मराठी पार्श्वभूमीवरील कथानक असलेल्या हिंदी मालिका किंवा व्यक्तिरेखा अपवादानेच पाहायला मिळतात. त्यातही त्या भूमिका साकारणारे कलाकार कित्येकदा हिंदीच असतात. एकदा मालिका गाजली की या कलावंतांना हिंदी मालिकांची दारे खुली होतात. त्यामुळे, एखाद्या मराठी कलाकाराला हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात काम करण्याची संधी जर मिळाली तर त्याला लॉटरीच लागते !. अनेक वर्ष चालणाऱ्या ह्या हिंदी मालिकांचा भाग होण्यासाठी मराठी कलाकार शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात. मात्र, अभिनेता आदिश वैद्य (Adish Vaidya) त्याला अपवाद निघाला आहे. हिंदीची बहुचर्चित आणि टीआरपीमध्ये अव्वल असलेल्या मालिकेवर पाणी सोडत त्याने मराठी कलाकारांचा नवा पायंडा घातला आहे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मात्र आदिशने नक्की असे का केले याच्या उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली होती. आता आदिशनेच याला ब्रेक लावला आहे.
अधिक वाचा – वैभव तत्त्ववादीचा ‘ग्रे’ रहस्यमयी आणि थरारक अनुभव देणारा चित्रपट
आदिशने दिला चर्चांना ब्रेक
हिंदीत काम मिळतं म्हणून छोट्या-मोठ्या भूमिका पदरात पाडून घेण्याचे दिवस आता संपले असून, मराठी कलाकार भूमिकेला प्राधान्य देत असल्याचे आदिश वैद्य ने दाखवून दिले आहे. आदिश ‘गुम है किसी के प्यार मै’ या हिंदी मालिकेमध्ये ‘मोहित’ नामक भूमिका साकारत होता. मात्र अपेक्षेप्रमाणे या भूमिकेला अधिक फ्रेम मिळत नसल्याकारणामुळे आदिश ने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे. याबाबत आदीश म्हणाला की, “मी ऑगस्टच्या मध्यान्हात ही मालिका सोडली, माझ्या भूमिकेशी मी समाधानी नव्हतो. मालिका साईन करतेवेळी दिलेल्या वचनानुसार मला पुरेसा स्क्रीन टाईम मिळाला नाही. तरी मी एक वर्ष वाट पाहिली, कारण, काँट्रेक्टनुसार मला नोटीस कालावधीची पूर्तता करणे नैतिकदृष्ट्या योग्य वाटलं. माझे पात्र वाढवण्यासाठी मी एक वर्ष वाट पाहिली, पण मला जे वचन दिले होते ते काही पूर्ण झाले नाही. मी चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊसची वाट पाहत होतो, पण अखेरीस, मला समजले की चांगले करत असूनही, पात्र वाढत नाहीय. माझा ट्रॅक हवा तसा आकार घेत नव्हता, त्यामुळे इथे काही वाव नसल्याचे माझ्या लक्षात आलं.”
अधिक वाचा – इंडियन आयडल- मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून दिसणार ‘अजय अतुल’
मैत्रीपूर्ण वातावरणातच सोडली मालिका
तसेच अगदी मैत्रीपूर्ण वातावरणात ही मालिका सोडल्याचे आदिश सांगतो.“मला हा निर्णय घेण्यासाठी दीड महिना लागला, कारण यासंदर्भात मी मालिकेच्या निर्मात्यांशी चर्चा करत होतो. त्यांनी मला मालिका न सोडण्याची विनंतीदेखील केली होती. पण,राहिला प्रश्न मी करत असलेल्या भूमिकेचा ! दिग्दर्शकाच्या दृष्टीने माझ्या भूमिकेत कोणतीही वाढ पुढे दिसत नव्हती. मालिकेच्या कथानकात माझ्या पात्राला अधिक महत्त्वच मिळत नव्हतं, त्यामुळे निष्कर्षावर येईपर्यंत मला काहीही कुठे बोलणे योग्य वाटले नाही. दरम्यान, प्रॉडक्शन हाऊस आणि माझ्यात कोणताही वाद झालेला नाही. माझ्या भूमिकेवरच मी जर नाखूश असेल तर मी माझे शंभर टक्के देऊच शकणार नाही, हे त्यांना देखील कळले, त्यामुळे मी जर स्वतःहून राजीनामा दिला तर त्यांची काही हरकत नसेल, असे ठरले. आणि सर्व काही चांगल्या नोटवर सेटल केलं गेलं.”
आदिश बिग बॉस १५ साठी मालिका सोडत असल्याची बातमी देखील आली होती, याबद्दल आदिश म्हणाला, “जर तसे घडले असते, तर मी ते सहा महिन्यांपूर्वीच सोडले असते. एक अभिनेता म्हणून चांगल्या वाटचालीसाठी मी हे पाऊल उचलले आहे. काही चांगल्या ऑफर मला मिळत आहेत, ज्यात मुख्य भूमिका करण्याची संधी मला मिळते आहे.” मात्र पुढील कोणते प्रोजेक्ट आहेत याबाबत आदिशने अजूनही काही सांगितलेले नाही.
अधिक वाचा – Bigg Boss Marathi : ही जोडी तुटायची नाय…. विशाल-विकासची मैत्री सगळ्यांना आवडणारी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक