ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
मोबाईलचे कव्हर बदला

तुम्ही मोबाईलचे कव्हर किती दिवसांनी बदलता, जाणून घ्या

मोबाईल हा आपला अत्यंत जवळची अशी गोष्ट आहे. आपण काहीही बाळगले नाही तरी चालेल पण मोबाईल हा आजुबाजूला असायलाच हवा असतो. कोणताही फोन असो तो अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी आपण मोबाईलची खूप काळजी घेतो. मोबाईलला वेगवेगळे कव्हर्स घालणे खूप जणांना आवडते. वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रकाराचे मोबाईल कव्हर खूप जणांकडे असतात. मोबाईलचे कव्हर स्वच्छ ठेवणे हे फारच गरजेचे असते. मोबाईल कव्हर अस्वच्छ असतील तर त्याचा परिणाम हा थेट तुमच्या त्वचेवर होऊ लागतो. त्यासाठीच मोबाईलचे कव्हर किती दिवसांनी बदलायला हवे ते जाणून घेऊया. 

मोबाईलचे कव्हर किती दिवसांनी बदलावे

मोबाईलचे कव्हर स्वच्छ करताना

एकावेळी आपल्याकडे मोबाईलचे अनेक कव्हर्स असतात. त्यामुळ साधारण आठवडाभराने आपल्याला मोबाईलचे कव्हर बदलायला काहीच हरकत नाही. मोबाईलचेे कव्हर बदलायचे नसेल तर तुम्ही ते धुवायला हवे. मोबाईलचे कव्हर स्वच्छ पुसून काढले तरी देखील त्याचा वापर करता येतो. खूप जणांना जेवणाकडे फोन घेऊन जायची सवय असते किंवा जिथे जातात तिथे सगळीकडे मोबाईल घेऊन जायची सवय असते. या सवयीमुळे होते असे की, ज्या ज्या ठिकाणी आपण जातो तेथील धूळ, माती, अन्नकण हे आपण आपल्यासोबत घेऊन येत असतो. असे मोबाईल कव्हर स्वच्छ दिसले तरी त्यावर धुळ लागलेली असते. ज्याचा त्रास आपल्या त्वचेवर होतो. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मोबाईलचा वापर कुठे करायचा यावर नियम लावा किंवा योग्य वेळी मोबाईलचे कव्हर तरी स्वच्छ करायला घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचा कोणताही त्रास होणार नाही. 

मोबाईल कव्हर असे करा स्वच्छ

जर तुम्हाला मोबाईल कव्हर बदलायचे नसेल तर ते तुम्ही स्वच्छ देखील करु शकता. हल्ली सगळेच सिलिकॉनने बनलेले मोबाईलचे कव्हर्स वापरतात. त्यामुळे असे कव्हर्स स्वच्छ करणे फारच सोपे जाते. यासाठी तुम्ही काही सोप्या ट्रिक्सचा उपयोग करा. 

  1. एका मगमध्ये गरम पाणी घ्या त्यामध्ये लिक्विड डिटर्जंट घालून त्यामध्ये तुमचे सिलिकॉन किंवा प्लास्टिक कव्हर घाला. ते काही काळासाठी ठेवून द्या. त्यानंतर तुम्ही ते छान स्वच्छ करुन घ्या. छान उन्हात वाळवून तुम्ही हे कव्हर वापरायला घ्या. 
  2. जर तुम्हाला रोजच्या रोज कव्हर स्वच्छ करायचे असेल तर तुम्ही रोजच्या रोज त्यावर सॅनिटायझर मारुन टिश्यूने छान पुसून घ्या.
  3.  मोबाईचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वेट टिश्यूचा उपयोग देखील करु शकता. त्याचा वापर करुनही तुम्हाला कव्हर स्वच्छ करता येऊ शकते. 
  4. मोबाईलचे कव्हर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या बादलीत त्याला काही काळासाठी भिजवून ठेवू शकता आणि त्या कव्हरची स्वच्छता राखू शकता. 
  5. मोबाईलच्या कव्हरमध्ये जर कपडा असेल तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला हे कव्हर पूर्णपणे वाळून देणे गरजेचे असते.  कपडा अगदी व्यवस्थित वाळला नाही तरी देखील त्याला वास येऊ शकतो. त्यामुळे त्याची देखील काळजी घ्यायला विसरु नका. 

आता मोबाईलचे कव्हर तरी बदला नाहीतर त्याची स्वच्छत वेळोवेळी राखा म्हणजे तुमच्या त्वचेला त्याचा त्रास होणार नाही. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा

पॉवरबॅंक जवळ नसेल तर या टिप्सने जास्त काळ टिकवा तुमच्या फोनची बॅटरी

तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत हे 5 अॅप

जाणून घ्या मोबाईलचे दुष्परिणाम (Mobile Che Dushparinam)

ADVERTISEMENT
03 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT