणूनच या आसनाला अग्निवर्धक मुद्रा असे म्हणतात. अग्नी त्तव डोळ्यांशी जोडलेले असल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते. डोळ्यांचे आजार व उपाय माहीत झाले तर तुम्हाला या आसनाचे महत्व कळेल.
- जर तुम्हाला सर्दी किंवा खोकला झाला असेल अशा वेळी हे आसन फारच फायद्याचे ठरते. कारण खूप वेळा शरीर थंडावल्यामुळे हा त्रास होण्याची शक्यता असते. अग्नी तत्वाने युक्त असलेले हे आसन तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून दूर ठेवते.
- कोलेस्ट्रॉलच्या त्रासाने तुम्ही त्रस्त असाल आणि तुम्हाला शरीरातून कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल तर तुम्ही हे आसन करायला हवे. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास हे आसन नक्कीच मदत करते
कधी करु नये आसन
आसन करण्याची योग्यवेळ आणि काळ असतो. त्यामुळे तुम्ही जेवला नसाल तर हे अजिबात आसन करु नका. कारण त्यामुळे त्रास होऊ शकतो. इतकेच नाही तर ताप आल्यानंतर तुम्ही अग्नीमुद्रा करायला नको. कारण अग्नीमुद्रा केल्यामुळे शरीरातील हिट वाढते जी तुमच्या शरीराला अधिक थकवा देते.
आता रोज सकाळी अग्नी मुद्रा करायला विसरु नका
अधिक वाचा
Anulom Vilom Benefits In Marathi |अनुलोम विलोम प्राणायाम मराठी माहिती
घरगुती उपायांनी करा वात रोग उपचार मराठी (Vaat Rog Home Remedies In Marathi)
वज्रासनाचे आश्चर्यचकीत करणारे फायदे (Vajrasana Benefits In Marathi)