ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
या कारणांसाठी घरात सुद्धा लावायला हवं सनस्क्रीन

या कारणांसाठी घरात सुद्धा लावायला हवं सनस्क्रीन

सुर्यप्रकाशातून प्रसारित होणारी अतिनील किरणं त्वचेसाठी हानिकारक असतात.  या किरणांमुळे त्वचेचे आजार आणि सनबर्न होण्याची शक्यता असते. यासाठीच डॉक्टर आणि ब्युटी तज्ञ्ज सुर्यप्रकाशात जाताना सनस्क्रीन लावण्याचा सल्ला देतात. मात्र सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वजण घरातूनच काम करत आहेत. आपल्याला वाटतं की घरात असताना त्वचेला सुर्यप्रकाशाचा संपर्क होणार नाही. सहाजिकच तुम्ही यामुळे त्वचेवर सनस्क्रीनचा वापर देखील करत नाही. मात्र असं करू नका कारण घरात असतानादेखील तुम्हाला सनस्क्रीन लावण्याची तितकीच गरज आहे. जाणून घ्या याचे कारण

घरात असताना सनस्क्रीन लावणे का आहे गरजेचे

घराची रचना बऱ्याचदा भरपूर सुर्यप्रकाश येईल अशी केलेली असते. ज्यामुळे घरात प्रकाश आणि हवा येण्यास मदत होते. सहाजिकच यामुळे तुमच्या त्वचेचा घरात राहूनही सुर्यप्रकाशासोबत संपर्क होत असतो. त्याचप्रमाणे तज्ञ्जांच्या मते जेव्हा तुम्ही घरात असतात तेव्हा तुम्ही सतत टिव्ही, लॅपटॉप आणि मोबाईलच्या संपर्कात असता. आजच्या आधुनिक जीवनशैलीत या गोष्टी नित्यकर्मात समाविष्ठ झालेल्या आहेत. मात्र या डिजिटल गॅझेट्समधून सतत बाहेर पडणाऱ्या हानिकारक प्रकाशकिरणांविषयी तुम्ही अजूनही अज्ञात आहात. संशोधनानुसार ही प्रकाश किरणे तुमच्या त्वचा आणि आरोग्यासाठी हितकारक नाहीत.

shutterstock

ADVERTISEMENT

स्क्रीनमधून येणाऱ्या प्रकाशकिरणांमुळे त्वचेचं होऊ शकतं नुकसान

स्क्रीनमधून येणाऱ्या प्रकाश किरणांचा सतत चेहऱ्यासोबत संपर्क झाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वयाआधीच सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स दिसू लागतात. ज्यामुळे तुम्ही कमी वयातच म्हातारे आणि  निस्तेज दिसू लागता. त्वचा सैल पडणं, डोळ्याखाली  काळी वर्तुळं येणं, पिगमेंटेशन हे याच जीवनशैलीचे परिणाम आहेत. मात्र बदलत्या काळानुसार या जीवनशैलीला आत्मसात करणं आज काळाची गरज होऊ लागली आहे. मात्र या गोष्टींचा गरजेपुरता वापर आणि त्वचेत मुरणाऱ्या या प्रकाश किरणांपासून त्वचेचं संरक्षण करून तुम्ही स्वतःचे आरोग्य जपू शकता. यासाठीच घरात असतानाही त्वचेवर सनस्क्रीन लावा ज्यामुळे तुमच्या त्वचेचं यापासून संरक्षण होऊ शकेल. 

लक्षात ठेवा तुमचं  सनस्क्रीन जितकं चांगल्या गुणवत्तेचं आणि SPF चं असेल तितकं तुमच्या त्वचेचं संरक्षण जास्त होऊ शकतं. तुम्ही घरात असताना घरीच तयार केलेलं नैसर्गिक सनस्क्रीन वापरू शकता. सनस्क्रीन लावण्यापूर्वी  तुमची त्वचा स्वच्छ करा आणि मग त्यावर मॉश्चराईझर लावून सनस्क्रीनचा वापर करा.

shutterstock

ADVERTISEMENT

होममेड सनस्क्रीन कसे तयार कराल

साहित्य – एक कप शिया बटर, पाव कप नारळाचे तेल, एक चमचा कॅरेट सीड ऑईल आणि दोन चमचे झिंक ऑक्साईड 

कसं तयार कराल होममेड सनस्क्रीन –

नारळाचे तेल आणि शीया बटर थोडं कोमट करून त्यात सर्व मिश्रण एकत्र करा आणि व्यवस्थित मिक्स करून एका डबीत भरून ठेवा क्रीम फॉर्ममध्ये असलेलं हे मिश्रण तुम्ही घरात सनस्क्रीन लोशनप्रमाणे वापरू शकता. 

खूप दिवसांपासून तुमची आमची भेट झाली नव्हती. पण आजपासून गॉसिप, मेकअप टीप्स आणि तुमच्या आवडीचे सगळे विषय घेऊन POPxo marathi येत आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फॉलो करा हे ‘मॉर्निंग ब्युटी केअर रूटीन’ (Morning Skin Care Routine In Marathi)

मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी वापरा 6 घरगुती उपाय

चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा नको असतील तर बदला तुमच्या या ‘5’ सवयी

ADVERTISEMENT
01 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT