मेकअप चेहऱ्याला व्यवस्थित लागावा म्हणून ब्युटी ब्लेंडरचा वापर अनेक जण करतात. वेगवेगळ्या रंगाचे आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्युटी ब्लेंडर बाजारात मिळतात. जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरत असाल तर त्याची स्वच्छता करणे हे फार गरजेचे असते. ब्युटी ब्लेंडरची स्वच्छता ही चेहऱ्यासाठी फारच आवश्यक असते. जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर धूत नसाल तर तुम्ही ते धुण्याचे कारण आणि ते न केल्यास तुमच्या त्वचेला कोणता त्रास होऊ शकतो. ते आताा जाणून घेऊया.
आकर्षक दिसण्यासाठी ओव्हरनाईट ब्युटी हॅक्स
ब्युटी ब्लेंडर धुतले नाही तर होऊ शकतो हा त्रास
- ब्युटी ब्लेंडर हा स्पंज पासून बनलेला असतो. त्यामध्ये मेकअप प्रोडक्ट हा शोषून घेतला जातो. तुम्हाला जरी तो तुम्हाला दिसला नाही. तरी मेकअप हा ब्लेंडरच्या पोअर्समधून आत जातो. तो काढला नाही तर पुढच्यावेळी फाऊंडेशन किंवा काही लावताना त्याचा रंग चेहऱ्यावर उठून दिसणार नाही.
- फाऊंडेशन आणि कन्सिलर एकत्र झाल्यामुळे त्याचा शेड वेगळा होऊ शकतो. त्यामुळे ब्युटी ब्लेंडर धुणे हे गरजेचे असते.
- मेकअप प्रोडक्टमध्ये तेलकट घटक असतात. जे स्पंजमध्ये शोषले जातात.तेलकट घटक जर ब्लेंडरमध्ये राहिले तर मात्र तुमच्या त्वचेला तैलीय पदार्थ लागण्याची शक्यता असते. तैलीय घटक यामुळे तुमच्या त्वचेच्या पोअर्समध्ये घाण जाण्याची शक्यता असते.
- ब्युटी ब्लेंडरचा वापर करताना अनेकदा आपण मेकअप करेक्ट करण्यासाठीही वापरतो. त्यामुळे त्याला इतर मेकअपही लागण्याची शक्यता असते. म्हणूनच ब्युटी ब्लेंडर धुण्याची गरज असते.
- कोणतीही अस्वच्छता ही चेहऱ्यासाठी हानिकारक असते. ब्युटी ब्लेंडर हे एका वापरानंतर नाही जमले तरी दोनदा वापरल्यानंतर तरी तुम्ही ब्युटी ब्लेंडर धुवा.
- ब्युटी ब्लेंडरमध्ये जास्त काळासाठी प्रोडक्ट राहिल्यामुळे त्यातून तेल सुटते. हे तेल तुम्ही केलेला मेकअर तेलकट करते. ज्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. मेकअप चेहऱ्यावरुन काढण्याची जितकी गरज असते. तितकाच मेकअप लावण्यासाठी वापरत असलेला ब्युटी ब्लेंडर वापरताना तो स्वच्छच असायला हवा.
चेहरा देत असेल असे संकेत तर आताच थांबवा स्क्रबिंग
असा स्वच्छ करा ब्युटी ब्लेंडर
जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर किंवा फ्लॅट स्पंज वापरत असाल तर तो धुण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरा
- एका भांड्यात मिस्लेअर पाणी घेऊन त्यामध्ये स्पंज बुडवून ठेवा. त्यामुळे त्यातील मेकअप निघून जाण्यास मदत मिळते.
जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर दोनदा वापरल्यानंतर जर तुम्ही तो धुणार असाल तर तुम्ही एखाद्या माईल्ड डिटर्जंट सोपमध्ये ते घाला. थोडावेळ भिजवत ठेवा आणि मग ते घट्ट पिळून घ्या. - स्पंज धुतल्यानंतर तो वाळवणे देखील गरजेचे असते. जर तुम्ही तो तसाच ओला ठेवला तरी तुम्हाला त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्य असेल तर त्यामधील सगळे पाणी काढून तुम्ही तो वाळवण्याचा प्रयत्न करा.
आता ब्युटी ब्लेंडर धुणे का गरजेचे आहे हे जाणून घेतल्यानंतर त्वचेच्या काळजीसाठी म्हणून त्याची स्वच्छता राखा.
तुमचं लग्न ठरलं आहे का, मग फॉलो करा हे ‘ब्रायडल ब्युटी केअर रूटीन’ Bridal Beauty Routine
मेकअप जास्त काळ टिकवायचा असेल तर MyGlamm ची Banana Powder वापरा.