ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
Why vitamins are best for aging skin in Marathi

वाढत्या वयानुसार त्वचेला असते व्हिटॅमिनची जास्त गरज, असा करा आहारात समावेश

वय वाढू लागलं की त्याचे परिणाम तुमच्या त्वचा आणि केसावर दिसू लागतात. मात्र आजकाल धावपळीच्या जगात वयाआधीच म्हातारपण जाणवू लागतं. त्वचेची काळजी कमी घेणं, चुकीचा आहार आणि केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधने अशी अनेक कारणं यामागे असू शकतात. जर तुमच्या चेहऱ्यावरही अशा एजिंगच्या खुणा दिसू लागल्या असतील तर याबाबत वेळीच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या वयानुसार होणारे त्वचेमधील बदल रोखण्यासाठी तुम्ही आहारात बदल करू शकता. अशा लोकांना आहारात व्हिटॅमिन युक्त अॅंटि एजिंग पदार्थ समाविष्ठ केले तर त्यांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

या अॅंटि एजिंग पदार्थांचा करा समावेश

Why vitamins are best for aging skin in Marathi

वाढतं वय आणि त्यानुसार दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी हे पदार्थ तुम्ही नक्कीच आहारात समाविष्ठ करा, कारण यातील व्हिटॅमिन्स तुमच्या त्वचेसाठी गरजचे असतात.

  • पपई – पपईमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं जे तुमच्या त्वचेच्या पोषणासाठी अतिशय गरजेचं आहे. व्हिटॅमिन सी युक्त आहार घेतल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नैसर्गिक पद्धतीने कमी होतात. कोरडी हवा अथवा पाणी कमी पिण्यामुळेही त्वचेवर सुरकुत्या येतात. पपई हे रसदार फळ असल्यामुळे तुम्ही तो खाण्यामुळे हायड्रेट राहता.
  • टोमॅटो –टोमॅटोमधून शरीराला व्हिटॅमिन सी सोबत व्हिटॅमिन एदेखील मिळतं. जे तुमचं वाढतं वय रोखण्यासाठई फायदेशीर ठरू शकतं.शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी निरनिराळ्या व्हिटॅमिन्सची शरीराला गरज असते. यातील पोषक घटकांमुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि एजिंगच्या खुणा कमी होतात.
  • लसूण – लसणामध्ये एस एलिल सिस्टिन नावाचा एक घटक असतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं हानिकारक सूर्य किरणांपासून संरक्षण होतं. फार काळ उन्हात राहण्यामुळेही तुमच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा  दिसू शकतात. यासाठी आहारात लसणाचा वापर जरूर करा. कारण लसूण हे एक अॅंटि एजिंग पदार्थ आहे. चेहऱ्यावरील वांग जाण्यासाठी क्रीम (Best Cream For Pigmentation In Marathi)
  • ब्रोकोली –आहारात ब्रोकोलीचा समावेश करूनही तुम्ही तुमच्या वाढत्या वयातील एजिंगच्या समस्या दूर करू शकता. कारण ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असतं. जे तुमच्या त्वचेच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरतं. एवढंच नाही यातील इतर पोषक घटक तुमचे आरोग्य निरोगी ठेवतात. जाणून घ्या विटामिन ई चे फायदे (Vitamin E Benefits In Marathi)
  • अॅव्होकॅडो  –कोलेजीनची निर्मिती नियमित होण्यासाठी शरीराला पुरेसं व्हिटॅमिन सी लागतं. अॅव्होकॅडोमधून तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिटॅमिन्स मिळतात. यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई आणि के भरपूर असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि नवीन त्वचेच्या निर्मितीला चालना मिळते, त्वचा नैसर्गिक पद्धतीने सुंदर आणि चमकदार दिसू लागते. निरोगी जीवनशैलीसाठी ‘व्हिटॅमिन बी 6’ आहे गरजेचं (Benefits of Vitamin B6 In Marathi)

.

30 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT