ADVERTISEMENT
home / Weight Loss
फक्त करा ब्रीथिंग (Breathing) एक्सरसाईज आणि पोटाचा घेर करा कमी

फक्त करा ब्रीथिंग (Breathing) एक्सरसाईज आणि पोटाचा घेर करा कमी

पोटाचा घेर कमी करणे म्हणजे महिलांसाठी फारच मोठी कसरत असते. हे पोट कमी करायला सुरु केल्यानंतरच कळते. महिलांमध्ये ओटी पोट बाहेर येणे हे अगदी स्वाभाविक आहे. आरशात उभे राहा आणि तुमचे पोट नेमके कुठून सुटले आहे ते पाहा. जास्त करुन महिलांचा ओटीपोटाचा भाग हाच जास्त फुगलेला दिसून येतो. पोटासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार करुन पाहताना दमछाक होणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण या सोबतच तुम्ही जर थोड्या वेगळ्या पद्धतीने पोटाच घेर कमी केला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच मिळू शकतो. आपण घेत असलेल्या श्वासामुळेही तुमचे पोट कमी होऊ शकते हे तुम्हाला माहीत आहे का? हो तुम्ही वाचत आहात ते अगदी खरं आहे. फक्त Breathing exercise करुन तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. चला तर जाणून घेऊया अशा सोप्या ब्रीथिंग एक्सरसाईज

श्वासावर लक्ष केंद्रित करा

आपण दिवसाला किती श्वास घेतो हे आपल्याला कोणालाच माहीत नाही. आपले श्वसनाचे कार्य सुरळीत सुरु आहे म्हणूनच आपल्याला काही त्रास होत नाही इतकेच आपल्याला माहीत आहे. पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करणे फार गरजेचे असते. अशावेळी मांडी घालून शांत बसा. आता डोळे बंद करुन श्वास घ्या. ज्यावेळी तुम्ही श्वास घेता त्यावेळी तुमच्या छातीची आणि पोटाची हालचाल तुम्हाला होताना जाणवेल. असा श्वास घेत असताना  तुम्ही श्वास दीर्घ घ्या आणि तोंडावाटे सोडा असे करताना पोटाच्या पेशींवर ताण पडतो. ज्यामुळे पोट आत जाण्यास मदत मिळते. शिवाय अशा प्रकाराच्या व्यायामामुळे तुमचे पोटाचे कार्यही सुधारते. 

कोरोनातून बरं झाल्यावर का बदलावा टूथब्रश आणि टंग क्लिनर

श्वास रोखून धरा

तुम्ही कधी तुमचा श्वास रोखून धरला आहे का? हो, तर पोटांसाठी असा व्यायाम हा फारच चांगला आहे. ज्यावेळी तुम्ही व्यायाम करता तो सगळा व्यायाम करुन झाला आणि स्ट्रेचिंग किंवा शवासन करण्याचा तुम्ही विचार करत असाल अशावेळी तुम्ही पाठीवर अगदी रिलॅक्स झोपा. आता तुम्हाला तुमचा श्वास रोखून धरायचा आहे. जितका वेळ शक्य आहे तितका वेळ हा श्वास रोखून धरा. ज्यावेळी आपण श्वास रोखून धरतो अशावेळी आपण पोट आत घेतो. पोटावर ताण येतो असे तुम्हाला नक्की जाणवेल.  असे करताना ज्यावेळी तुम्हाला श्वासास जास्त अडथळा होतो असे वाटत असेल अशावेळी श्वास तोंडावाटे सोडून द्या.

ADVERTISEMENT

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat) 

बेंबीतून श्वास घ्या

आता हे काय असते असे तुम्हाला वाटेल पण ज्याप्रमाणे आपण कपालभारती हा व्यायाम करतो. त्यावेळी आपण जो श्वास घेतो तो बेंबीवाटे घेत असतो. एका जागी शांत बसून किंवा उभे राहून तुम्हाला हा व्यायाम करता येऊ शकतो. शरीर शांत करा. आणि आता तुम्हाला  कपालभारती प्रमाणे श्वास आत घ्यायचा आाहे आणि नाकातून तुम्हाला हा श्वास सोडायचा आहे.  हा व्यायामदेखील खूपच फायद्याचा ठरु शकतो. या व्यायामुळे तुमचे श्वासावरही नियंत्रण राहण्यास मदत मिळते. 

तोंडावाटे घ्या श्वास

तोंडावाटे श्वास घेणे हे देखील तुमच्यासाठी फारच फायद्याचे ठरु शकते. तोंडावाटे दीर्घश्वास आत घ्या आणि तो तोंडावाटे बाहेर सोडा. हा व्यायामही तुमच्या हट्टी फॅटला कमी करण्यासाठी मदत करु शकता. साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी हा व्यायाम करा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या पोटाचा घेर नक्कीच कमी झालेला जाणवेल. 


आता पोटासाठीचा कठीण व्यायाम करणे जमत नसेल तर किमान हा असा श्वासाचा व्यायाम नक्की करा.

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी, करून पाहा ‘हे’ योगासने (Yoga For Weight Loss In Marathi)

 

 

15 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT