निरोगी राहण्यासाठी दररोज दूध पिणे गरजेचे आहे. नियमित एक ग्लास दूध पिण्यामुळे शरीराला प्रोटीन्स, कॅल्शिअम असे अनेक पोषक घटक मिळतात. दूधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे आजारी अथवा अशक्त लोकांनाही डॉक्टर दूध पिण्याचा सल्ला देतात. केशर अथवा हळदीच्या दुधामुळे तर आजारपण दूर राहते. गरोदर महिला, लहान मुलं आणि वृद्धांनी दूध पिणे फारच आवश्यक आहे. मात्र तुम्ही दूध कसे पिता हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण दूध नेहमी तापवून मगच प्यावे. कच्चे दूध पिणे शरीरासाठी मुळीच हिताचे नाही.
हळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा
दूध न तापवता का पिऊ नये
दूध कच्चं असताना तसंच प्यायलं तर तुम्हाला दूधातून इनफेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. कारण कच्चं दुधात अनेक हानिकारक जीवजंतू असू शकतात. दूध उकळल्यामुळे दुधातील जीवजंतू मरून जातात. मात्र जर ते न उकळता तुम्ही प्यायला तर जीवजंतू दुधासोबत तुमच्या पोटात जातात. ज्यामुळे अपचन अथवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र जर तुम्ही दूधडेअरीमधून दूध विकत घेत असाल तरच कच्चे दूध गरम करून पिण्याची गरज आहे. आजकाल बाजारात पाश्चराइझ दूध (Pasteurized Milk) मिळते. हे दूध आधीच प्रक्रिया केलेले असते. ज्यामुळे त्यामधील जीवजंतू प्रक्रिया करून नष्ट केले जातात. त्यामुळे असे दूध जर तुम्ही अती प्रमाणात गरम केले तर त्यातील पोषक घटकदेखील नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाश्चराइझ दूध जास्त वेळ उकळू नका. मात्र गाई म्हशीचे गोठातून काढून आणलेले दूध मात्र चांगले उकळून मगच पिणे गरजेचं आहे.
हळदीचे फायदे सौंदर्य आणि आरोग्यासाठी (Halad Benefits In Marathi)
दूध गरम न करता पिण्यामुळे काय होते
दूध गरम न करता तसेच पिण्यामुळे तुम्हाला उलटी, जुलाब, बद्धकोष्ठता, पोटात दुखण्याचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही नियमित कच्चे दूध प्राशन केले तर कालांतरांने तुम्हाला आर्थ्राटिस अथवा हाडांचे गंभीर विकार होऊ शकतात. पोटाचे विकार कच्चे दूध पिण्यामुळे वाढू शकतात. बऱ्याचदा या सर्वाचा परिणाम तुमच्या किडनीवर होऊ शकतो. ज्यामुळे किडनीच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. थोडक्यात कच्चे दूध न गरम करता पिणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे दूध चांगले उकळून थंड करून मगच प्या. दूधात हळद घालून हळदीचे दूध पिणे सर्वात उत्तम ठरेल. कारण हळद अॅंटि सेप्टिक असल्यामुळे हळदीच्या दुधामुळे दूधातील जीवजंतू नक्कीच नष्ट होतील.
चेहऱ्यासाठी कसा करावा दूधाचा वापर (How To Use Milk For Skin In Marathi)