ADVERTISEMENT
home / आरोग्य
home remedies for runny nose in marathi

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय (Nakatun Pani Yene Upay)

एकदा सर्दी आणि खोकला झाला की अर्थातच हैराण व्हायला होतं. त्यातही सर्दी असताना नाकातून पाणी येणे ही समस्या असेल तर अधिक त्रासदायक ठरते. सामान्यतः सर्दी ही व्हायरसमुळे होते. सर्दी झाल्यावर नाकातून पाणी येणे, शिंका येणे, गळा खवखवणे, नाक बंद होणे, ताप येणे ही लक्षणे सर्वसामान्यतः दिसून येतात. पण त्यासाठी आपण नक्कीच लगेच डॉक्टरकडे धावत जात नाही. आपल्याकडे आजीचा बटवा अथवा अनेक घरगुती उपाय पूर्वपरंपरागत चालत आलेले आहेत. आपण त्याचाच उपयोग पहिल्यांदा करतो. नाकातून पाणी येणे घरगुती उपाय (Home Remedies For Runny Nose In Marathi) नक्की काय आहेत हे आपण या लेखातून पाहणार आहोत. पण त्याआधी नाकातून पाणी येणे म्हणजे नक्की काय ते जाणून घेऊया. 

नाकातून पाणी येणे म्हणजे नक्की काय (What Is Runny Nose In Marathi?)

runny nose
नाकातून पाणी येणे म्हणजे नक्की काय

नाक वाहणे अथवा नाकातून पाणी येणे ही अत्यंत कॉमन समस्या आहे. सायनस आणि नाकाच्या नळीमध्ये कफ वाढू लागतो आणि त्याचा जाडेपणा अधिक त्रासदायक ठरू लागतो. त्यामुळे नाकातून पाणी येणे अशा समस्या निर्माण होतात. वास्तविक कफ वाढल्यामुळे सर्दी, अलर्जी, खोकला यासारखे आजार शरीरातून निघून जाण्यास मदत मिळते. आपल्याला नाकगळती थांबविण्यासाठी अनेक औषधे बाजारातही मिळतात. मात्र आपण घरगुती उपायांना अशावेळी जास्त महत्त्व देतो. असेच काही नाकातून पाणी येणे घरगुती उपाय आपण पाहणार आहोत. 

नाकातून पाणी येण्याची लक्षणे (Symptoms Of Runny Nose In Marathi)

सर्दी होण्याची मुळात दोन कारणे आहेत. व्हायरसमुळे सर्दी होते. रायनोव्हायरस आणि कोरोनाव्हायरस (coronavirus). याची नक्की लक्षणे काय आहे, नाकातून पाणी येणे उपाय जाणून घेऊया. 

  • नाकामध्ये सतत खाज येणे
  • गळ्यामध्ये खवखवणे 
  • नाक बंद होणे आणि श्वास घ्यायला त्रास होणे 
  • डोकं जड होणे 
  • डोळे जळजळणे
  • खोकला येणे
  • ताप येणे
  • सतत शिंका येणे 

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय (Home Remedies For Runny Nose In Marathi)

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय नक्की काय काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तुम्ही त्वरीत डॉक्टरकडे जाण्याआधी नक्कीच घरी हे उपाय करून पाहू शकता. पण या उपयांनी काही फरक पडत नाही असे लक्षात आल्यास, त्वरीत डॉक्टरकडे जा. हे घरगुती उपाय नक्की कसे करायचे, नाकातून पाणी येणे उपाय जाणून घ्या. 

ADVERTISEMENT

पेपरमिंट ऑईल (Peppermint Oil)

Home Remedies For Runny Nose In Marathi

साहित्य

  • 3 थेंब पेपरमिंट ऑईल
  • 5 थेंब लव्हेंडर तेल

वापरण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले दोन्ही तेल मिक्स करून घ्या 
  • मिक्स केल्यानंतर हे छाती, मान आणि नाकावर लावा 
  • काही तास हे असंच ठेवा 

याचा कधी वापर करावा 

दिवसातून तुम्ही दोन ते तीन वेळा याचा वापर सर्दी झाल्यावर नाकातून पाणी येत असेल तर नक्कीच करू शकता. 

ADVERTISEMENT

फायदे 

पेपरमिंटच्या तेलामध्ये मेंथॉल घटक असतो, ज्यामुळे छाती डिंकजेस्ट होते आणि कफ सुटायला मदत मिळते. कफ पातळ होते तेव्हा शरीरातून बाहेर यायला मदत मिळते. लव्हेंडर तेलामध्ये अँटिबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात जे संक्रमणावर फायदेशीर ठरतात.

वाचा – Mungya Yene Upay In Marathi

मीठाचे पाणी (Salt water)

Home Remedies Runny Nose In Marathi

साहित्य

ADVERTISEMENT
  • 1-2 चमचे मीठ
  • 2 कप गरम पाणी 
  • ड्रॉपर 

वापरण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले गरम पाण्यात मीठ मिक्स करून घ्या
  • मिक्स केल्यानंतर ड्रॉपरच्या मदतीने हे पाणी नाकात घाला

याचा कधी वापर करावा 

तुम्हाला आराम मिळेपर्यंत तुम्हीही कितीही वेळा दिवसातून हा उपाय करू शकता 

फायदे 

ADVERTISEMENT

मीठाचे पाणी कफ सुटायला मदत करते. यामुळे नाकात येणारी खाज आणि सतत येणाऱ्या शिंकाही कमी होतात. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. 

वाफ घेणे (Steam)

steam on face
नाकातून पाणी येण्याचे उपाय

साहित्य

  • एक मोठे भांडे गरम पाणी 
  • स्वच्छ टॉवेल 

वापरण्याची पद्धत 

  • सर्वात पहिले गरम पाणी करून घ्या
  • त्यानंतर डोक्यावर टॉवेल ठेवा आणि गरम पाण्याची वाफ तुम्ही घ्या 
  • यामुळे नाकातील कफ अर्थात शेंबूड सुटेल आणि नाकातून येणार पाणी तुम्ही शिंकरून काढून टाका 

याचा कधी वापर करावा 

ADVERTISEMENT

दिवसातून चार ते पाच वेळा तुम्ही हा उपाय करू शकता 

फायदे 

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय विचार करतो तेव्हा सर्वात जवळचा उपाय म्हणजे वाफ घेणे. गरम पाण्यामुळे नाकातून गळणारे पाणी अधिक प्रमाणात बाहेर येते आणि डोके हलके होण्यास मदत मिळते. तसंच सतत नाकातून पाणी वाहत राहत नाही आणि गरम वाफेमुळे नाकातून जास्त पाणी निघून जाण्यास मदत मिळते. 

लाल मिरचीचा उपयोग (Red Chilli)

नाकातून पाणी येणे उपाय

साहित्य

ADVERTISEMENT
  • लाल मिरची  

वापरण्याची पद्धत 

  • खाण्यामध्ये लाल मिरचीचा अधिक वापर करावा 

फायदे 

लाल मिरची ही अँटीहिस्टमाईनप्रमाणे कार्य करते. नाकातून वाहणारे पाणी आणि कफ काढून टाकण्यास याची मदत मिळते. तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ सोप्या पद्धतीने बाहेर काढण्यासाठी लाल मिरची हा चांगला पर्याय आहे. यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे शरीर गरम होते. नाकातून पाणी येणे घरगुती उपाय करताना तुम्ही तुमच्या जेवणामध्ये लाल मिरचीचा समावेश करून घ्यावा. 

गरम चहा (Hot Tea)

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय

साहित्य

ADVERTISEMENT
  • तयार केलेले एक कप गरमागरम चहा 

वापरण्याची पद्धत 

  • गरमागरम हर्बल चहा बनवा 
  • चहाची वाफ तुम्ही नाकाजवळ घ्या आणि त्याचा वास घ्या  

याचा कधी वापर करावा 

दिवसातून चार ते पाच वेळा तुम्ही हा उपाय करू शकता 

फायदे 

ADVERTISEMENT

नाकातून पाणी येणे घरगुती उपाय आपण करतो तेव्हा चहादेखील पर्याय आहे. तुम्ही गरम चहा करून त्याचा फायदा करून घ्या. गरम चहाच्या वाफेने आणि पिण्याने गळ्यामध्ये नक्कीच लवकर आराम मिळतो. यामुळे नाक वाहत असेल तर त्यावर त्वरीत परिणाम होतो. कॅमोमाईल, आलं, पुदिना अशा पदार्थांचा वापर करून तयार करण्यात आलेला चहा नाकातून पाणी येत असल्यास उत्तम ठरतो. सर्दीमुळे गळ्यात होणारी खवखव ही चहामुळे कमी होण्यास मदत मिळते. 

आले (Ginger)

ginger
Remedies for Runny Nose In Marathi

साहित्य

  • आल्याचा तुकडा 
  • मीठ 

वापरण्याची पद्धत 

  • आल्याचा तुकडा किसून घ्या
  • त्यामध्ये मीठ मिक्स करा 
  • हे मिश्रण तुम्ही तोंडात ठेवा आणि याचा येणारा रस तुम्ही गिळत राहा 
  • हवं तर तुम्ही आल्याचा चहादेखील करून पिऊ शकता

याचा कधी वापर करावा 

ADVERTISEMENT

संपूर्ण दिवसात तुम्ही आले कितीही वेळा अशा प्रकारे चर्वण करू शकता. 

फायदे 

आल्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट हे नाकातून पाणी येणे घरगुती उपायासाठी फायदेशीर ठरतात. यामध्ये अँटिव्हायरल आणि अँटिफंगल गुणही आढळतात. नाकातील वाहणारे पाणी आणि कफ काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. 

लसूण (Garlic)

garlic
नाकातून पाणी येणे उपाय

साहित्य

ADVERTISEMENT
  • लसणीच्या पाकळ्या  

वापरण्याची पद्धत 

  • सोललेल्या पाकळ्या तुम्ही चावा आणि गिळून टाका. यामुळे नाकातून पाणी येण्याच्या समस्येवर त्वरीत आराम मिळेल 

याचा कधी वापर करावा 

संपूर्ण दिवसात तुम्ही तीन ते चार लसणीच्या पाकळ्या खा 

फायदे 

ADVERTISEMENT

लसूण तुमचे शरीर उष्ण करण्यास मदत करते. त्यामुळे नाकातून पाणी येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय म्हणून तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. यामध्ये असणारे अँटिव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण किटाणू मारण्यासाठी मदत करतात. नाकातून पाणी येणे उपाय करताना तुम्ही याचा नक्कीच वापर करून घेऊ शकता. 

निलगिरी तेल (Nilgiri Oil)

साहित्य

  • निलगिरीचे तेल
  • रूमाल  

वापरण्याची पद्धत 

  • एक रूमाल घ्या. त्यावर काही निलगिरीचे थेंब घाला 
  • संपूर्ण दिवस तुम्ही या रूमालाचा सुगंध नाकाला लावा आणि घेत राहा 
  • असे केल्याने तुम्हाला दिवसभर नाक वाहत असेल तर आराम मिळेल 

याचा कधी वापर करावा 

ADVERTISEMENT

नाकातून पाणी येण्याची समस्या जात नाही तोपर्यंत तुम्ही रोज हा उपाय करा 

फायदे 

यामध्ये असणारे अँटिव्हायरल, अँटीमायक्रोबियल गुण वाहणारे नाक रोखण्यास मदत करतात. एनाल्जेसिक आणि सूज घालवणारे गुणही यामध्ये आढळतात.

मध (Honey)

honey
नाकातून पाणी येणे घरगुती उपाय

साहित्य

ADVERTISEMENT
  • एक चमचा मध 
  • 3-4 थेंब लिंबाचा रस 
  • एक ग्लास कोमट पाणी   

वापरण्याची पद्धत 

  • कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून घ्या 
  • हे पाणी तुम्ही प्या 

याचा कधी वापर करावा 

संपूर्ण दिवसातून दोन वेळा तुम्ही असे पाणी करून प्या

फायदे 

ADVERTISEMENT

मधामध्ये अँटीमायक्रोबियल गुण आढळतात आणि लिंबातील विटामिन सी मुळे किटाणू मरण्यास मदत मिळते. नाकातून येणारे पाणी थांबण्यासही मदत मिळते. नाकातील नळीला आलेली सूज कमी करण्यास मधाचा फायदा मिळतो. 

गरम पाणी (Hot Water)

Nakatun Pani Yene Upay

साहित्य

  • एक ग्लास गरम पाणी   

वापरण्याची पद्धत 

  • गरम पाणी पिणे  

याचा कधी वापर करावा 

ADVERTISEMENT

संपूर्ण दिवसातून दोन ते वेळा तुम्ही पाणी गरम करून प्या

फायदे 

गरम पाण्याची वाफ घशातील खवखवणे कमी करते आणि वाहणारे नाक यामुळे कमी होते. आपण जसा गरम चहा आणि वाफेचा नाकातून पाणी येणे घरगुती उपाय म्हणून उपयोग करून घेतो. त्याचप्रमाणे गरम पाण्याचाही उपयोग होतो. सर्वात सोपा आणि फायदेशीर हा उपाय आहे. 

निर्माण होणारे प्रश्न आणि उत्तरे (FAQ’s)

1. काळी मिरीचा काही उपयोग नाकातून पाणी येत असेल तर करून घेता येतो का?

ADVERTISEMENT

काळी मिरी जर तुम्ही मधाबरोबर चाटण करून घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. नाकातून येणारे पाणी थांबण्यासाठी हादेखील चांगला घरगुती उपाय आहे. 

2. हळदीचे दूध पिता येते का?

एक ग्लास गरम दुधामध्ये दोन चमचे हळद पावडर घाला आणि तुम्ही सकाळी प्या. नाकातून पाणी येत असेल तर बंद करण्यासाठी याचा उपयोग होतो. याशिवाय घशाची खवखव असेल तर तीदेखील थांबते. 

3. नाकातून पाणी सतत वाहत राहणे गंभीर आहे का?

ADVERTISEMENT

जर तुम्हाला सर्दीचा हा त्रास 8-10 दिवसांपेक्षा अधिक दिसून येत असेल आणि घशातील खवखव अथवा नाकातून पाणी येणे हे जास्त होत असेल तर याकडे तुम्ही गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

13 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT