थंडीत गरम गरम पदार्थांचा आस्वाद घेण्याची मौज काही निराळीच आहे. काही पदार्थ गरम खाल्ले तर जास्त स्वादिष्ट लागतात. मात्र यासाठी तुम्ही एखादा पदार्थ वारंवार गरम करून खात असाल तर ते मुळीच योग्य नाही. अनेकांना गरम गरम जेवायला आवडतं म्हणून खाद्यपदार्थ सतत गरम करून खाण्याची सवय असते. वेळ आणि पैसे वाचवण्याचा हा एक सोपा मार्ग असतो. आजकाल यासाठी घराघरात मायक्रोव्हेव दाखल झाले आहेत. मायक्रोव्हेव्हचा वापर कुकींग अथवा बेकींगसाठी कमी आणि अन्नपदार्थ रिहीट अथवा पुन्हा गरम करण्यासाठीच जास्त केला जातो. मात्र असं केल्यामुळे तुमच्या अन्नातील पोषक घटक नष्ट होतात.
Soyabean Recipe In Marathi | आजच ट्राय करा या सोयाबीन रेसिपीज
पुन्हा पुन्हा गरम केल्यामुळे कमी होते अन्नातील पोषण
अन्न खाण्यामुळे माणसाची भुक भागतेच पण शरीराचे योग्य पोषण होते. अन्नातील पोषक घटक मिळाल्यामुळे शरीरात रक्त, मांसपेशी मजबूत होतात. हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रत्येकाला दिवसभरात ठराविक पोषक आहाराची गरज असते. मात्र काही पदार्थ पुन्हा गरम केले तर त्यातील पोषक घटक नष्ट होतात. भाजी, डाळ अथवा अंडं तुम्ही जेव्हा पुन्हा पुन्हा गरम करता तेव्हा त्यातील पोषक घटक उष्णतेमुळे नष्ट होतात. ज्यामुळे असे अन्नपदार्थ खाण्याचा शरीरावर हवा तसा परिणाम होत नाही. अन्नपदार्थांमधून मिळणारे प्रोटीन्स, मिनरल्स, व्हिटॅमिन्स नष्ट झाले तर शरीर कमजोर आणि अशक्त होते.
नाचणी सत्व आणि नाचणी रेसिपीज (Nachni Satva Recipe In Marathi)
शिळे अन्न गरम करताना या गोष्टी ठेवा लक्षात
महत्त्वाचे म्हणजे अन्नपदार्थ शिजवताना ते जास्त उरणार नाहीत आणि शिळे खावे लागणार नाहीत याची काळजी घ्या. कारण शिळ्या पदार्थामध्ये ताज्या पदार्थांमधून मिळणाऱ्या पोषण घटकांपेक्षा कमी पोषणमुल्ये असतात. शिवाय जेव्हा तुम्ही ते पुन्हा गरम केले तर उष्णतेसोबत त्यात उरलेले पोषकतत्त्वंदेखील नष्ट होऊ शकतात. यासाठीच जर काही कारणांमुळे तुम्हाला शिळे अन्न जेवावे लागले तर ते फक्त एकदाच आणि थोड्या वेळासाठी गरम करा. गरम केल्यावर पदार्थ लगेच खा. ज्यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होण्याआधी तुम्ही ते पदार्थ खाल्लेले असतील. तळलेले पदार्थ पुन्हा गरम करू नका आणि वापलेले तेलदेखील पुन्हा वापरू नका.
चटपटीत आणि स्वादिष्ट राजमा रेसिपीज (Rajma Recipe In Marathi)
जाणून घ्या कुळीथ (हुलगे)चे अफलातून फायदे आणि रेसिपीज (Benefits of Kulith Dal In Marathi)