ADVERTISEMENT
home / Diet
जाणून घ्या नव्या Eco-Keto Diet बद्दल

जाणून घ्या नव्या Eco-Keto Diet बद्दल

वजन कमी करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी आपण नेहमीच काही ना काही डाएट फॉलो करत असतो. ज्यामध्ये आता किटो डाएटचाही समावेश झाला आहे. पण जगभरातील नव्या ट्रेंडप्रमाणे सध्या चर्चा सुरू झाली आहे ती ईको-किटो डाएट (Eco-Keto Diet)ची. येत्या वर्षात हे नवीन डाएट ट्रेंडमध्ये आहे. पोषण, फिटनेस आणि वजन घटवण्यासाठी आधी किटो डाएट फॉलो करत होते. ज्यामध्ये लो कार्ब्स आणि हाय फॅट्स असलेल्या पदार्थांचा समावेश होता. मात्र या डाएटला किटोजेनिक डाएट, लो कार्ब्स डाएट आणि फॅट डाएट नावानेही ओळखलं जातं. आधी आलेल्या किटो डाएटला ईको-फ्रेंडली पर्याय म्हणून आता ईको-डाएट समोर येत आहे. जर तुम्ही शाकाहारी किंवा वेगन असाल तर तुमच्यासाठी ईको-किटो डाएट हा उत्तम पर्याय आहे.  

काय असतं किटो डाएट?

eco-keto-diet-3

एक्सपर्ट्सनुसार अधिक प्रमाणात कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ खाल्लाने शरीरातील ग्लुकोज आणि इन्शुलिन अधिक प्रमाणात उत्पन्न होतं. ज्यामुळे शरीरात फॅट्स जमा होऊ लागतात आणि वजन वाढतं. तर किटो डाएटमध्ये कार्बोहायड्रेटचं सेवन कमी केल्यामुळे फॅट्सपासून एनर्जी निर्माण होते. जी वजन कमी करण्यास मदत करते. एका परफेक्ट किटो डाएटमध्ये 70 टक्के फॅट, 25 टक्के प्रोटीन आणि 5 टक्के कार्बोहायड्रेट यांचा समावेश केला जातो.

ईको-किटो डाएटचं वैशिष्ट्य  

eco-keto-diet-1 %281%29

ADVERTISEMENT

ईको-कीटो डाएट आता हळूहळू योग्य डाएटच्या रूपात समोर येत आहे. हे डाएट बऱ्याच काळासाठी फॉलो केलं जाऊ शकतं. किटो डाएटमध्ये रेड मीटचा समावेश असतो. याचा वापर थांबवण्यासाठी आता ईको-किटो डाएटचा ट्रेंड वेगाने सुरू आहे. कारण रेड मीट हे पर्यावरणाला अपायकारक असते. रेड मीटमधून मोठ्या प्रमाणात कार्बनचं उत्सर्जन होतं. इतकंच नाहीतर रेड मीट हृदयासाठीही नुकसानदायक आहे. भारतात जरी रेड मीटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असला तरी भविष्यातील धोका टाळण्यास आत्तापासून हातभार लागत आहे.

नो रेड मीट

eco-keto-diet-1

रेड मीट हे आपल्या शरीराला आणि निसर्गालाही अपायकारक असल्याने हे टाळण्यासाठी अधिक फॅट्स असलेल्या शाकाहारी पदार्थांच्या समावेश ईको-किटो डाएटमध्ये केला जातो. उदा. अवकॅडो, पनीर, केळ, पालक, ब्रोकोली इ. अधिक फॅट्ससाठी जेवणात ऑलिव्ह आणि नारळाच्या तेलाचा वापरही केला जाऊ शकतो. तसंच यामध्ये साखरेऐवजी मध किंवा गुळाचा वापर केला जातो.  

ईको-किटो डाएटमध्ये हरित घटकांचा समावेश

eco-keto-diet-4

ADVERTISEMENT

ईको-किटो डाएटमध्ये जास्तीत वनस्पती आणि हिरव्या भाज्यांपासून बनवण्यात येणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो. ज्यामुळे कोणत्याही प्राणीवर्गाला नुकसान पोचत नाही आणि बायोडायवर्सिटी म्हणजेच जैवविविधता कायम राखण्यासाठी आणि ग्रीनहाऊस उत्सर्जन कमी करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. या डाएटमध्ये स्थानिक फळ आणि भाज्या खाण्यावरही भर दिला जातो. ज्यामुळे तुम्ही तुमच्या जवळपासच्या बाजारातून हव्या त्या भाज्या आणि फळ खरेदी करून ताजे पदार्थ, सलाड आणि ज्यूस करून घेऊ शकता.

कुठे पाहू शकता ईको-किटो डाएट रेसिपीज

eco-keto-diet-5

जर तुम्हालाही हे डाएट फॉलो करायचं असेल तर तुम्ही FoodMonster App डाऊनलोड करू शकता किंवा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सर्च केल्यासही तुम्हाला ईको-किटो डाएटच्या रेसिपीज मिळतील.

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:

ADVERTISEMENT

डाएट न करताही कमी करता येऊ शकते वजन, वाचा टीप्स

डाएट करायचा विचार करुनही होत नाही डाएट,जाणून घ्या कारणं

काय आहे स्पृहा जोशीचा डाएट फंडा

Weight Loss Diet Plan In Marathi

ADVERTISEMENT
05 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT