आपल्याकडे लहानपणापासून रात्री केस कापू नकोस असं घरातील प्रत्येक व्यक्ती कानीकपाळी ओरडून सांगत असते. विशेषतः आजी आजोबांच्या तोंडून तर हे नक्कीच ऐकलं जातं. लहानपणापासून आपल्याला घरातील मोठ्या माणसांकडून सूर्यास्तानंतर केस कापायला जाऊ नका अथवा नखं कापू नका असे नेहमीच सांगण्यात येते. इतकंच नाही तर असं करणं अशुभ असतं असंही लहानपणापासून मनावर बिंबविण्यात येते. पूर्वपरंपरागत चालत आलेल्या या चालरिती आपणही तशाच झाकलेल्या डोळ्यांनी पुढे नेत असतो. पण अनेकांना याबाबत प्रश्नही पडतात की, असं नक्की का नाही करायचं. पण खरंच रात्री केस कापणे हे शास्त्रात योग्य मानले जात नाही का? अथवा अशुभ मानले जाते का? याविषयी काही वैज्ञानिक कारणे आहे आणि इतरही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे नक्की काय कारण आहे आणि का रात्री केस कापू नयेत याबाबत अधिक माहिती जाणून घ्या, या लेखातून.
काय आहे वैज्ञानिक कारण
रात्री केस न कापण्यामागे पूर्वी कारण हे होते की, केस कापल्यानंतर इतरत्रः पडलेले केस हे खाण्याच्या पदार्थांमध्ये उडून जाण्याची शक्यता होती आणि रात्रीच्या वेळी पूर्वी प्रकाशही नसल्यामुळे खाण्याच्या पदार्थांमध्ये केस गेल्यास, तब्बेत बिघण्याचीही शक्यता असते. याशिवाय केसांमुळे घाण आणि बॅक्टेरिया पसरण्याचा धोकाही अधिक होता. केसांमध्ये अधिक प्रमाणात बॅक्टेरिया असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे केस रात्री न कापण्यामागे हे वैज्ञानिक कारण नेहमी सांगण्यात येते. तसंच कापलेल्या केसांमध्ये पटकन किटाणू पसरतात हेदेखील त्यामागे महत्त्वाचे कारण आहे. जे आपल्या आरोग्यासाठी अधिक हानिकारक ठरू शकते. याच कारणामुळे रात्री केस कापणे शास्त्रामध्येही चुकीचे मानले जाते.
अधिक वाचा – केसांचा हेअरकट करण्याआधी या गोष्टी आहेत महत्वाच्या
हेदेखील आहे अजून एक कारण
वास्तविक जुन्या काळात रात्री अजिबातच प्रकाश नसायचा. त्यामुळे कापलेले केस अंधारात स्वच्छ करणे अतिशय कठीण होते आणि त्याशिवाय रात्रीच्या अंधारात चुकीच्या पद्धतीने केस कापली जाण्याची शक्यताही असायची. याशिवाय केस कापताना कात्री लागण्याची अथवा त्वचा कापली जाण्याची शक्यताही असायची. त्यामुळेच रात्री केस कापणे लोकांना योग्य वाटायचे नाही आणि त्यामुळे पूर्वीपासून केस रात्री कापू नका असे सांगण्यात येत होते. ही मग एक अंधविश्वास आणि अनिवार्य अशी प्रथाच झाली होती. त्याशिवाय अनेक ठिकाणी वाढवून चढवून अशुभ असं मानलं जात होतं. पण आता बदलत्या गोष्टींनुसार ही प्रथा आणि अंधविश्वासही निकालात काढण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा – या संकेतावरून ओळखा तुम्हाला हेअरकट करण्याची आहे गरज
घरात केस कापताना बाळगा ही सावधानता –
तुम्ही जर रात्री केस कापणार असाल आणि घरातच कापणार असाल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कोणत्या आहेत या महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या –
- मुळात घरात केस कापण्याची वेळ येऊ नये याची काळजी घ्या. केस कापायचेच असतील तर सलूनमध्ये जा
- तरीही घरात केस कापण्याची वेळ आली तर एखाद्या कोपऱ्यात केस कापण्यासाठी जा. तसंच आपल्या स्वयंपाकघरापासून हा भाग लांब असेल याची काळजी घ्या
- केस कापताना योग्य प्रकाश आहे की नाही हे पाहून घ्या
- स्वतःचे केस स्वतः कापू नका, कोणाची तरी मदत नक्की घ्या. मोठ्या व्यक्तीची मदत घ्या. लहान मुलांची मदत घेऊ नका
- केस कापल्यानंतर अंगावरील केस व्यवस्थित स्वच्छ करा आणि ज्या ठिकाणी केस कापले आहेत ते ठिकाणही व्यवस्थित स्वच्छ करा
- केस ज्या कात्रीने कापले आहेत, ती व्यवस्थित स्वच्छ करा. तसंच इतर कोणत्याही धारदार गोष्टी असतील तर तिथेच सोडू नका
तुम्हालाही आता जर केस रात्री न कापण्याचे योग्य कारण कळले असेल तर अंधश्रद्धा बाळगू नका. रात्री केस कापायचे असतील तर तुम्ही सलॉनमध्ये जाऊन नक्की केस कापू शकता.
अधिक वाचा – केसांसंदर्भात या आहेत 10 अफवा
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक