मुलांच्या सुरक्षेसाठी आता विराट-अनुष्काला फॉलो करणार करिना आणि सैफ

मुलांच्या सुरक्षेसाठी आता विराट-अनुष्काला फॉलो करणार करिना आणि सैफ

कोरोनामुळे मागचं वर्ष भितीत घालवलेल्या प्रत्येकाने आणि सुरक्षेसाठी खूप सजग राहणं गरजेचं आहे. ज्यामुळे बॉलीवूड कलाकारांनीही त्यांच्या मुलांबाबत काही ठाम निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आईबाबा झाले. मात्र त्यांनी त्यांच्या मुलीचे फोटो काढू नये यासाठी पापाराजी अर्थात फोटोग्राफर्सनां विनंती केली आहे. करिना आणि सैफ दुसऱ्यांदा आईबाबा होणार आहेत. करिनाला नववा महिना सुरू असून ती फेब्रुवारी ते मार्च दरम्यान तिच्या बाळाची गोड बातमी जाहीर करू शकते. त्यांच्या पहिला मुलगा म्हणजेच तैमूर मीडियामध्ये खूपच लोकप्रिय आहे. पण आता दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच दोन्ही मुलांच्या सुरक्षेसाठी करिना आणि सैफनेही विराट-अनुष्काचा ट्रेंड फॉलो करण्याचा निर्णय घेतला आहे. 

काय आहे विराट आणि अनुष्काचा नवा ट्रेंड

विराट कोहली आणि अनुष्काने बाळाचा जन्म झाल्यावर लगेचच सोशल मीडियावर एक नोट जाहीर केली होती. ज्यामध्ये त्यांनी त्यांना गोंडस मुलगी झाली असून चाहत्यांच्या आर्शीवाद आणि प्रेमाचा सन्मान केला होता. मात्र त्यासोबतच त्यांनी आपल्याला आता जास्त प्रायव्हर्सीची गरज असून इतर ते समजून घेतील अशी विनंतीही केली होती. एवढंच नाही तर त्यांनी त्यांच्या खास मित्रांनाही बाळ आणि आईला भेटण्यासाठी घरी न येण्याची तसंच आर्शीवाद रूपात घरी फुलं अथवा गिफ्ट पाठवू नये अशीही विनंती केली होती. सेलिब्रेटीजच्या मुलांची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. ज्यामुळे पापाराजी म्हणजेच फोटोग्राफर्स जीवाची पर्वा न करता त्यांच्यापाठी सतत धावत असतात. या गोष्टीसाठी त्यांना ताकीद देण्याऐवजी त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय विराट आणि अनुष्काने घेतला होता. कारण फोटोग्राफर्स ही एक व्यक्ती असून ते त्यांचं काम करत असतात. यासाठी त्यांनी मीडियाला एक छान नोट पाठवली आणि त्यासोबतच त्यांच्यासाठी गिफ्टही पाठवलं होतं. ज्यामध्ये त्यांनी प्रायव्हर्सीसाठी त्यांच्या बाळापासून दूर राहण्याची आणि फोटो क्लिक न करण्याची विनंती करण्यात आली होती. आता करिना आणि सैफ अली खानही विराट आणि अनुष्काच्या पावलावर पाऊल ठेवत चालणार आहेत. 

करिना आणि सैफने यासाठी काय घेतला आहे निर्णय

करिना कपूर आणि सैफ अली खानचे हे दुसरे बाळ असणार आहे. याआधी तैमूरच्या फोटोसाठी पापाराझी त्यांचा नेहमीच पाठलाग करत असतात. आता तैमूरलाही त्याची थोडीफार सवय झाली आहे. मात्र त्यामुळे करिना, सैफ आणि तैमूर यांना त्यांचे खाजगी आयुष्य मोकळेपणाने जगता येत नाही. ते कुठे जातात, काय करतात, कसे बोलतात, कसे राहतात हे सर्व मीडियापर्यंत पोहचलं जातं. शिवाय आता कोरोनामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठीच यावेळी मात्र करिना आणि सैफने मीडियाबाबत काही कठोर निर्णय घेण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे तैमूरच्या जन्माच्या वेळी जितका गाजावाजा झाला होता कदाचित तितका थाटमाट त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळी ते करणार नाहीत. सैफ अली खान तर त्याच्या या बाळाच्या जन्मानंतर चौथ्यांदा बाबा होणार आहे. याआधीच  पहिली पत्नी आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं त्याला आहेत. सारा आणि इब्राहिम आता मोठे झाले असल्यामुळे त्यांच्यासोबत सैफचे एक वेगळे नाते आहे. मात्र तैमूर अजून लहान आहे शिवाय जन्माला येणाऱ्या चौथ्या बाळाचीही विशेष काळजी त्याला घ्यावी लागणार आहे. म्हणूनच सैफ आणि  करिनाने मिळून विराट-अनुष्काचा नवा ट्रेंड फॉलो करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Instagram