ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
माणसं झोपेत नक्की का बोलतात, जाणून घ्या कारण

माणसं झोपेत नक्की का बोलतात, जाणून घ्या कारण

आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे अनेक वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. सध्या चालू असलेला कोरोना काळ (Corona – Covid 19) कधी संपणार याचीही सर्व जण आतुरतेने वाट पाहत आहेत. अशाच अनेक आजारांपैकी एक सामान्य आजार म्हणजे झोपेत बडबड करणे. आपण आजूबाजूला बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल की झोपेत बडबड केली. इतकंच काय आपल्या घरातही असं कोणीतरी नक्की असेल. बऱ्याचदा स्वप्नं पाहताना अनेक जण झोपेत बडबड करत असतात हे जाणवतं. पण याची नक्की कारणं काय आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? कधी कधी ही समस्या कॉमन आहे असं समजून दुर्लक्ष करणे तुम्हाला नक्कीच महागात पडू शकतं. कारण ही सवय स्लिपिंग डिसॉर्डरमध्ये (Sleeping disorder) बदलायला वेळ लागत नाही. पण नक्की झोपेत माणसं का बडबड करतात (why human beings talk in sleep) आणि यावर काय उपाय करता येऊ शकतो हे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.

वारंवार झोप येत असेल तर तपासून घ्या, झाला नाही ना ‘हा’ आजार

माणसं झोपेत का बोलतात त्याची कारणे (why human beings talk in sleep)

माणसं झोपेत का बोलतात त्याची कारणे (why human beings talk in sleep)

Shutterstock

ADVERTISEMENT

बऱ्याचदा रात्री झोपेत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांना झोपेत बडबडायची सवय असते असं आपल्याला जाणवतं. तज्ज्ञांच्या मते स्लिपिंग डिसॉर्डरमुळे बऱ्याच जणांना झोपेत बडबड करायची सवय असते. तर काही जणांच्या  मते लहान मुले आणि म्हातारी माणसे यांच्यामध्ये या प्रकारची लक्षणे जास्त दिसून येतात.  या प्रकाराला पॅरासोम्निया अथवा अस्वाभाविक व्यवहार असेही म्हटले जाते. बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे अथवा  नीट लक्ष न दिल्यामुळे झोपेत बोलण्याची सवय लागू शकते.  बऱ्याच जणांच्या  मते सततच्या तणावामुळेही हे होते. तणाव असल्याने झोपेत दिसणाऱ्या गोष्टी आपसूक तोंडावाटे  बाहेर येतात. एखादी व्यक्ती आपला तणाव  कोणाहीसह बोलून दाखवत नसेल तर अशा व्यक्तीच्या बाबतीत झोपेत बोलण्याची सवय जास्त प्रमाणात दिसून येते. डोक्यावर सतत ताण घेऊन कोणतीही व्यक्ती राहू शकत नाही. झोपेतच डोक्याला आणि शरीराला आराम मिळत असतो. त्याचवेळी हे सर्व विचार आपसूकच तोंडातून बाहेर येतात. तसंच व्यवस्थित आराम केला नाही आणि सतत ताण घेत राहिल्यास,  ही लक्षणं अधिक प्रमाणात दिसून येतात. 

दिवसभर झोप येत असेल तर नक्की ट्राय करा ‘या’ टिप्स

कशी मिळवावी सुटका

सामान्यतः यातून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करायला हवा. झोपण्याची योग्य वेळ पाळायला हवी आणि तसंच झोपण्याची पद्धतही नीट आहे की नाही हे तपासून घ्यायला हवे. पोटावर न झोपता तुम्ही नेहमी पाठीवरच झोपावे. ही सवय तुम्ही करून घ्यायला हवी.  सर्वात महत्वपूर्ण म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टींवर लक्ष ठेवा. यासह रोज व्यायाम करायला हवा जेणेकरून शरीर व्यवस्थित फिट राहील आणि झोपेत बडबडायची सवय लागणार नाही. याशिवाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करून  अथवा हात आणि पाय स्वच्छ करून  झोपायची सवय करून घ्या. हात  आणि पाय खराब असतील तर वाईट स्वप्नं पडतात आणि झोपेतील बडबड जास्त वाढते असं म्हटलं जातं (हे अजून सिद्ध झालेले नाही मात्र घरातील मोठी माणसं असं सांगतात) तसंच वैज्ञानिक कारण म्हणजे आपण जिथे झोपतो तिथे घाण असू नये म्हणून स्वच्छता राखण्यासाठी हे करावं. स्वच्छ राहिल्यावर झोप चांगली लागते आणि न चाळवता झोपेत बडबड होत नाही.  तुम्हाला झोपेत बडबड करण्याची सवय अधिक होतेय असं वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.  

झोप येत नसल्यास करा सोपे उपाय, खास टिप्स

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

23 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT