ADVERTISEMENT
home / Weight Loss
वजन कमी करायचा विचार करुनही का होत नाही

वजन कमी करायचं ठरवलेलं असूनही कुठे अडतं

 मला बारीक व्हायचंय… मला वजन कमी करायचंय… मला XL वरुन M वर यायचं आहे. असे कित्येकांचे स्वप्न असते. वजन कमी करणे किंवा बारीक होणे हा प्रवास तितकासा सोपा नसतो. कारण बऱ्याच गोष्टी या आपल्याला सोडाव्या लागतात. तर बऱ्याच गोष्टी आपल्याला सवयीचा भाग करुन घ्यायच्या असतात. वजन कमी करायचा विचार करुनही कधीकधी ते सत्यात उतरत नाही.म्हणजेच काहीतर बदल करण्यात आपण कमी पडतोय असे निदर्शनास येते. तुम्हीही डाएट करताना कुठेतरी गाडी अडकतेय असे वाटत असेल तर या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात

फक्त करा ब्रीथिंग (Breathing) एक्सरसाईज आणि पोटाचा घेर करा कमी

जीभेवर नियंत्रण

Instagram

वजन कमी करण्यासाठी डाएट हा खूप महत्वाचा आहे. ज्यावेळी तुमच्या वजनानुसार डाएट तुम्हाला दिला जातो. त्यावेळी तो तुमच्यासाठी पुरक आणि पुरेसा असा असतो. तुम्हाला पुन्हा भूक लागण्याची शक्यता त्यामध्ये कमीच असते. पण तरीही जीभेचे चोचले हे तुम्हाला जास्तीचे खाणे खायला भाग पाडतात. त्यामुळे पहिले काही दिवस तुम्हाला जीभेवर नियंत्रण ठेवण्यास थोड्या अडचणी अगदी स्वाभाविकपणे येतात. पहिले काही दिवस तुम्हाला हा त्रास होईल. म्हणून लगेच डाएट सोडून पदार्थांवर ताव मारु नका. त्यापेक्षा चमचमीत पदार्थ हळुहळू कमी करा. त्यामुळे तुम्हाला एकदम काहीतरी वेगळे केल्यासारखे वाटणार नाही. 

व्यायामाला द्या प्राधान्य

व्यायाम हा वजन लवकरात लवकर कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 4 दिवस तरी तुम्ही व्यायाम करायला हवा. जर तुम्ही दिवसातून चार दिवस अगदी मन लावून व्यायाम केला तर तुम्हाला वजन कमी करायला मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी लगेच जीमला जाण्याची गरज असते असे मुळीच नाही. तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही घरी सुद्धा काही सोपा आणि साधा व्यायाम करु शकता. व्यायामाची एकदा सवय आणि आवड लागली की आपसुकच तुम्ही चालणे, धावणे असा व्यायाम कराल. 

ADVERTISEMENT

नितंबावरील फॅट होईल कमी नियमित करा हे व्यायाम

सतत माप घेऊ नका

व्यायाम हा वजन लवकरात लवकर कमी करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्यामुळे आठवड्यातून किमान 4 दिवस तरी तुम्ही व्यायाम करायला हवा. जर तुम्ही दिवसातून चार दिवस अगदी मन लावून व्यायाम केला तर तुम्हाला वजन कमी करायला मदत मिळते. वजन कमी करण्यासाठी लगेच जीमला जाण्याची गरज असते असे मुळीच नाही. तुम्हाला जसे जमेल तसे तुम्ही घरी सुद्धा काही सोपा आणि साधा व्यायाम करु शकता. व्यायामाची एकदा सवय आणि आवड लागली की आपसुकच तुम्ही चालणे, धावणे असा व्यायाम कराल. 

सतत माप घेऊ नका

Instagram

एखादा डाएट किंवा वर्कआऊट सुरु केल्यानंतर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी बारीक व्हायला सुरु व्हाल असे मुळीच होत नाही. कारण तुम्हाला थोडासा वेळ नक्कीच लागतो. काही जणांना डाएट सुरु केल्यानंतर लगेचच माप आणि वजन करायची सवय लागलेली असते. त्यामुळे तुम्ही अजिबात सतत माप घेण्याची घाई करु नका. कधी कधी वजन कमी झाले किंवा माप फारशी कमी झाली नाही तर काही जणांची निराशा होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे सुद्धा खूप जणांचा हा प्रवास इथेच थोडा डळमळू लागतो. 


७ दिवस आहारात असतील हे पदार्थ तर शरीर होईल सुदृढ

ADVERTISEMENT

सकारात्मक राहा

कोणताही बदल करताना सकारात्मक राहणे गरजेचे आहे. आपण सुरु केेलेला हा प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार असे मनाशी ठरवा. मी यशस्वी होणार असे सतत म्हणा. तुमच्या शरीरावर तुमचे प्रेम असू द्या. सतत दुसऱ्याच्या शरीराची तुलना करुन वाईट वाटून घेण्यापेक्षा तुम्ही सकारात्मक राहा. शांत चित्ताने जितक्या गोष्टी कराल. त्याला वेळ लागेल पण तुम्हाला नक्की त्यामुळे यश मिळेल. 

आता तुम्हालाही वजन कमी करण्याची प्रेरणा हवी असेल तर नक्की हे वाचा आणि त्यापद्धतीने वागा तुम्हाला नक्की यश मिळेल.

10 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT