टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा शो म्हणजे दी कपिल शर्मा शो… या शोचा प्रत्येक एपिसोड म्हणजे मनोरंजनाचा पावर फुल डोसच असतो. ज्यामध्ये नेहमी बॉलीवूडचे नवनवीन कलाकार सहभागी होतात आणि त्यांच्यासोबत या शोच्या कॉमेडीयन्सची धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळते. कोरोनाच्या काळात नकारात्मक बातम्यांपासून दूर राहण्यासाठी आणि ताणतणावाला बाजूला सारण्यासाठी हा शो प्रेक्षकांच्या मदतीला धावून आला होता. सर्व कॉमेडी शोजमध्ये ‘दी कपिल शर्मा शो’ला एक खास स्थान आहे. मात्र या शोच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. कारण लवकरच हा शो बंद करण्याचा निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे. जाणून घ्या कारण
का होणार दी कपिल शर्मा शो बंद
दी कपिल शर्मा शोबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा शो फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर ऑफ एअर होणार आहे. याची अधिकृत घोषणा वाहिनीद्वारे लवकरच केली जाणार आहे. मात्र हा शो बंद होणार म्हणून चाहत्यांनी नाराज होण्याची मुळीच गरज नाही. कारण या शोचा फक्त हा सीझन ऑफ एअर होणार आहे. कारण हा सीझन डिसेंबर 2018 पासून ऑन सुरू आहे. याकाळात फक्त लॉकडाऊनमध्येच हा शो काही काळासाठी बंद झाला होता. मात्र जुलै 2020 नंतर तो पुन्हा मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला. सेटवर प्रेक्षक नसताना त्यांचे कटआऊट ठेवून या शोचं शूटिंग केलं जात होतं. ज्यामुळे शोच्या टीआरपी कमी झाला आहे. सेटवरचे प्रेक्षक हे या शोचा मुख्य गाभा आहे. कारण त्यांच्यामुळेच या शोला अधिक मनोरंजक करता येतं. शिवाय कोरोनामुळे बॉलीवूड सेलिब्रेटीजदेखील प्रमोशनसाठी सध्या शोमध्ये येणं टाळत आहेत. निर्मात्यांच्या मते या काळात या शोने काही काळासाठी ब्रेक घेणं गरजेचं आहे. जेव्हा सर्व काही पुन्हा सुरू होईल तेव्हा या शोचा पुढचा सीझन सुरू केला जाईल. अंदाजे पुढचा सीझन सुरू होण्यासाठी कमीत कमी तीन महिने जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आता दी कपिल शर्मा शो चाहत्यांना आणखी वेगळ्या स्वरूपात पाहण्याची संधी मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्मा आणि त्याची पत्नी गिन्नी शर्मा त्यांच्या दुसऱ्या बाळाची वाट पाहत आहेत. अशा काळात कपिलने शोमधून काही काळासाठी ब्रेक घेतला तर तो गिन्नी आणि त्याच्या बाळासाठी क्वालिटी टाईम देऊ शकतो. मात्र याबाबत कपिलने कोणतीही गोष्ट अजूनही जाहीर केलेली नाही.
कपिल शर्माचा डिजिटल डेब्यू –
कपिल शर्मा या शो व्यतिरिक्त चित्रपट आणि इतर माध्यमांमध्येही नेहमी त्यांची झलक दाखवत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने तो नेटफ्लिक्सच्या माध्यमातून डिजिटल डेब्यू करणार असं जाहीर केलं होतं. याबाबत त्याने त्याच्या इन्स्टा अकाउंटवरही एक व्हिडिओ शेअर केला होता. यासोबत त्याने शेअर केलं होतं की, “एक खुशखबर आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. मी लवकरच नेटफ्लिक्सवर येणार आहे” यावरून कपिल शर्मा त्याच्या इतर काही प्रोजेक्टमुळे या शोमधून काही काळासाठी ब्रेक घेत असल्याची चर्चा निर्माण झाली आहे. कारण काही असलं तरी प्रेक्षकांना आनंद आणि मनोरंजन देणारा,दैनंदिन ताणापासून मुक्त करणारा दी कपिल शर्मा शो पुन्हा लवकर सुरू व्हावा अशी प्रत्येक चाहत्याची इच्छा आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मुलांच्या सुरक्षेसाठी आता विराट-अनुष्काला फॉलो करणार करिना आणि सैफ
#tinypanda – सिद्धार्थ – मितालीच्या लग्नाची धूम, खास क्षण
प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई, फॅमिली प्लॅनिंगबाबत केला मोठा खुलासा