ADVERTISEMENT
home / मनोरंजन
indian idol marathi

‘इंडियन आयडल- मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून दिसणार ‘अजय अतुल’

‘इंडियन आयडल’ हा हिंदी रियालिटी गाण्याचा शो गेले अनेक वर्ष गाजतो आहे. या रियालिटी शो मधून अनेक गायक आणि गायिका आज इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमावत आहेत. या शो ने अनेक कलाकार मिळवून दिले आहेत. आता सोनी मराठी पहिल्यांदाच घेऊन येत आहे ‘इंडियन आयडल – मराठी’! कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘इंडियन आयडल – मराठी’ ही सुवर्णसंधी ठरणार आहे. या इतक्या दर्जेदार कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहे संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल. पुण्यात एका भित्तीचित्राद्वारे या कार्यक्रमाच्या परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मुळात उभरत्या मराठी गायक आणि गायिकांना ही नामी संधी आहे. त्यामुळे सर्वांनाच आता उत्सुकता लागून राहिली आहे. 

अधिक वाचा – नेहा धुपिया पुन्हा झाली आई, अंगदने शेअर केली पोस्ट

अजय आणि अतुलची मराठी मनावर जादू 

आपल्या संगीताचं  गारुड या जोडीनं महाराष्ट्राच्याच नाही तर अवघ्या देशाच्या मनावर घातलं आहे. या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. मराठी मनोरंजन विश्वात पहिल्यांदाच आशा प्रकारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. पुणे शहरात या भित्तिचित्राची सगळीकडे चर्चा आहे. शहराच्या मधोमध असलेलं हे चित्रं पुणे शहरवासीयांचं लक्ष वेधून घेतंय. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढलं आहे.’अजय-अतुल’ या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती  दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. हा मंच आता सोनी मराठी वाहिनीनी मराठीमध्ये आणला आहे. या एवढ्या मोठ्या मंचाला ‘अजय-अतुल’ हे परीक्षक म्हणून मिळाले आहेत. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स सोनी लिव्हवर सुरू झाल्या आहेत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss 15 : जंगलमध्ये टिकू शकतील का हे नवे स्पर्धक, असा रंगला ग्रँड प्रिमिअर

ADVERTISEMENT

लवकर दिसणार हा शो 

आतापर्यंत हिंदी इंडियन आयडलचे अनेक सीझन झाले आहेत. मात्र मराठीतील हा पहिलाच इंडियन आयडल रियालिटी शो घेऊन येत आहेत. त्यामुळे आता सगळीकडेच उत्सुकता आहे. तसंच हिंदी रियालिटी शो मध्ये नेहमीच मराठी स्पर्धकांवर अन्याय होतो अशीही कुजबूज केली जाते. मागच्या इंडियन आयडलमध्ये नचिकेत लेले, सायली कांबळे, अंजली गायकवाड आणि कुलकर्णी असे चार स्पर्धक होते. मात्र त्यापैकी तीन स्पर्धक गेल्यानंतर अशी चर्चा जास्त रंगली होती. त्यामुळे आता मराठीतच हा शो येत असल्याने वेगवेगळ्या ठिकाणच्या मराठी मुलांना आपल्या कलागुणांना वाव दाखविण्याची ही नामी संधी आहे. तसंच आता या रियालिटी शो मधून अजय आणि अतुल कसे स्पर्धक निवडणार आणि या शो चे निवेदन कोण करणार याकडेही चाहत्यांचे लक्ष आहे. कारण मराठीत असे रियालिटी शो फारच कमी पाहिले जातात. त्यामुळे या शो ची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून लवकरच हा शो येईल अशी अपेक्षा प्रेक्षक करत आहेत. संगीताची आवड असणाऱ्यांसाठी तर ही पर्वणीच म्हणावी लागणार आहे. 

अधिक वाचा – बॉलीवूड आणि ड्रग्ज कनेक्शन, आजवर या सेलिब्रेटींची नावे आली आहेत पुढे

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT